इतिहास

सम्राट अशोकाचे प्रमुख १४ शिलालेख

संपूर्ण जगात आपल्या असामान्य कर्तृत्त्वाने “सम्राटांचा सम्राट” हा गौरवोद्गार लाभलेला हा एकमेव सम्राट! राज्याभिषेकाच्या ९व्या वर्षी, शस्त्र म्यान करून केवळ मैत्री आणि धम्माच्या विचारांवर जवळपास ४० वर्षे राज्य करणारा जगातील हा एकमेवादित्य सम्राट होय. भारतातील सर्वात पहिला लेख, सर्वात पहिली लेणीं, शिल्पकला, स्तूपस्थापत्य, अतिशय गुळगुळीत करून उभारलेले स्तंभ, महामार्गाच्या दुतर्फा झाडे, मनुष्य व प्राण्यांसाठी दवाखाने […]

ब्लॉग

भिक्खू ह्यूएन-त्संग यांच्या खडतर प्रवासावरील चित्रपट

चीन मधील पौराणिक साहित्यातून ‘पश्चिमेचा स्वर्ग’ म्हणजेच भारताबद्दल बरेच काही लिहून ठेवलेले आहे. चिनी लोकांना भारताबद्दल आदर वाटण्याचे एकमेव कारण म्हणजे हा देश शाक्यमुनी गौतम बुद्धांचा आहे. याच देशात त्यांचा जन्म झाला. येथेच त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. आणि येथेच मानवाच्या कल्याणासाठी त्यांनी धम्मज्ञान दिले. इ.स.६७ पासून चीनमध्ये बौद्ध धम्माच्या प्रचाराचे काम सुरू झाले. तेव्हापासून धर्मप्रसारासाठी अनेक […]

जगभरातील बुद्ध धम्म

आयरिश भिक्खू ‘धम्मलोक’ यांचे कार्य

२ मार्च १९०१च्या पोर्णिमेच्या दिवशी मॅनमार (ब्रह्मदेश) मधील प्रसिद्ध श्वेडगॉन पॅगोडा मध्ये एक ब्रिटिश पोलीस बूट घालून तेथील विहारामध्ये गेला. तेव्हा एका आयरिश गोऱ्या भिक्खूने ते पाहिले आणि त्याला नम्रपणे तात्काळ पायातील बूट बाहेर काढण्यास सांगितले. श्वेडेगॉन पॅगोड्याचा अनादर केला हे त्या भिक्खूंना बिलकुल आवडले नाही. ही बातमी लगेच रंगूनमध्ये पसरली. लोकक्षोभ झाला. या प्यागोड्यात […]

ब्लॉग

महापरित्राण पाठ ; कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर मन संतुलित राखणे आवश्यक

अलीकडचे वैद्यकीय शास्त्र मानते की बरेचसे ९० टक्के आजार हे मानसिक अवस्थेमुळे होतात. मनाची अवस्था जर सुदृढ असेल तर शारीरिक आजार होत नाहीत. मन खंबीर असेल तर शरीरात रोगराईला प्रतिबंध असणारी यंत्रणा कार्यरत होते. मात्र १० टक्के आजार हे बाहेरील वातावरणामुळे शरीरावर होतात. मन ज्याप्रमाणे शरीराला आजारी पाडते त्याचप्रमाणे ते शरीराला ठीक देखील करते. एखादा […]

ब्लॉग

यावर्षीची ‘भीमजयंती’ कशी साजरी करायची?

कालच्या ‘जनता कर्फ्यू’ला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर महाराष्ट्रातील करोनाबाधितांची संख्या ७६ वरुन १०० पर्यंत पोहचली आहे. पुढील एक महिना अतिशय क्रिटीकल आहे. आत्मघाताकडे जाणारा हा झुंडशाहीचा देश स्वत:ची कबर खोदण्यात लागलेला आहे. त्यासाठी रक्तपुरवठा, आरोग्य सेवांच्या बाबतीत आतापासून सतर्क राहून काम करणे अत्यावश्यक झाले आहे. पुढच्याच महिन्यात, १४ एप्रिल रोजी विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती […]

इतिहास

सम्राट अशोक आणि अशोक वृक्ष

भारतीय नवीन वर्ष चैत्र महिन्यापासून सुरू होते. चैत्र महिन्यात वृक्षांना, झाडांना नवी पालवी फुटू लागते. झाडे हिरवीगार दिसू लागतात. वसंत ऋतू चालू होतो. आणि याच कालावधीत भारतीय सम्राट अशोक यांची जयंती येते, हे आनंददायक आहे. देवांनापिय सम्राट अशोक महाराज यांचा जन्म चैत्र शुक्ल अष्टमीला झाला, असे मानण्यात आले आहे. त्यानुसार येत्या १ एप्रिल रोजी सम्राटांची […]

बातम्या

कोरोना व्हायरस आणि बौद्ध जगत

कोरोना व्हायरसमुळे बौद्ध जगतात काय काय घडामोडी गेल्या दहा दिवसात झाल्या त्याची ही माहिती. १) मे महिन्यात थायलंडमध्ये होणारा संयुक्त राष्ट्र परिषदेचा १७ वा वैशाख दिवस समारंभ रद्द करण्यात आला आहे. थाई संघ वरिष्ठ परिषदेने याबाबत पत्रक जारी केले आहे. या अगोदर ११ वेळा हा समारंभ थायलंडमध्ये झाला होता व मागच्या वर्षी तो व्हिएतनाम मध्ये […]

इतिहास

बौद्ध धर्माची मराठीतील पहिली तीन पुस्तके कोणती?

महाराष्ट्र हे ऐतिहासिक व सांस्कृतिक दृष्ट्या भारतातील एक वैभवसंपन्न राज्य आहे. या महाराष्ट्र राज्यात प्राचीन भूषणास्पद असलेली मुख्य गोष्ट म्हणजे येथील दऱ्याखोऱ्यात पसरलेल्या कोरीव लेण्या. भारतातील जवळपास बाराशे लेण्या पैकी ८०० लहान-मोठ्या लेण्या महाराष्ट्रात आहेत. यातील काही लेण्यांनी जागतिक वारसा यादीत स्थान मिळविले असून काही आजही उपेक्षित आहेत. तसेच नवीन लेण्यांचे शोध ही लागत आहेत. […]

ब्लॉग

भीमजयंतीवर कोरोना व्हायरसचे सावट….आता जयंती साजरी कशी करायची?

सर्वांना जयभीम, नमो बुध्दाय… जगभरात कोरोना नावाच्या व्हायरसने थैमान घातले आहे. आता राज्यात सुद्धा काही कोरोनाचे संसर्ग झालेले रुग्ण आढळले आहेत. घाबरून जाण्याचे कारण नाही, मात्र सर्वांनी काळजी घ्यावी. राज्य सरकार सुद्धा कोरोना संसर्ग झालेल्या लोकांची आवश्यक ती काळजी घेत आहे. अफवांना बळी पडू नका! भीमजयंती साजरी कशी करणार? बाबासाहेबांनी आपल्याला सर्वात मोठा संदेश दिलाय […]

बातम्या

नेपाळमधील सम्यक महादान महोत्सव; दर बारा वर्षांनी भरतो

पाटण येथे नुकताच ‘सम्यक महादान’ हा महोत्सव २६ व २७ फेब्रुवारी रोजी मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात आला. मात्र हे ‘पाटण’ सातारा जिल्ह्यातील नसून ते नेपाळमधील आहे. त्याला ‘पटण’ असे देखील म्हणतात तसेच त्याचे दुसरे नाव ‘ललितपुर’ असे सुद्धा आहे. या महोत्सवात दिपंकर बुद्ध यांच्या प्रथम प्रतिमा तयार करून पूजल्या जातात. येथे असे मानले जाते की […]