स्वत:ला बदला जगाला बदलवून तुम्हाला काय प्राप्त होऊ शकते? काय ( यामुळे ) तुम्ही पूर्णत्व प्राप्त करू शकाल? कधीच नाही. तुम्ही फक्त स्वत:बद्दल वाटणाऱ्या व्यर्थ गर्वाला आधार देत असता आणि तुमचा ‘अहंकार’ पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत असता भावसंसारात स्वत:ला गुंतवून बंधनात टाकत असता, परंतु स्वत:त योग्य सुधारणा ( बदल ) करून म्हणजे नि:स्वार्थीपणा, स्वयंशिस्त आणि स्वयंपरिश्रम यांद्वारे स्वत:चे खरे स्वरूप जाणून, तुम्ही पूर्णत्व प्राप्त करू शकाल.
अशाप्रकारचे पूर्णत्व प्राप्त केल्यामुळे तुमचे जीवन अर्थपूर्ण बनेल आणि तुम्ही दुसऱ्याची सेवासुद्धा करू शकाल, लोक तुमच्या उदाहरणाने ( जीवनाने ) प्रेरित होतील, ते तुमचे अनुगमन करतील आणि या जीवनात आपले ध्येय पूर्णत्वास नेतील, आजचा मानव भूतकाळातील लाखो विचार आणि वागणुकीचा परिणाम आहे. ‘तो बनतो आणि बनत राहतो’ यासाठी पूर्वीच तयार केला गेलेला ( Readymade ) नाही. त्याची वर्तणूक ( चारित्र्य ) त्याच्या स्वत:च्याच विचारप्रक्रियेवर ( Thinking process ) अवलंबन आहे, तो निसर्गत:च ‘ पूर्ण ‘ नाही, त्याने पूर्णत्व प्राप्त करण्यासाठी स्वत:ला प्रशिक्षित केले पाहिजे, जीवन मनुष्यापुरतेच सीमित नाही.
या विश्वात अनेक इतर जीवसुद्धा अस्तित्वात आहेत. परंतु मानवाकडे मोठी विचारशक्ती आणि तर्कशक्ती आहे, या अर्थाने ते इतर सजीवांपेक्षा श्रेष्ठ आहेत, त्यांच्याकडे त्यांचे जीवन सुधारण्यासाठी लागणारी बुद्धिमत्ता असल्यामुळे ते भौतिक दु:खापासून मुक्ती प्राप्त करू शकतात.म्हणून दुःखातून मुक्त होणे हाच जीवनाचा हेतू असल्यास मानव स्वत:च्या परिश्रमाने हे ध्येय संपादन करू शकतो. परंतु या विचार आणि तर्कशक्तीचा योग्य उपयोग केला गेला नाही तर जीवन वायासुद्धा जाऊ शकते.
भगवान बुद्धाने आपल्या उपदेशात मानवी जन्माला फारच महत्त्वपूर्ण स्थान दिलेले आहे. वास्तविक पाहता जीवन एकमेव असा अनुभव आहे की ज्याच्याशी तुलना करता येईल असे काहीच नाही. इतर कोणत्याही मौल्यवान वस्तूंनी त्याचे मूल्य मोजता येत नाही, त्याला पैशांनीसुद्धा विकत घेता येत नाही. असे असूनही या ‘अमूल्य रत्ना’ सोबत आपण कसे जगावे किंवा याचे काय करावे, हे बऱ्याच लोकांना शिकता आलेले नाही. येथे जीवन म्हणजे केवळ भौतिक शरीर किंवा इंद्रिये नसून विचारशील मानवी मनसुद्धा आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.
Very Nice thoughts