इतिहास

त्रिपुरा म्हणजे एकेकाळचा प्राचीन बौद्ध संस्कृतीचा प्रांत; थेरवादी व महायान संस्कृतीचे मोठे केंद्र होते

भारतातील सात भगिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ईशान्येकडील राज्यात त्रिपुरा हे एक छोटेसे राज्य आहे. येथे सद्यस्थितीत हिंदूंचे प्राबल्य जास्त असून मोग,चकमा आणि बरुआ या बौद्ध जमातींची एकूण मिळून लोकसंख्या दोन लाखाच्या वर आहे. या राज्यात १२ व्या शतकापर्यंत बौद्ध धर्म बहरलेला होता. परंतु परकीयांचे आक्रमण, पुरोहितांचा कावेबाजपणा यामुळे धम्म लोप पावला. इथल्या राजालाच पुरोहितांनी अंकित […]

गौड बंगाल म्हणजेच बौद्ध बंगाल

पाचशे वर्षांपूर्वीची कान्हेरी लेणी कशी दिसत होती? जॉन फ्रेयरच्या प्रवास वर्णनाचा वृत्तान्त

१४ ऑक्टोबर १९५६ च्या धम्मदीक्षा सोहळ्याचे सहयोगी

आजपर्यंत न पाहिलेल्या सन्नतीच्या महास्तुपावरील सम्राट अशोकाची विविध प्रसंगातील शिल्पे

ब्लॉग

चित्रपटातील बुध्द आणि बौद्ध स्थळांचे चित्रण

बुद्धांच्या जीवनावर आधारित जगातील पहिला चित्रपट भारतात तयार झाला याचा सार्थ अभिमान सर्वांना वाटला पाहिजे. चित्रपटाचे नाव होते “बुद्धदेव”. हा चित्रपट भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांनी १९२३ मध्ये तयार केला होता. दुर्दैवाने याची रिळे उपलब्ध नसल्याने आपण हा पाहू शकत नाही. त्यानंतर दोनच वर्षांनी ब्रिटिश कवी सर एडविन अर्नोल्ड यांच्या “द लाईट ऑफ […]

डॉ.आंबेडकरांचे जळगाव जिल्ह्याशी होते विशेष नाते; २९ वेळा केला होता जळगाव दौरा

नवनिर्माणाचे स्वप्न पेरणारा दिवस; ७ नोव्हेंबर शाळा प्रवेश दिन

ब्लॉग

22 प्रतिज्ञा हा कट्टरवाद, जातीयवादी लोकांच्या मानसिकतेपासून दिलेले “सरंक्षण कवच”

आप पक्षाचे मंत्री राजेंद्र गौतम यांना बावीस प्रतिज्ञा साठी आपला राजीनामा देण्यास त्यांच्याच पक्षाने भाग पाडले, संविधान, बाबासाहेब आंबेडकर व बाबासाहेबांच्या विधानाचे सोयीने दाखले देणाऱ्या अरविंद केजरीवाल यांचे खरे रूप आतातरी लोकांना कळायला हवे, संविधान आणि बाबासाहेब हे फक्त आपल्या सोयीनुसार “वापरण्या करता” उपयोगात आणले जातात, पण “स्वीकारण्या करता” जी विवेकबुद्धी लागते ती ह्यांच्या जवळ […]

बोधिसत्व पद्मपाणि आणि अजिंठा

जाती आधारीत भेदभाव ऍपल कंपनी मध्ये सहन केल्या जाणार नाही; ऍपल कंपनीची भूमिका

सुंदर, मोहक आणि ऐतिहासिक बेडसे लेणी

महाराष्ट्रात प्रत्येक लेणींचे एकएक वैशिष्ट्य आहे. काही ठिकाणी सुंदर कलाकुसर आणि शिल्पे, तर काही ठिकाणी देखणा दर्शनी भाग (व्हरांडा), तर काही ठिकाणी अप्रतिम चित्रकला तर काही ठिकाणी वेधक वास्तुशिल्प ( Architectural View ) दिसून येते. मावळ तालुक्यातील बेडसा लेणी ज्यांनी पाहिली असेल त्यांनी तेथील अलौकिक कलात्मकता नक्कीच बघितली असेल. GBPP च्या गॅझेटमध्ये ( Gazetteer of the Bombay Presidency : Poona Part III ) लिहिले आहे की 'सन १८४४ मध्ये या लेण्यांची पाहणी केली असता छताकडील लाकडी अर्धगोलाकार तुळव्या शाबूत दिसल्या. १८६१ मध्ये भेट देणाऱ्याने अशी नोंद केली आहे की लाकडी तुळव्यांचे तुटलेले तुकडे खाली पडले आहेत. भिंतीवर आणि स्तंभावर बुद्धचित्रे दिसत

बोधिसत्व अवलोकितेश्वर; दहा मुख कोरलेले एकमेव शिल्प कान्हेरीच्या लेणीत

भारताचा प्राचीन इतिहास पाहिला तर तिथल्या कलावास्तूवर बौद्ध काळातील तत्त्वाचा व तत्त्वज्ञानाचा परिणाम झालेला दिसून येतो. बौद्ध चैत्य ,स्तूप, विहार यांच्या माध्यमातून बौद्ध धम्माचा जाज्वल्य इतिहास अजरामर झाला आणि येणाऱ्या पिढीला तो आदर्श ठरला. लेणी चैत्यगृह यावरील शिल्पकलेमध्ये बौद्ध प्रतीके व बौद्ध देवता यांचा समावेश केला गेला. बुद्धकालीन वास्तुवैभवा मुळे भारताचा प्राचीन इतिहास समजण्यास मदत होते. इतिहासाचा अनमोल ठेवा ऊन ,वारा, पाऊस परकीय, स्वकीय आक्रमणाचा मारा सहन करीत तग धरुन उभा आहे .आज या बौद्ध लेण्यांमध्ये अतिक्रमण करून त्यांचे मूळ स्वरूप बदललं गेलं आहे. बौद्ध धर्मात अशा काही प्रतिमा आहेत की, ज्या दुर्मिळ स्वरुपाच्या आहेत त्यापैकीच एक म्हणजे मुंबई कान्हेरी लेणी

कोंडाणे लेण्यांचा दर्शनी भाग कूठे आहे?

रायगड जिल्ह्यातील कर्जत जवळची कोंडाणे लेणी अती प्राचीन असून भंग झालेला त्याचा बराचसा भाग पाहून देखील एकेकाळी ही लेणी भव्य, रेखीव व कलाकुसरीने नटलेली असावीत हे ध्यानी येते. थेरवादी परंपरेच्या या लेण्या राजमाची किल्ल्याच्या उत्तर कडयाच्या खाली येतात. लेण्यांचा हा परिसर पावसाळ्यात अलौकिक सौंदर्याने नटलेला दिसतो. हिरवीगार वृक्षवल्ली, जागोजागी वाहणारे ओहोळ व मध्येच फेसाळत वाहणारे ओढे यांचे दर्शन पावसाळ्यात नेहमी होते. कोंडाणे समूहात एक चैत्य व ७ विहार आहेत. इ.स.पूर्व दुसऱ्या शतकात ती खोदली गेली आहेत. दर्शनी भागात टिकून राहिलेली चैत्याची कलाकुसर श्रेष्ठ दर्जाची असून पिंपळ पानाच्या आकाराची आहे. या चैत्याच्या उत्तर बाजूकडील विहारांसमोर पावसाळ्यात मोठा पाण्याचा लोट कोसळत असतो. या

भारतातल्या पहिल्या कोरीव लेणींची निर्मिती आणि इतिहास

"भारतामध्ये कोरीव लेणींची निर्मिती ही सर्वात प्रथम सम्राट अशोक याच्या काळात झाली.बौद्ध भिक्षूंना हवा असलेला एकांत, ध्यान-धारणा , चिंतन-मनन करण्यासाठी लागणारी शांतता ही नगरात किंवा गावात निवास करुन मिळणारी नव्हती. या साठी त्याने मनुष्यवस्तीपासून दूर अशा डोंगरपरिसरात ही 'शैलगृहे' अर्थात 'लेणी' खोदविली. अशोक व त्याचा नातू दशरथ ह्यांनी बौद्ध भिक्खूंसाठी दक्षिण बिहारमधील बाराबर, नागार्जुनी, व सितामढी इ. ठिकाणी ही सुरुवातीची लेणी खोदविली. बाराबर येथे सुदामा, विश्वामित्र, कर्णकौपर, व लोमशऋषी ही चार लेणी आहेत. त्यापैकी 'सुदामा' हे लेणे सर्वच प्राचीन असून,'न्यग्रोध गुंफा' या नावाने ते प्रसिद्ध आहे. याची रचना साधी असून, समोर आयताकार दालन व त्यानंतर वर्तुळाकार खोली आहे. या लेणींपासून सुमारे १.५

बुद्ध लेणीं ते पांडव लेणीं – एक प्रवास

भारतातील सर्वात प्राचीन वास्तू (एखाद दुसरा अपवाद वगळता) या येथील पाषाणात कोरलेल्या "बुद्ध लेणीं" आहेत. हे एक ऐतिहासिक आणि पुरातत्वीय सत्य आहे. सम्राट अशोकाने बाराबार आणि नागार्जुनी डोंगरात (आत्ताच्या बिहार राज्यातील जहानाबाद जिल्ह्यात) सर्वात पहिल्यांदा लेणीं कोरून दान दिली. त्यानंतर ही अतिशय अभिनव कला इतर प्रदेशात रुजू लागली. महाराष्ट्रात पाषाणाच्या प्रचंड मोठी डोंगरांची रांग या कलेला पोषक ठरली आणि भारतातील सर्वात जास्त लेणीं येथील अनेक डोंगरांच्या खांद्यावर दिमाखात दिसू लागली. विनयानुसार बौद्ध भिक्खुंनी भिक्षाटन केल्यानंतर संपूर्ण वेळ एकांतात ध्यान आणि अभ्यासासाठी व्यतीत करायचा असतो. हे भिक्खू डोंगरातील या लेणींमधे राहत असत. स्थानिक लोकांना त्यांना "भिक्खू" म्हणतात हे कदाचित माहीत नसावे. तेव्हा

लेण्याद्रीचे मूळ नाव काय?

महाराष्ट्रात अस्तित्वात असलेल्या प्राचीन बुद्ध लेणींना त्याकाळी अतिशय समर्पक अशी नावे देण्यात आली होती. ही नावे डोंगरांची किंवा शहराची, या लेणींच्या वैशिष्ट्याची किंवा या लेणींत राहत असलेल्या बौद्ध भिक्खुंच्या संघाची होती. जसे कि कण्हगिरी बुद्ध लेणी म्हणजे आत्ताची कान्हेरी बुद्ध लेणी (कान्हेरी डोंगर), तिरणहू म्हणजे त्रिरश्मी बुद्ध लेणी (त्रिरश्मी डोंगर)किंवा जाखीणवाडी बुद्ध लेणी (जाखीणवाडी हे कऱ्हाड येथील गावाचे नाव आहे). नंतरच्या काळात म्हणजे १७व्या शतकानंतर महाराष्ट्रातील अनेक बुद्ध लेणींवर अतिक्रमण झाले व काही लेणींचे रूपांतर मंदिरात झाले तर काही अतिक्रमणाच्या प्रचंड विळख्यात अडकले आहेत आणि त्यांना तशी "नवीन नावे" देण्यात आली आहेत. जुन्नरमधे भारतातील सर्वात मोठा बुद्ध लेणीं समूह असून तिथे

ताज्या पोस्ट

आंबेडकर Live

लोकमान्य टिळकांच्या वाड्यात बाबासाहेबांचे भोजन आणि दंगलसदृश्य परिस्थिती…

बाळ गंगाधर टिळक यांचे सुपुत्र श्रीधरपंत हे समतावादी विचारांचे समर्थक आणि युगपुरुष डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी होते.चवदार तळयाच्या सत्याग्रहास त्यांनी पाठिंबा दिला होता जर का ते अधिक आयुष्य जगले असते तर तर बाबासाहेबांच्या चळवळीतील चित्र काही औरच असते.बाबासाहेबांच्या वैचारिक प्रेरणेने श्रीधरपंत यांनी पुण्यातील टिळक वाडयात 8 एप्रिल 1928 रोजी समाज समता संघाची शाखा सुरु केली […]

आंबेडकर Live

रमा तू माझ्या आयुष्यात आली नसती तर..? बाबासाहेबांनी माता रमाईला लिहिलेले हे पत्र वाचून तुम्ही सुद्धा भावुक व्हाल

बाबासाहेब जेव्हा इंग्लंडला होते तेव्हा त्यांनी माता रमाईंना अनेक पत्र लिहिली होती. यापैकी हे एक प्रेमाचं पत्र…. प्रिय रमा, कशी आहेस रमा तू? तुझी आणि यशवंताची आज मला खूप आठवण येत आहे. तुमच्या आठवणीने माझे मन खूपच हळवे झाले आहे. मागील काही दिवसांमध्ये माझी भाषणे फारच गाजली. परिषदेतील सर्वोत्कृष्ट भाषणे, प्रभावी वक्तृत्वाचा सर्वोत्कृष्ट नमुना असे […]

आंबेडकर Live

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच आज आपल्याला दिवाळी ‘बोनस’ मिळतोय

ब्रिटिश काळात भारतातील कामगारांना गुरा-ढोराप्रमाणे वागणूक मिळत होती. कामगारांना 12-12 तास काम करावे लागत असे. एवढे कामे करून सुद्धा भारतीय कामगारांना योग्य ती वागणूक मिळत नव्हती. ब्रिटिश काळात भारतीय कामगारांना मालकाकडून प्रत्येक आठवड्याला पगार देण्याची पद्धत होती. इंग्रजांच्या आठवड्याच्या पगार नियमानुसार एका वर्षात 52 आठवडे होत असे आणि त्याप्रमाणे कामगारांना पगार मिळत असे. इंग्रजांच्या पगार […]

error: Content is protected !!