बुद्ध तत्वज्ञान

अवकाशातील विश्वाबद्दल अडीज हजार वर्षांपूर्वीच भगवान बुद्धांनी सांगितले होते

आपली सूर्यमाला एका मोठया ‘मिल्की वे’ आकाशगंगेत आहे. अशा या आकाशगंगेत सुर्यासारखे लक्षावधी तारे आहेत. त्यातल्या हजारो ताऱ्याभोवती आपल्या सारखी ग्रहमाला असू शकेल.आणि अशा अनेक आकाशगंगा एका दीर्घिकेमध्ये आहेत. सध्या एकूण वीस दीर्घिकांचा कळप असल्याचे शास्त्रज्ञानां कळून आले असून अवकाशाचे हे कुरण वाढतच चालले आहे. हबल दुर्बिणीतून असंख्य गोष्टी उजेडात आल्या आहेत. यातील प्रत्येक दीर्घिके […]

इतिहास

भगवान बुद्धांचा दहावा वर्षावास – रक्खीत वनखंड, भाग 12

नववा वर्षावास संपल्यानंतर, बुद्धांनी कोसंबी मध्ये काही काळ व्यतीत केला. त्याच काळात, दहाव्या वर्षावासाची सुरुवाती दरम्यान बुद्धांच्या भिक्खू संघात दोन गट पडले. एका शुल्लक कारणांवरून – एका छोट्याश्या चुकीमुळे त्या भिक्खूला कोणता दंड द्यावा, यावरून भिक्खू संघामध्ये वाद झाले आणि दोन गट पडले. बुद्धांना जेव्हा हे समजले तेव्हा त्यांनी सगळ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही […]

बुद्ध तत्वज्ञान

किसा गौतमी : सर्व अनित्य आहे. हाच सृष्टीचा नियम आहे

किसा गौतमीचा विवाह एका व्यापारी पुत्राशी झाला होता. विवाहानंतर ती पुत्रवती झाली. हिंड फिरू लागण्यापूर्वीच दुर्भाग्याने तिचा पुत्र सर्पदंशाने मृत्यू पावला. तिने पूर्वी कधीही मृत्यू पाहिला नव्हता., त्यामुळे आपला पुत्र मृत्यूस प्राप्त झाला यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. सर्पदंश झाल्यास्थानी दिसणारा लहानसा लाल डाग हा तिच्या पुत्राच्या मृत्यूचे कारण असेल असे तिला म्हणून आपल्या पुत्राचे […]

बुद्ध तत्वज्ञान

आत्मा आणि पुनर्जन्म या सिद्धांताचे आलोचक

तथागताची देशना होती की, आत्मा नाही. तथागताची अशीही मान्यता होती की पुनर्जन्म आहे. बुद्ध परस्पर विसंगत अशा दोन सिद्धांताचा पुरस्कर्ता आहे असे दोषारोपण करणारे काही कमी नव्हते. त्यांचा असा युक्तिवाद होता की, जर आत्मा नाही तर पुनर्जन्म कसा शक्य आहे. परंतु यात विसंगती नाही. आत्म्याचे अस्तित्व नसतानाही पुनर्जन्म शक्य आहे. आंब्याची कोय असते. ही कोय […]

बुद्ध तत्वज्ञान

भिक्खूने महत्त्वांच्या व्रतांचे पालन केले नाही तर तो भिक्खू राहणार नाही

बुद्धाच्या धम्मप्रचार योजनेत धम्मदीक्षेचे दोन आयाम आहेत. अन पहिली दीक्षा म्हणजे भिक्खूची दीक्षा. भिक्खूना सामूहिकरित्या संघ म्हणून संबोधिले जाते. दुसरी दीक्षा म्हणजे गृहस्थांची ‘उपासक’ म्हणून दीक्षा. हे उपासक सामान्य धम्मानुगामी होत. भिक्खू आणि उपासक यांच्या जीवनपद्धतीत प्रमुख चार भेद आहेत. अन्य सर्व बाबतीत मात्र दोहोंचीही जीवनपद्धती समान आहे. उपासक हा गृहस्थच राहतो तर भिक्खू गृहत्याग […]

बुद्ध तत्वज्ञान

कुशल कर्म करण्याचे प्रयोजन; कुशल कर्म म्हणजे दान, शील आणि संयम

एकदा तथागत भिक्खूना उद्देशून म्हणाले, “भिक्खूनो, कुशल कर्म करण्याचे भय वाटू नये. कुशल कर्म हे सुखाचेच दुसरे नाव आहे. कुशल कर्म म्हणजे इप्सित साध्य होणे होय. प्रेयसाची प्राप्ती होय. आनंदाची उपलब्धी होय. श्रेयसाची प्राप्ती होय. भिक्खूनो, मी याचा स्वयं साक्षी आहे की, मी माझ्या कुशल कर्माची, प्रेयस, श्रेयस आणि आनंददायी फळे चिरकाळापासून भोगत आहे.” “मी […]

जगभरातील बुद्ध धम्म

या देशात बुद्ध पौर्णिमेला मद्यविक्री बंद केली जाते; मग भगवान बुद्ध तर भारतातील असूनही…?

या वर्षी बुद्ध पोर्णिमा १८ मे रोजी बऱ्याच देशांत साजरी करण्यात आली. यावेळी आशियातील जवळजवळ सर्व बौध्द देशात मद्यपानगृहे व वारूणी विक्री बंद होती. थायलंड देशात सुध्दा बुद्ध पौर्णिमेचा मोठा महोत्सव असल्यामुळे त्यादिवशी सर्व मद्यगृहे बंद होती. तिथल्या पंतप्रधानांनी दिनांक २२ जानेवारी २०१५ रोजी आदेशच निर्गमित केले आहेत की देशातील भगवान बुद्धांच्या ५ सणांदिवशी संपूर्ण […]

इतिहास

१४०० वर्षांपूर्वी नोंद केलेली ही ‘बुद्ध’मूर्ती सापडली तर जगातली सर्वात मोठी ‘बुद्ध’मूर्ती असेल

धम्मचक्र टीम: अफगाणिस्तान मधील बामियान शहराजवळ चौथ्या आणि पाचव्या शतकात बनवलेल्या बुद्धांच्या दोन उभ्या मूर्त्या होत्या. या मूर्त्यांची गणना जगातील भव्य बुद्ध मूर्त्यां मध्ये होत असे. मार्च २००१ मध्ये अफगाणिस्तानच्या जिहादी संस्था तालिबानच्या मुल्ला मोहम्मद उमरच्या सांगण्यावर या मूर्त्या डायनामाइटने उडवल्या गेल्या. ताज्या इतिहासातील सर्वात मोठे शोकांतिक उदाहरण म्हणजे या विशाल बुद्ध मूर्तींचा नाश करण्याचा […]

इतिहास

भगवान बुद्धांचा नववा वर्षावास – कोसंबी, भाग ११

श्रावस्तीला असताना भ.बुद्धांना कोसंबीचे तीन श्रेष्ठ व्यापारी – घोसित, कुक्कुट आणि पावारीक हे भेटायला आले होते. बुद्धांची देशना झाल्यानंतर या तिघांनी बुद्धांना कोसंबी येथे वर्षावास करण्याची विनंती केली जी बुद्धांनी मान्य केली. संसुमारगिरी येथील वर्षावास संपल्यानंतर बुद्ध चारिका करत कोसंबी नगरीत पोहचले. कोसंबी ही बुद्धांच्या काळी प्रमुख सहा महानगरांपैकी एक होती. कोसंबी पासून राजगृह, श्रावस्ती, […]

ब्लॉग

बौद्ध देशांची एकजूट या निमित्ताने दिसून आली; बुद्ध सूत्रांचे पर्वतावर पठण

एखाद्या शांत सुंदर निसर्गरम्य पर्वतराजीत गेलात आणि तेथील शिखरावर धीरगंभीर आवाजात बुद्ध वंदना म्हणालात किंवा महामंगल सुत्त किंवा जयमंगल अठ्ठगाथा यांचे जर पठण केलेत, तर बघा आसमंतात कंपने होऊन किती छान प्रतिसाद मिळतो. चित्तवृत्ती उल्हासित होतात. अंगावर रोमांच येतात. याचा प्रत्यक्ष अनुभव चीन, जपान, दक्षिण कोरिया, व्हिएतनाम, नेपाळ आणि भारतातील भिक्खूंनी बुद्धभूमीत घेतला. दीड वर्षांपूर्वी […]