भारतीय पुरातत्व सर्वेक्षण संस्थेने (एएसआय) कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यातील महत्त्वाचे बौद्ध स्थळ असलेल्या सन्नती मध्ये उत्खननात भारतातील सर्वात मौल्यवान शिल्प-पोर्ट्रेट सापडले होते. ते सापडलेलं मौल्यवान शिल्प भारतातील महान सम्राट अशोकाचे होय. सन्नती मध्ये केलेल्या उत्खननात सापडलेलं मौर्य सम्राटाचे हे शिल्प एकमेव उपलब्ध शिल्प आहे. मात्र प्रशासनाच्या उदासीनतेमुळे हे शिल्प सुरक्षित राहिले नाही. असे वृत्त नुकतेच ‘द […]
Day: October 26, 2019
देशातील सर्वात उंच भगवान बुद्धांची मूर्ती ‘या’ राज्यात होणार; काम सुरु
बिहार राज्यात नवादा- हिसुआ रस्त्यावर देशातील सर्वात उंच बुद्धमूर्तीचे काम सुरु आहे. हे काम २०१७ पासून सुरु असून वट थाई नालंदा फाउंडेशनतर्फे ही बुद्ध मूर्ती तयार केली जात आहे. बोधगयाचे दीपक कुमार गौर हिसुआमध्ये भगवान बुद्धांची १०८ फूट उंच मूर्ती तयार करण्याचे काम करत आहेत. बुद्धमूर्ती गया-नवादा रोडवरील हिसुआ रेल्वे क्रॉसिंगजवळ तयार करण्यात येत आहे. […]
अतिवृष्टीमुळे विशाखापट्टणम येथील थोतलाकोंडा बौद्ध स्तूप ढासळला
ऑक्टोबर संपत आला तरी पावसाची दररोज हजेरी लावणे चालू आहे. त्यातच चक्रीवादळामुळे मागील चोवीस तासात झालेल्या मुसळधार पावसामुळे विशाखापट्टणम येथील विझाग स्थळी असलेला दोन हजार वर्षांपूर्वीचा जुना स्तुप नुकताच ढासळला. हा स्तुप विशाखापट्टम येथील भामिली बीच जवळ आहे. हे एक पुरातन बौद्धस्थळ असून ते पुरातत्व खाते, आंध्रप्रदेश यांच्या अधिपत्याखाली आहे. या अगोदरही हा स्तूप ढासळला […]