इतिहास

आशिया खंडातील १८ महान बौद्ध सम्राट आणि त्यांचे कार्य

१) प्रियदर्शी अशोक – (इ. स. पूर्वी ३ री व ४ थी शताब्दी) सम्राट अशोक जगातील महानतम शासकांपैकी होते. सम्राटाने स्वतःच्या राज्यात ८४००० स्तूप उभारले. बौद्धधम्मीय पंचशीले राजाज्ञा रूपाने देशोदेशी शिलाखंडावर कोरले. धर्मसगीराचे आयोजन केले. स्वपुत्रास व स्वकन्येस श्रीलंकेस धम्मप्रचारास पाठविले. महामोगगलितिस्सयांच्याकडून संघात छदमवेषाने घुसलेल्या इतर धम्मीय श्रमणांची संघातून हकालपट्टी केली कारण ते इतर धर्मीयांच्या मते भगवंताच्या नावाने खपवीत असत. परदेशांत बौद्धधम्माच्या प्रचारार्थ भिक्खुना पाठविले. संपूर्ण भारतभर काश्मीर से कन्याकुमारीपर्यंत धम्माचा प्रचार करून धम्मराज्य स्थापित केले.

प्रियदर्शी सम्राट अशोक आणि सम्राट मिलिंद (मिनाण्टर)

२) धर्मराज मिलिंद – (इ.स. पूर्व २ री व ३ री शताब्दी) त्यांनी उत्तर भारतात विशाल साम्राज्य स्थापित केले आणि सिकंदराहूनही अधिक प्रदेश जिंकला. स.मिलिंद (मिनाण्टर) अतिशय विद्याव्यासंगी होता. तो कोणत्याही विद्वानासोबत शास्त्रार्थ करून त्यास हरवीत असे. परंतु बौद्ध भिक्खू नागसेन यांनी त्याला शास्त्राथाँत हरवून बौद्ध धर्माची तत्वे अत्यंत कुशल त-हेने पटवून दिलीत. त्यांच्या शास्त्रार्थाचा ग्रंथ मिलिंद पन्ह (मिलिंद प्रश्न) या नावाने प्रसिद्ध आहे. ह्या ग्रीक राजाचा जन्म अलेक्झांड्रियामध्ये झालेला होता.

३) कनिष्क – सम्राट कनिष्क कुषाण वंशाचा असून इ. सनाच्या प्रथम शताब्दी मध्ये इ. स . ७८ ते १२० पर्यंत राज्यकारभार केला. या ग्रीक राजाने बौद्धधम्माचा स्वीकार केला व चतुर्थ संगीतीचे आयोजन केले. आचार्य वसुमित्र संगीतीचे अध्यक्ष आणि महाकवी अश्वघोष उपाध्यक्ष होते. सुत्तपिटक, विनयपिटक आणि अभिधम्मपिटक यांना लिपिवद्ध करण्यांत आले. स. अशोकानंतर स. कनिष्क सर्वात श्रेष्ठ बौद्ध नरेश आणि बौद्धधामाचे संरक्षक गणले जातात. स. कनिष्काच्या काळापासूनच सर्वप्रथम बुद्ध प्रतिमा बनवायची प्रथा सुरू झाली. त्याचा मुलगा हुविष्क यानेदेखील बौद्धधम्मास चालना दिली.

सम्राट कनिष्क आणि सम्राट हर्षवर्धन

४) हर्षवर्धन – (इ. स. ६ वी आणि ७ वी शताब्दी) बौद्धधम्माची बरीच सेवा केली. नालंदा विश्वविद्यालयासाठी पुष्कळ दानपुण्य केले. त्याच्या काळी ४५०० संघाराम होते व त्यांत ३ लक्ष भिक्खू निवास करीत असत. त्याच्या ५० वर्षांच्या राज्यकाळात बौद्धधम्माचा खूप प्रचार-प्रसार झाला.

५) अंसुवर्मा – नेपाळच्या सातव्या शताब्दीचा राजा, प्रथम बौद्ध नरेश होता.

अंसुवर्मा आणि स्पॉंग – त्संग-गम् पो

६ स्पॉंग – त्संग-गम् पो – ( इ. स. ६१७ ) तिबेटचा प्रथम सम्राट. त्याने तिबेटमधील भटक्या जमातींना सुसंस्कृत करून बौद्धधमाचा प्रसार केला.

७) लिआंग सम्राट ऊ – ती – (इ. स. ५०० ते ५५०) चिनी बौद्ध धर्माच्या इतिहासातील उत्कृष्ठ युग, त्याने बौद्धधर्मास राजधर्माचा दर्जा दिला.

८) वांग किएन् – कोरियाचा स. वांग किएन् (इ. स. ९३५) ह्याने बौद्ध धम्मास राजाश्रय दिला. त्याने विशाल आणि अद्भुत बौद्ध विहारांची स्थापना केली. त्याने स्थापलेल्या विहारांपैकी एक चतुष्कोण पाषाण स्तूप अजूनही बघावयास मिळतो.

९) शोतोकू – ( इ. स. ५९२ ) सम्राट शोतोकू यास जपानचा धर्म-अशोक म्हणतात. त्याने कोरियाच्या भिक्खू हो-चे कडून बौद्धधम्माचे शिक्षण घेतले. बौद्धधम्मास राज्यधर्म घोषित केले. एक विहार , एक आश्रम आणि एक चिकित्सालय याप्रमाणे सर्व राज्यभर विद्येचा आणि आरोग्याचा प्रसार केली . आठ विश्वविद्यालयांची स्थापना केली.

१०) धम्मचेती – ( इ. स. १४५० ) भिक्षु धम्मचेती ह्याने भिक्खू जीवनाचा त्याग करून राज्यकारभार सांभाळला आणि ब्रह्मदेशात बौद्धधम्माच्या इतिहासात एक नवीन अध्याय जोडला त्याने ब्रह्मदेशाच्या भिक्खूना श्रीलंकेला पाठवून तेथून उपसंपदा घ्यावयास मदत केली व त्यानंतर १६,००० भिक्खूनी त्यांच्याद्वारे उपसंपदा घेतली.

११) दुगामणी – सिंहल सम्राट दुड़गामणी ( इ. स. पूर्व १०१ – १७७ ) त्याने प्रदेश काबीज करावयास अनेक लढाया केल्या. परंतु शेवटी धम्माच्या उन्नतिकरिता विहार, चैत्य आणि विशाल भवनांचे निर्माण केले. त्यास राष्ट्रीय वीर म्हणतात.

१२) पराक्रमबाहू – (११२० – ४०) चूलवंश या ग्रंथामध्ये त्याच्या पराक्रमाचे वर्णन आहे. त्याने चार महान कार्ये केलीत. बौद्धधम्माची पुनस्र्थापना, सामंतांच्या सुरक्षेची व्यवस्था, शरणागतांचे रक्षण आणि जनतेस सुखी करणे, त्याच्या काळात गृहनिर्माण कलेची खूप प्रगती झाली.

१३) कुबिले खान – सम्राट कुबिले खान ( इ. स. १२५० – ९० ) तो हूण वंशाचा मंगोलिया चा वीर सम्राट होता. दोलोन नदीच्या उत्तरेस पश्चिम शांगतोन प्रांतात ३००० बौद्ध भिक्खू आणि २०१ तावो आणि २०० कन्फ्यूशयी भिक्खुद्वारे बौद्ध संमेलन आयोजित केले. तेव्हा तावो भिक्खू बौद्ध भिक्खू झाले. चीनमध्ये आधीपासून बौद्धधम्माचा प्रसार होता, परंतु कुबिले खानाने तिबेटच्या भिक्खूना आमंत्रित करून प्रसार केला. त्याने मंगोल भाषेत बौद्ध ग्रंथांचे भाषांतर करविले, तसेच चिनी अनुवाद करविले. त्याच्या साम्राज्यात पंजाबमधील बराच प्रदेश सामील होता.

सम्राट कुबिले खान आणि सूर्यवंशराम

१४) सूर्यवंशराम – ( इ. स. १३५० ) सयाम देशामधे बौद्धधम्माची खूप प्रगती झाली. सयाम ( = थायलंड ) मध्ये बौद्धधम्म इ. सनाच्या प्रथम शताब्दीमधेच पोहोचला होता. त्याने सयामी लिपी तयार केली. त्याने अनेक विहार बनविले. मुख्य विहारात अठरा हात उंचीची भ. बुद्धांची उभी मूर्ती बसविली. त्याने स्वतः प्रव्रज्यादेखील घेतली. राजधानी सुखोजईस जाण्यास सडकांचे निर्माण केले.

१५ ) जयवर्मा सप्तम – ( इ. स. ११८० – १२२० ) कम्बोजचा राजा अत्यंत श्रद्धाळू बौद्ध होता. त्याला कम्बोजचा अशोक म्हणतात. ज्याप्रमाणे हर्षवर्धनाच्या काळात वार्षिक आणि त्रैवार्षिक बौद्ध उत्सव करीत असत, तसेच उत्सव तो भरवीत असे.

१६) फान्यून – ( इ. स. १३५० – १३७५ ) लाओस देशात बौद्धधम्माची स्थापना केली.

१७ ) इन्द्रवर्मा द्वितीय – ( इ. स. ८६० – ८९० ) चंपा प्रदेशात बौद्धनरेश म्हणून प्रसिद्धी मिळाली.

१८ ) श्री विजयनाग – ( ई. स. ३८० – ६०० ) सुमात्रा द्वीपसमूहांचा राजा.

संदर्भ : बुद्धधम्म जिज्ञासा

8 Replies to “आशिया खंडातील १८ महान बौद्ध सम्राट आणि त्यांचे कार्य

 1. महाराष्ट्रात इ.स.पहिल्या शतकापासून तर बाराव्या शतकापर्यंत सातवहान घराण्याची सत्ता राहिली सातवहान हे महार नागवंशीय बौद्ध राजे होते महाराष्ट्रात बुद्धलेण्या त्यांच्याच काळात कोरल्या हा इतिहास जाणिवपुर्वक इतिहास संशोधक का लपवता?

  1. यावर आपण लेख दिला तर आम्ही तो प्रकाशित करू… आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत खरा इतिहास, बौद्ध संस्कृती आणि विचार पोहचवण्याचा प्रयत्न करीत आहोत. आमच्याकडे जे लेख येत आहेत ते प्रकाशित करीत आहोत. हळूहळू सर्व इतिहास प्रकशित करू…पण आपण जाणीवपूर्वक इतिहास लपवण्याचा आरोप कोणत्या आधारावर करत आहात? आम्ही पण बौद्ध आहोत…आम्ही इतिहासकार किंवा संशोधक नाही. फक्त भगवान बुद्ध आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पोहचवण्याचे माध्यम आहोत.

   1. नमोबुद्धाय जयभीम
    वरील टिपण्णी नुसार महाराष्ट्र मधील बहुतेक लेण्या या हिन्दू संस्कृतीला आधारूण आहेत अस sangital जात बऱ्याच लेण्या बाहेर हिन्दू देव देवतांचे (myth)चित्रकृति आढळते. हा सर्व खरा इतिहास जनतेसमोर जान गरजेचा आहे

 2. This is the very best news ever the Buddhism followers.
  Due to you the effects of all the eighteenth empower and empowerment.persons today 40% population of the world understand the buhhisum and following the great path of lord Buddha

 3. 1985 ला आम्ही collage ट्रीप मध्ये कार्ला लेणे लोणावळ्याला गेलो होतो tevanha एकवीरा देवीचे मंदीर हे साधारण तीन ते चार फूट असावे . पण आता त्या ठिकाणी खूप सुंदर आणि मोठं मंदीर बांधलं आहे .ते 1995 ला .सेना bjp चे सरकार आल्यानंतर बांधले आहे .तसेच नाशिक मधील पांडव लेणे देखील तसेच आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *