१) जी भाषा बोलली जात नाही तिचा जगभर अभ्यास चालू आहे.
२) त्रिपिटकाची ही भाषा आज आंतरराष्ट्रीय भाषा झाली आहे.
३) पालि भाषेच्या सर्व शाखा समृद्ध असून तेथे संशोधनाला वाव आहे.
४) भगवान बुद्ध यांच्या धम्मासबंधी सर्व माहितीचे भंडार पालि भाषेत ओतप्रोत भरले आहे.
५) नुसतेच भिक्खू नाही, तर नवीन पिढी सुद्धा ही भाषा शिकतेय.
६) पालि भाषेत वैद्यकीय शास्त्र, वास्तू संरचना शास्त्र, व्यवस्थापन शास्त्र आणि अर्थशास्त्र सुद्धा आहे.
७) जगभरातील मोठमोठ्या विद्यापीठातून पालि भाषा शिकविली जात आहे.
८) इतर कोणत्याही भाषेत पालि शब्दांचे अर्थ देता येत नाहीत.
९) पालि भाषेत अनेक शब्दांचे विविध अर्थ स्पष्ट होतात.
१०) पालि भाषा अनेक भाषांची जननी आहे.
११) ती आता फक्त बौद्ध समुदायापुरती मर्यादित राहिली नाही. पालि जातक कथांचे असंख्य भाषेत भाषांतर झाले आहे.
१२) दीडशे वर्षांपूर्वी विस्मरणात होती. आता सगळीकडे संचार आहे.
१३) इतर भारतीय भाषा सोडून फक्त या भाषेसाठी ब्रिटिशांनी पालि टेक्स्ट सोसायटीची स्थापना केली.
१४) पालि भाषेच्या स्कॉलरांचा दबदबा जगात वाढत चालला आहे.
-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – बौद्ध इतिहास अभ्यासक)