पाकिस्तानातील तक्षशिलापासून काही मैलांच्या अंतरावर असलेल्या भामळा गावाजवळ खानपूर तलावाच्या पाण्याच्या वरच्याबाजूला एक ऐतिहासिक बौद्ध शिल्प सापडले आहे. हे बौद्ध शिल्प गांधार शिल्पकलेचे उत्कृष्ट नमुना असल्याचे दिसते. भामळा येथील पुरातन स्थळी एक स्तूप सुद्धा आहे.
पुरातत्वशास्त्रज्ञांना सुरुवातीला या ठिकाणी काही अवशेष मिळाले होते. या ठिकाणी उत्खनन केल्यानंतर बुद्धांच्या शिल्पांचा शोध लागला आहे. तसेच याठिकाणी एक स्लीपिंग बुद्धाची 48 फूट लांब शिल्प सुद्धा सापडले असून ते इसवी सन दुसऱ्या किंवा तिसऱ्या शतकात कोरले असल्याचा अंदाज आहे.

पाकिस्तान सुमारे २,3०० वर्षापूर्वी बौद्ध संस्कृतीचे केंद्र होते. हा प्रदेश मौर्य सम्राट अशोकाच्या अंमलाखाली आले आणि बौद्ध संस्कृती आणि वास्तुकलेचा विपुल वारसा कायमस्वरूपी देऊन गेला.

कुषाण काळात म्हणजेच स. पू. पहिल्या शतकापासून ते इ. स. सु. पाचव्या शतकापर्यंत वास्तुकला, मूर्तिकला यांची भरभराट झाली. या कलानिर्मितीस गांधार शैली ही सर्वसाधारण संज्ञा दिली जाते. विशेष म्हणजे भगवान बुद्धाच्या प्रथम कोरीव प्रतिमा तयार केल्याचे श्रेय गांधार शैलीला जाते.

बौद्ध धम्माच्या दृष्टीने कनिष्काने मोठी कामगिरी
कुषाणवंशीय सम्राट कनिष्काच्या ताब्यात फार मोठे साम्राज्य हाते. अफगाणिस्तान, बॅक्ट्रीया, काशगर, खोतान, यारकंद हे भारताबाहेरील प्रदेश त्याच्या वर्चस्वाखाली होते.
भारतातही त्याचे साम्राज्य कौशांबी, पेशावर, बनाररस, रावळपिंडी, मथुरा, सारनाथ या भागात होते. याचबबरोबर काश्मीर, सिंध, पंजाब हे वायव्येककडील प्रदेशही होते. त्याच्या या विशाल साम्राज्याची राजधानी पुरूषपूर म्हणजे पेशावर हे शहर होते.

कनिष्काने परकीय व्यापारास उत्तेजन दिल्यामुळे व्यापार वाढला आणि देशाची भरभराट झाली. त्याच्या काळात विद्या, कला, तत्त्वज्ञान या क्षेत्रात देशाची प्रगती झाली. त्याने काश्मीरमध्ये कनिष्कपूर नावाचे शहर वसवले.
पेशावर येथे ग्रीक शिल्पकाराच्या देखरेखीखाली बुद्धावशेषांवर ६०० फूट उंचीचा लाकडी मनोरा बांधला. यालाच कनिष्क चैत्य असे म्हणतात. प्रसिद्ध बौद्ध पंडित अश्वघोष, वसुमित्र, पार्श्व हे बौद्ध दजम्माचे विद्वान त्याच्या दरबारात होते. बौद्ध धम्माच्या दृष्टीने कनिष्काने मोठी कामगिरी केलेली आहे.