इतिहास

संत तुकाराम बौद्ध लेण्यांमध्ये जाऊन ध्यान करीत

संत तुकाराम देहूजवळच्या भंडारा आणि भांबनाथ या डोंगरांवर जाऊन ध्यान करीत असत, हे प्रसिद्धच आहे. या डोंगरांवर ते ज्या ठिकाणी ध्यान करीत, ती ठिकाणे ही बौद्ध लेणी आहेत, हे अगदी स्पष्ट आहे . आजही भंडारा डोंगराच्या उतारावर कपाट म्हटल्या जाणा-या ठिकाणी बौद्ध लेण्यासमोर बौद्ध स्तूप आहे, अन्यत्र स्तूपांसमोर असतो तसा जलकुंड आहे. तुकाराम या लेण्यातच […]

इतिहास

पालि गाव आणि पालि भाषा यांचा संबंध आहे काय?

भगवान बुध्दांच्या काळात जो धर्मोपदेश झाला तो पालि भाषेतून केला गेला. जनसामान्यांची ही भाषा असल्याने बुद्धांची वचने, गाथा, उपदेश हे सर्व पालि भाषेत लिहिण्यात आले. यामुळे पालि आणि बौद्ध धम्म यांचा अतूट बंध तयार झाला. त्याच बरोबर असे ही दृष्टिपथात येते की ‘पालि’ नावाची असंख्य गावे भारतात आहेत. यास्तव शंका येते की पालिभाषा आणि ही […]

आंबेडकर Live

माणूस हा जन्मत: मोठा नसतो, मोठेपण प्राप्त करावे लागते

माणसाचा जन्म त्याच्या हाती नसतो. कूळ, वंश, जात, धर्म हे त्याला जन्मतः चिकटतात. यातून त्याची सुटका नसते. परंतु कर्तृत्व मात्र त्याच्या हातात असते. हे कर्तृत्व माणसाला एकतर अपयशाच्या गर्तेत लोटते अथवा कीर्तिमंदिराच्या कळसाचे भाग्य प्रदान करते. जगातील महापुरुषांची चरित्रे वाचताना ही बाब आपल्या लक्षात येते की कोणीही माणूस हा जन्मत: मोठा नसतो. मोठेपण प्राप्त करावे […]

इतिहास

मिलींद हा बौद्ध धम्माची दीक्षा घेतलेला पहिला परकीय (ग्रीक) सत्ताधीश होता

मिनँडर उर्फ मिलींद (इ.स. पू.२०६ ते इ. स. पू. १३० ) हा ग्रीक वंशीय भारतीय राजा पंजाब, मथुरा या प्रदेशावर साधारणत: इ. स.पू.१६५ ते इ.स.पू.१३० पर्यंत राज्य करणाऱ्या ग्रीक राजांमध्ये सर्वात उल्लेखनिय राजा होता. यालाच मिनँडर पहिला असेही संबोधले जाते. मिलींद हा बौद्ध धम्माची दीक्षा घेतलेला पहिला परकीय ( ग्रीक ) सत्ताधीश होता. “मिलींदो पन्हो […]

ब्लॉग

लोरिया नंदनगढ येथील अशोकस्तंभ आणि स्तूप

‘लोरिया नंदनगढ’ हे छोटे शहर बिहार राज्यात चंपारण जिल्ह्यामध्ये असून ते नरकटीगंज पासून १४ कि.मी. अंतरावर व बेटिया पासून २८ कि.मी. अंतरावर आहे. हे शहर बु-हीगंडक नदीजवळ वसले असून तेथे पुरातन सुस्थितील वालुकामय दगडातील अशोकस्तंभ आहे. हा अशोकस्तंभ दहा मीटर उंचीचा असून अद्याप चमकदार आहे. तसेच यावरती ब्राम्हीलिपीमधील लेख आहेत. स्तंभापासून दोन कि.मी.वर वायव्य दिशेस […]

इतिहास

‘वीर शिवाजी के बालक हम’ १९५३ साली महार रेजिमेंटचे हिंदी संचलनगीत…

ले.कर्नल घाशीराम यांनी सागर येथे ३० नोव्हेंबर १९५३ ला महार रेजिमेंटल सेंटरचे नेतृत्व स्वीकारले. त्यांनी सेंटरमध्ये उपयुक्त योजना सुरू केल्या. त्यांनी हिंदी महार सैनिक संचलनगीत ‘महार सैनिक’ हे स्वत:रचले व ‘ A Marching Song of Mahar Sainik म्हणून प्रचारात आणले. ते गीत असे… वीर शिवाजी के बालक हम, हैं महार सैनिक हम, हम, हम। ना […]

इतिहास

अद्वितीय शिष्य आनंद; बौद्ध इतिहासात आनंदाचे योगदान जाणून घ्या!

या जगात असंख्य गुरू होऊन गेले पण भगवान बुद्धांसारखे गुरु या जगात झालेले नाहीत. तसेच अनेक गुरूंचे अनेक शिष्य होऊन गेले परंतु आनंद सारखा बुद्धांचा शिष्य या जगामध्ये झालेला नाही. बौद्ध इतिहासात आनंदाचे योगदान अद्वितीय आहे. तो होता म्हणून पहिली धर्मसंगिती यशस्वी झाली आणि बुद्धवचने सुरक्षित झाली. तो होता म्हणून स्रियांना संघात प्रवेश मिळाला. तो […]

जगभरातील बुद्ध धम्म

या मोठया शिळेवर खरोष्टी भाषेत सम्राट अशोकाचे शिलालेख

शाहबाझ गढी हे निसर्गरम्य गाव पाकिस्तान मधील मर्दन शहरापासून १२ कि. मी. अंतरावर आहे. आजूबाजूला हिरवीगार कुरणे, उशाला टेकडी, गावातून वहात असलेली नदी यामुळे प्राचीन काळापासून येथे प्रवासी थांबत असत. याच गावात दोन मोठया शिळेवर खरोष्टी भाषेत लिहिलेले सम्राट अशोकाचे शिलालेख आहेत. इ.स. ६३० मध्ये चिनी प्रवासी हुएन त्संग जेव्हा इथे आला होता तेव्हा त्याने […]

जगभरातील बुद्ध धम्म

बटकारा स्तूप मौर्य सम्राट अशोक राजाच्या काळानंतर बांधला होता

पाकिस्तानात स्वात खोऱ्यात अनेक ऱ्हास झालेले स्तूप आहेत. इतिहासातील या मौल्यवान व पूजनीय स्तुपांबाबत त्यांना काही घेणेदेणे नाही. स्वतःच्या पूर्व इतिहासाची जाणीव नाही. खोदकाम करताना सापडलेल्या अनेक छोट्या बुद्धमूर्तीची तस्करी करण्यात ते पटाईत. मिंगोरा जवळ असाच एक महत्वाचा ऱ्हास झालेला स्तूप आहे. त्याचे नाव बटकारा. हा स्तूप मौर्य सम्राट अशोक राजाच्या काळानंतर बांधला होता. या […]

जगभरातील बुद्ध धम्म

श्रीलंकेच्या घटनेमध्ये बुद्धिझम नेहमीच अग्रस्थानी असल्याचे सरकारकडून जाहीर

श्रीलंकेचे प्रधानमंत्री रानील विक्रमसिंघे यांनी २०१८ मध्ये नुयॉर्क येथे भरलेल्या सागर परिषदेमध्ये जाहीर केले की श्रीलंकेच्या घटनेमध्ये बुद्धिझम नेहमीच अग्रस्थानी राहील. त्या अगोदर जानेवारी २०१८ मध्ये श्रीलंका सरकारने जाहीर केले होते की श्रीलंकेतील सर्व प्रांताच्या विकासासाठी स्थानिक प्रतिनिधींना खास अधिकार बहाल करण्यात येतील. यामध्ये तामिळ लोकसंख्या असलेला जाफना प्रांत देखील होता. त्या अनुषंगाने घटनेचा नवीन […]