बातम्या

बोधगया क्षेत्रात सापडले नवीन ”बौद्धस्थळ”

२०१८ च्या सप्टेंबरमध्ये हिंदुस्थान टाइम्सच्या पाटणा आवृत्तीत एक बातमी आली की बोधगया क्षेत्रात धर्मारण्य आणि मातंगवापी जवळ एक मोठी शिळा सापडली आहे. या शिळेवर बसून सुजाताने दिलेली खीर सिद्धार्थ गौतम यांनी ग्रहण केली होती. तसेच बुद्धांनी ज्ञानप्राप्ती पुर्वी जेथे वैराग्य मार्गाचा अभ्यास केला ते मोहना नदीजवळील जंगलात असलेले ठिकाणही (धर्मारण्य) शोधण्यात आले आहे.यासाठी प्राचीन साहित्यातील […]

बातम्या

चंद्रमोळीत पोहोचला ‘हर्षदीप’; होतकरू व गरीब विद्यार्थ्यांना डॉ. हर्षदीप कांबळेंची मदत

यवतमाळ : सामाजिक दृष्टिकोनातून समाजाचा आपण एक महत्त्वपूर्ण घटक आहोत आणि आपली महत्त्वाची जबाबदारी आपल्या खांद्यावर ती आहे ही भूमिका पार पाडत असताना सनदी अधिकारी म्हणून संपूर्ण देशामध्ये परिचित असणारे डॉ.हर्षदीप कांबळे यांनी ऐतिहासिक निर्णय घेऊन जगासमोर एक आगळे वेगळे उदाहरण ठेवला आहे. उच्चशिक्षित असणाऱ्या या दाम्पत्यांनी अपत्य होऊ देण्याची प्रतिज्ञा घेऊन समाजातील गरजू आणि […]

बुद्ध तत्वज्ञान

श्रेष्ठतम गुरू भगवान बुद्ध

भगवान बुद्धांच्या जन्मापूर्वीचा काळ हा भारतीय इतिहासातील तमो युगाचा काळ होता. प्रज्ञेच्या दृष्टिने ते एक मागासलेले युग होते. श्रद्धाळू लोक धर्मग्रंथावर विश्वास ठेवून आचार विधींचे आचरण करत होते. नैतिक विचारांना स्थान नव्हते. भगवान बुद्धांनी हे सर्व बदलले. त्यांच्या शिकवणुकीमुळे समाज जीवनावर अदभुत बदल घडून आला. सत्यमार्गाचे आणि विज्ञानमार्गाचे आकलन लोकांना झाले. सदाचार प्रवृत्ती होण्यासाठी मानसिक […]

बातम्या

जेष्ठ आंबेडकरी साहित्यिक डॉ. भाऊ लोखंडे यांचे निधन

नागपूर – जेष्ठ आंबेडकरी साहित्यिक डॉ. भाऊ लोखंडे यांचे निधन झाले. ते 78 वर्षांचे होते. सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक, रिपब्लिकन स्टुडंट्स फेडरेशनचे प्रणेते आणि बौद्ध दलित साहित्याच्या चळवळीत महत्वाचे योगदान असलेले डॉ. भाऊ लोखंडे हे आंबेडकरवादी विचारवंत होते. त्यांचा जन्म १५ जून १९४२ रोजी झाला होता. डॉ. भाऊ लोखंडे हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील पदव्युत्र […]

बातम्या

गॅनदेन मॉनेस्ट्री : एक सुंदर आणि प्रेरणादायी माहीतीपटाचा लाभ घ्या

तिबेटमध्ये गेलुग विद्यापीठाच्या तीन मॉनेस्ट्रीज आहेत. गॅनदेन मॉनेस्ट्री, सेरा मॉनेस्ट्री आणि ड्रेपुगं मॉनेस्ट्री. त्यापैकी गॅनदेन मॉनेस्ट्री ही ल्हासातील दागझे जिल्ह्यात आहे. गॅनदेन मॉनेस्ट्री इ.स. १४०९ मध्ये सॉगंकप्या लॉझोन्ग द्रागपा यांनी स्थापित केली. १९५९ नंतर तिबेट-चीन संघर्षात चीनने ती उध्वस्त केली. परंतु ती काही प्रमाणात पुन्हा उभारली गेली. तिबेट वरून भारतात आलेल्या तिबेटी निर्वासितांनी कर्नाटक मध्ये […]

जगभरातील बुद्ध धम्म

म्यानमारचे ‘मंडाले’ – एक बौद्ध संस्कृतीचे शहर

म्यानमार देशातील एक नंबरचे शहर म्हणजे यंगून (म्हणजेच रंगून) आणि दोन नंबरचे शहर मंडाले असून ते इरावती नदीच्या किनारी वसलेले आहे. इ.स.सन १८५७-५९ मध्ये मिनदोन राज्याच्या राजवटीत हे शहर स्थापित झाले. दुसऱ्या महायुद्धात या शहराची अपरिमित हानी झाली. पण फिनिक्स पक्षा प्रमाणे हे शहर पुन्हा भरभराटीस आले. बर्माचे हे सांस्कृतिक आणि बुद्धीझमचे मोठे धार्मिक केंद्र […]

ब्लॉग

कान्हेरी लेणी पन्नास वर्षांपूर्वीची

बोरिवलीची ‘कान्हेरी लेणी’ म्हणजे मुंबईच्या सान्निध्यात असलेला सर्वात सुंदर प्राचीन बौद्ध संस्कृतीचा वारसा होय. इ.स.पूर्व १ ल्या शतकापासून ते इ.स.११ व्या शतकापर्यंत विकसित झालेल्या या लेण्या म्हणजे मुंबईचा एक अनमोल ठेवा आहे. सुंदर बुद्ध शिल्पे, स्तुप, चैत्यगृह, विहार, सभागृह, निवासस्थाने, शिलालेख, पाण्याची असंख्य कुंडे, बोधिसत्व आणि पद्मपाणी बुद्ध यांची शिल्पे असा असंख्य बौद्ध संस्कृतीचा अनमोल […]

इतिहास

पालि (मागधि) भाषेतून मराठीचा उगम – आश्चर्यकारक साम्य

आपण महाराष्ट्रीयन आपली मराठी संस्कृती, भाषा आणि साहित्य यांच्या विषयाचे संशोधन महाराष्ट्राच्या सीमा आणि मराठी कलाकृती यांच्या परिघातच करतो. त्यामुळे त्याचे प्रतिबिंब किंवा कार्य राष्ट्रीय पातळीवर पडतच नाही. या देशाच्या सांस्कृतिक इतिहासात बंगाली, हिंदी व दाक्षिणात्य भाषा सोडल्यास मराठीचा मागमूस दिसत नाही. मराठीचा सांस्कृतिक इतिहास डोळसपणे पाहण्याचे व कथन करण्याचे प्रामाणिक प्रयत्न फारसे झाले नाहीत. […]

आंबेडकर Live

डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महाडची परिषद आणि गंधारपाले लेणी

महाडची सत्याग्रह परिषद दिनांक २५ ते २७ डिसेंबर १९२७ रोजी भरविण्यात आली होती. त्या परिषदेची पूर्वतयारी करण्याकरीता अनंत विनायक चित्रे यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे ते पंधरा दिवस अगोदरच महाडमध्ये जाऊन बसले होते. त्यावेळी महाडमध्ये त्यांना सत्याग्रहाबद्दल प्रतिकूल मत असल्याचे दिसले. तसेच परिषदेच्या कार्यात सर्वतोपरी विघ्ने उत्पन्न करून परिषदेला कोणत्याही प्रकारचे सामान मिळू द्यायचे […]

बातम्या

वर्षावास निमित्त GBC इंडियाच्या वतीने थायलंडचे प्रसिद्ध भन्ते डॉ सिरिमंगलो यांचे धम्म प्रवचन

ग्लोबल बुद्धिस्ट कॉन्ग्रिग्रेशन इंडियाच्या वतीने वर्षावास निमित्त जगभरातील प्रसिद्ध पुज्यनीय भन्तेजींकडून ऑनलाईन धम्मदेसना (धम्म प्रवचन) देण्याचा उपक्रम आयोजित केला आहे. मागील तीन महिन्यापासून ऑनलाईन धम्म धम्मदेसनेचा भारतीय बौद्ध उपासकांना लाभ मिळत असून मोठा प्रतिसाद मिळत आहे. वर्षावास निमित धम्म GBC इंडिया आयोजित ऑनलाईन धम्मदेसना उपक्रमात थायलंड येथील प्रसिद्ध भन्ते डॉ फ्रामह सोमपोंग सिरिमंगलो (सहाय्यक अब्बोट, […]