इतिहास

शेतातील खडक वाटला; परंतु खोदकाम केल्यावर बुद्ध मूर्ती

भुवनेश्वर येथील उत्कल युनिव्हर्सिटी मधील विध्यार्थ्यांना भुवनेश्वर पासून १०० कि.मी. अंतरावरील खुरदा जिल्ह्यातील गोविंदपूर गावामध्ये नाग छत्रधारी बुद्धमूर्ती उत्खननात सापडली.

बुद्धाच्या मस्तकावर चार नाग छत्राप्रमाणे असुन सदर मूर्ती १४०० वर्षे प्राचीन असल्याचे आढळून आले आहे. सदर मूर्ती ८०% जमिनीत असून पुरातत्त्व खाते तसेच युनिव्हर्सिटीतील प्राचीन भारतीय संस्कृती विभागाचे प्राध्यापक व विद्यार्थी या बाबत अभ्यास करीत आहेत.

जेना नावाच्या विद्यार्थ्याला प्रथम हा शेतातील खडक वाटला. परंतु खोदकाम केल्यावर बुद्ध मूर्ती दिसू लागली व तिचे सौंदर्य स्पष्ट दिसू लागले.

ओरिसा राज्यात रत्नागिरी व ललीतगिरी अशी प्रेक्षणीय बौद्ध स्थळे आहेत. तेथील असलेल्या मूर्ती सारखी ही मूर्ती असून प्रत्यक्ष बुद्धमूर्ती बाहेर काढल्यावर स्पष्ट होईल असे जेना यांनी सांगितले. वीस वर्षापूर्वी सुद्धा या भागातील एक शेतकऱ्याच्या शेतात नांगरताना फाळ अडकला होता. व खडक समजून त्याने दूर्लक्ष केले होते. पण नंतर तेथे बुध्द मूर्ती आढळली.

4 Replies to “शेतातील खडक वाटला; परंतु खोदकाम केल्यावर बुद्ध मूर्ती

  1. अतिशय मोलाची ही माहिती आहे, वाचताना अतिशय अभिमानाने व गर्वाने अंग रोमांचित होवून जाते. आणि मनुवाद्यांनी कितीही झाकून ठेवले तरी बुद्धांचे व बौद्ध धम्माचे अस्तित्व त्यांना झाकून ठेवता आले नाही हे मात्र सिद्ध होत आहे आणि ह्याचाच जास्त आनंद वाटत आहे.

  2. बुद्धम शरणम् गच्छामि धम्मम शरणम् गच्छामि संघम शरणम् गच्छामि

Comments are closed.