जगभरातील बुद्ध धम्म

काहु-जो-दारो : २००० हजार वर्षांपूर्वीचे प्राचीन बौद्ध शहर

काहु -जो -दारो एक प्राचीन बौद्ध शहर होते. हे बौद्ध शहर पाकिस्तान मधील सिंध प्रांतातील मिरपूर खास येथे आहे. काहु जो दारो प्राचीन बौद्ध शहर ३२ एकर परिसरात (१२०,००० स्क्वेर मीटर) वसलेले आहे. येथील उत्खनना दरम्यान येथे भव्य बौद्ध स्तूप सापडले आहे. हे प्राचीन बौद्ध स्तूप साधारणपणे २,००० वर्षे प्राचीन आहे.

कालांतराने काहु -जो -दारो स्थळाचे अनेक अवशेष स्थानिकांच्या अज्ञानातून नष्ट झाले. या स्थळाचा फक्त दोन ते तीन टक्केच भाग येथील उत्खननात सापडला आहे. पुरातत्वीय संशोधक आणि वैज्ञानिक येथे सतत संशोधन करत असतात. संशोधन करत असताना येथे भव्य बौद्ध स्तूप आणि बुद्ध शिल्प सापडत होती. सातत्याने येथे उत्खननात चित्तवेधक अनेक असे शोध लागलेली आहेत.

काहु-जो-दारो या प्राचीन बौद्ध स्थळी बौद्ध शिल्प आणि वस्तू सापडलेली पुरातत्वीय संशोधक हे संशोधनासाठी घेऊन जात. आणि राहिलेली वस्तू पर्यटकांसाठी पाहण्यासाठी सुरक्षित ठेवली आहेत. काहु-जो-दारो या प्राचीन बौद्ध स्थळी पर्यटकांची अनेकदा खूप गर्दी होत असते.

काहु -जो -दारो येथील एक स्तूपाच्या पडीक भागावर तथागत बुद्ध यांची ध्यान अवस्थेतील बुद्ध मूर्ती सुरक्षितरीत्या काढली आहे. ही प्राचीन बौद्ध मूर्ती ५-६ व्या शतकातील असून या स्तूपाच्या भागात भांडी देखील सापडली आहेत.

प्रथम हेन्री कोझेंस १८५४ – १९३३ मध्ये यांना काहु -जो -दारो या प्राचीन बौद्ध स्थळी बौद्ध अस्थी सापडल्या होत्या. परंतु या बौद्ध अस्थी तथागत बुद्ध यांच्या होती की, एखाद्या महान बौद्ध भिक्खू यांच्या होत्या हे मात्र निश्चित माहिती नव्हते.

जनरल जॉन जेकब या ब्रिटिश कमिशनर यांनी १९ व्या शतकात सिंध प्रांतात पहिल्यांदा भेट दिली होती. त्यांना तेथे प्राचीन बौद्ध स्तूपाचे भग्न अवशेष दिसले. काहु- जो -दारो या प्राचीन बौद्ध स्थळातून त्यांनी अनेक प्राचीन बौद्ध वस्तू शोधून काढले. त्यातील प्राचीन बौद्ध वस्तू आणि मूर्ती त्यांनी संग्रहालयात ठेवण्याचे ठरवले.

पाकिस्तान मधील कराची मध्ये म्युझियम बांधून प्राचीन बौद्ध वास्तुकला संग्रहालय मध्ये ठेवण्यात आली. काहु-जो-दारो येथील प्राचीन शिल्पकला सारनाथ आणि मथुरा येथील प्राचीन बौद्ध शिल्पकलेशी साम्य दर्शविते. ७- ८ व्या शतकातील शिलालेख देखील सापडले आहे. या शिलालेख “ये धम्म हेतू” हे एक बौद्ध सूत्र आहे. हा शिलालेख मातीच्या चिखलापासून बनविल्या गेलेल्या टॅब्लेटवर लिहिल्या गेले होते.

१३ व्या शतकापर्यंत बुद्ध धम्म उत्तर भारतात उत्तम रित्या होता त्या नंतर उत्तर भारतातून बुद्ध धम्माची घट होत गेली. काहु जो दारो या वास्तुकलेत स्तुपावर सजावट स्वरूपात तथागत बुद्ध यांचे भिन्न भिन्न मुद्रेतील बुद्ध शिल्प कोरलेली होती. त्यातील असंख्य मूर्ती कालांतराने तुटल्या गेली. स्तूपाच्या भिंतीवर बुद्ध शिल्प सजवली जात होती. त्या अनेक मूर्ती मधून काही मोजक्याच मूर्ती स्पष्ट अथवा अस्पष्ट स्वरूपात सापडत होत्या. आज पाहता या प्राचीन बौद्ध स्थळावरील बौद्ध स्तूपाची अवस्था वाईट असून असंख्य विटा हेतुपरस्पर तोडली किंवा चोरीला गेली आहेत.

-अनिरुद्ध गायकवाड