जगभरातील बुद्ध धम्म

काहु-जो-दारो : २००० हजार वर्षांपूर्वीचे प्राचीन बौद्ध शहर

काहु -जो -दारो एक प्राचीन बौद्ध शहर होते. हे बौद्ध शहर पाकिस्तान मधील सिंध प्रांतातील मिरपूर खास येथे आहे. काहु जो दारो प्राचीन बौद्ध शहर ३२ एकर परिसरात (१२०,००० स्क्वेर मीटर) वसलेले आहे. येथील उत्खनना दरम्यान येथे भव्य बौद्ध स्तूप सापडले आहे. हे प्राचीन बौद्ध स्तूप साधारणपणे २,००० वर्षे प्राचीन आहे. कालांतराने काहु -जो -दारो […]

ब्लॉग

चिवर उतरविण्याच्या निमित्ताने….भिक्खु संघाचे नियम आपण समजून घेतले पाहिजेत

पूजनीय भिक्खु संघाने विनय नियमांचा भंग झाला असल्यामुळे एका व्यक्तीला प्रव्रार्जनीय कर्म शिक्षा सुनावली आहे. अर्थात चिवर काढून संघातून हकालपट्टी केलीय. याबद्दल संघाचे पुण्यानुमोदन. पण, सदर व्यक्तीचा स्वभाव पाहता तो अब्भानकर्म वगैरेचा हकदार बनण्यासाठी स्वतःत सुधारणा करेल की नाही ? हे आम्हास माहीत नाही. पण तसे असेल तर नक्कीच स्वागतार्ह बाब असेल. असे अनेक जण […]

इतिहास

नालंदा बौद्ध विश्वविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना अशी कठीण परीक्षा द्यावी लागत होती

नालंदा विश्वविद्यालयाची प्रवेश परीक्षा अत्यंत कडक होती. ह्यु-एन-त्सँग म्हणतो, “प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याने जुन्या आणि नव्या ग्रंथांचा सखोल अभ्यास केला असला पाहिजे. “या ठिकाणी काही विद्वानांचे म्हणणे आहे की जुन्या आणि नव्या ग्रंथांचा म्हणजे सांख्य, वैशेषिक, न्याय, इत्यादी निरनिराळ्या जुन्या ग्रंथांचा आणि महायानाच्या आणि स्थविरवादाच्या ग्रंथांचा म्हणजे नव्या ग्रंथांचा. अशा प्रकारे नालंदा बौद्ध विश्वविद्यालयात प्रवेश […]

आंबेडकर Live

आम्ही महार असतो तर – आचार्य प्र.के.अत्रे

हा प्रश्न गेले कित्येक दिवस आम्ही आमच्या मनाला विचारीत आहोत. गेल्या महिन्यात नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे दोन लाख महार यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. पुढल्या महिन्याच्या सोळा तारखेला मुंबई येथे दोन-चार लाख महारांना बाबासाहेब बुद्धधर्माची दीक्षा देणार आहेत. भगवान बुद्धाचा धर्म स्वीकारण्याची प्रचंड लाट या देशातील अस्पृश्य समाजामध्ये उटलेली आहे. बुद्धधर्मी झालेल्या […]

इतिहास

कर्नाटक किनारपट्टीतील बुद्धिझम आणि नाथ संप्रदाय

आपल्या महाराष्ट्रात कोंकण किनारपट्टीत जशी कुडा लेणी, गंधारपाले लेणी, पन्हाळेकाजी लेणी आहेत तशी कर्नाटकच्या किनारपट्टी भागात लेणी नाहीत परंतु तरीही एकेकाळी बौद्ध धर्म तेथे पसरला होता. अनेक पुरातन बुद्धमूर्ती कादरी ( मंगलोर), हायगुंडा, बाब्रूवाडा आणि मुलर (उडुपी) येथे मिळाल्या आहेत. कर्नाटक किनारपट्टीतील मंगलोर जवळील ‘कादरी श्री मंजुनाथ मंदिर’ हे देवस्थान प्रत्यक्षात एकेकाळचे वज्रयान बौद्ध विहार […]

ब्लॉग

खरंच आम्ही बुद्ध विचार “जाणले” आहेत की बुद्ध विचार फक्त कवटाळून बसलो आहोत?

१६व्या शतका अखेर जपान मध्ये “बाशो” नावाचा एक प्रसिद्ध बुद्ध विचारांचा कवी होऊन गेला. एकदा तो त्या काळातील एक प्रसिद्ध बौद्ध आचार्य “टाक ऊआन” यांना भेटायला गेला. टाक ऊआन जेव्हा कुठल्या मुद्द्यावर बोलायचे तेव्हा बाशो त्यांना बुद्ध वचने उद्धृत करायचा. काही वेळाने टाक ऊआन त्याला म्हणाले, “बाशो, तू खूप अभ्यासू आहेस. अनेक बुद्ध वचने सांगतोस […]

इतिहास

केरळात सापडल्या प्राचीन बुद्धमूर्ती

केरळ राज्यात अनेकजण पर्यटनासाठी जातात. कुणी तिथे देवालयांच्या दर्शनासाठी जातात तर कुणी केरळातील निसर्गसौंदर्याचा अविष्कार पाहण्यास जातात. कुणी संस्कृतीचा अभ्यास करण्यास तर कुणी कामानिमित्त भेट देतात. पण केरळाला जाऊन कुणी बुद्धमूर्ती पाहून आल्याचे आजपर्यंत सांगितले काय ? कारण केरळ म्हणजे सगळीकडे मोठं मोठी मंदिरे. बुद्धमूर्ती तिथे कशा असतील हा अनेकांना प्रश्न पडतो. पण आता अनेक […]

बातम्या

प्राचीन बुद्धमूर्ती संकटात; 71 वर्षानंतर पुराचं पाणी बुद्ध मूर्तीच्या पायापर्यंत पोहोचलं

तब्बल 71 वर्षानंतर चीनमधल्या लेशान शहरापासून जवळच असलेल्या बुद्धांच्या भव्य मूर्तीला पाण्याचा वेढा पडला आहे. 233 फूट उंचीची ही प्राचीन बुद्ध मूर्ती चीनचा ऐतिहासिक वारसा आहे. यंदाच्या पुराचं पाणी बुद्ध मूर्तीच्या पायापर्यंत पोहोचलं आहे. जे मुळात जमिनीपासून कित्येक फूट उंचावर आहे. चीनमधल्या मागच्या दोन पिढ्यांनी असं दृश्यं पाहिलं नव्हतं. शेती आणि घरं गिळल्यानंतर चीनमधला महापूर […]

इतिहास

हा बौद्ध स्तूप आज अस्तित्वात असता तर केवळ ताजमहाल या वास्तूशी तुलना करणे शक्य

अमरावती हे छोटेखानी गाव, नुकतेच विभाजन झालेल्या आंध्र प्रदेश राज्यामधील गुंटुर या शहरापासून सुमारे 35 किमी अंतरावर, कृष्णा नदीच्या दक्षिण किनार्‍यावर वसलेले आहे. स्थानिक किंवा तेलगू भाषेमध्ये या गावाला “दिपल्दिन्ने” किंवा मराठीमध्ये भाषांतर करायचे तर “दीपगिरी” या नावाने ओळखले जाते. अमरावती गाव आणि परिसर हे इ.स. पहिले शतक किंवा त्याच्याही आधीच्या कालापासून बौद्ध धर्मियांसाठी असलेले […]

इतिहास

अमरावती स्तूप भारतीय वास्तुकलेचा अप्रतिम नमुना

सातवाहनांनी भारतीय संस्कृतीला फार मोठे योगदान दिले आहे. तसेच राजकीय क्षेत्रात वर्षे राज्य करून त्यांनी स्थिर शासनाचा आदर्श निर्माण केला. अनेक इतिहासकार सातवाहन वैदिक धर्माचे अनुयायी असल्याचे म्हणतात. मात्र सातवाहन हे बौद्ध अनुयायी होते याचे ऐतिहासिक पुरावेच नाहीतर त्यांच्या काळात कान्हेरी, कार्ले, भाजे, बेडसा, जुन्नर, पितळखोरे, अजिंठा आदी शेकडो लेणी निर्माण केली. सातवाहनकालीन कलेचा महाराष्ट्रात […]