आंबेडकर Live

बाबासाहेबांचे अनुयायी म्हणजे बाजारबुणगे नव्हेत, ते एक लढाऊ सैन्य

निखाऱ्यावर भाजलेली मुले दहा वर्षांपूर्वीची गोष्ट. डॉ.आंबेडकरांच्या पंचावन्नाव्या वाढदिवशी नवयुगचा खास अंक काढावयाचा आम्ही ठरविले. म्हणून आम्ही त्यांच्याकडे संदेश मागावयास गेलो. बाबासाहेब हसून म्हणाले , ‘महाराचा कसला वाढदिवस साजरा करता? ‘ त्यांच्या या प्रश्नाला उत्तर देण्याचे आम्हाला काय तोंड होते? आम्ही खाली मान घातली आणि गप्प बसलो. तेव्हा बाबा एकदम गंभीर झाले. आमची भावना त्यांना […]

बुद्ध तत्वज्ञान

‘प्रतित्यसमुत्पाद’ सिद्धांत हा तथागत बुद्धांनी लावलेला एक महान शोध

“जो प्रतित्यसमुत्पादाला जाणतो तो धम्माला जाणतो आणि जो धम्माला जाणतो तो प्रतित्यसमुत्पादाला जाणतो.” – तथागत बुद्ध दु:ख, अनित्यता, अनात्मता आणि निर्वाण हे बुद्ध धम्माचे मूलभूत सिद्धांत आहेत. हे चारही सिद्धांत प्रतित्यसमुत्पादावर आधारित आहेत. त्यांचा उगम प्रतित्यसमुत्पादापासून झाला आहे. हा सिद्धांत इतका महत्वाचा आहे की, “जो प्रतित्यसमुत्पादाला जाणतो तो धम्माला जाणतो आणि जो धम्माला जाणतो तो […]

इतिहास

प्राचीन बौद्धस्थळ ‘संकिशा’; या ठिकाणाचे अनन्यसाधारण महत्त्व

आज आपण अशा एका वेगळ्या बौद्ध स्थळाची माहिती घेणार आहोत की बौद्ध साहित्यातील त्याची माहिती वाचल्यावर अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण होतो. अनेकांना त्या स्थळाची माहिती म्हणजे कपोलकल्पित कथा वाटते. पण सम्राट अशोक यांनी तेथे उभारलेला हत्तीमुद्रेचा स्तंभ आणि स्तूप पाहता या ठिकाणाचे अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित होते. काही गोष्टी या आकलनाच्या पलीकडे असतात. आपल्या आजूबाजूस असलेली […]

बुद्ध तत्वज्ञान

बुद्धांनी दिलेला ”वज्जीचा फॉर्मुला” पाळलात तर तुमचा पराभव कधीच होणार नाही

वर-वर पाहिले असता ही घटना अगदी सर्वसामान्य वाटते पण बारकाईने विचार केला असता, हा केवळ वज्जींचा इतिहास नसून हा एकूण भारतीय समाजाचा हजारो वर्षांचा जिवंत इतिहास आहे. परस्परांवरील अविश्वास आणि त्यातून निर्माण झालेला ऐक्याचा अभाव यांच्यामुळे समाजाची बाकीची सर्व गुणवत्ता मातीमोल होते, सगळे सामर्थ्य मोडीत काढली जातात आणि गैरसमजापोटी एकमेकांच्या जिवावर उठलेले सगळेजणच शत्रूपुढे गुडघे […]

ब्लॉग

बौध्द सातवाहन सम्राटांची कर्मभूमी – आंध्र प्रदेश व तेलंगणा

पद्मावती, सुखावती, अमरावती ही नावे बौध्द संस्कृती व परंपरेशी संबंधीत आहे. हिमालयातील अमरनाथ गुहेजवळून वाहणारी अमरावती नदी आहे. विदर्भातील अमरावती हे प्राचिन बौध्द क्षेत्र आहे. येथे प्राचिन अंम्बाबाईचे मंदिर आहे. अंम्बा, पाली ही नावे बौध्द धम्माशी निगडीत आहेत. धम्म उपासिका आम्रपाली ही बौध्द पर्वातील प्रत्यक्ष तथागतांशी संवाद केलेली महत्वाची नाईका होती. तिच्या नावाचा अपभ्रंश होवून […]

इतिहास

जनावरांचा गोठा बांधण्यासाठी पाया खणत असताना बौद्ध चैत्यगृहाचा लागला शोध

तेर हे उस्मानाबाद जिल्ह्यातील एक पुरातत्त्वीय स्थळ आहे. ते ठिकाण उस्मानाबादपासून ईशान्येला अठरा किलोमीटर अंतरावर असून तेरणा नदीच्या दक्षिण काठावर वसलेले आहे. तेर येथे नवीन बसस्थानकाच्या समोर जनावरांचा गोठा बांधण्यासाठी पाया खणत असताना चैत्यगृहाचा शोध लागला होता. तेर येथील असलेला चैत्य स्तुप हा येथे असणारा बौद्ध धर्माचा प्रभाव सिद्ध करतो. तेरला प्राचीन काळी ‘तगर’ या […]

जगभरातील बुद्ध धम्म

‘आबा सैब चेना’ या बौद्धस्थळावर सापडले स्तूप आणि विहाराचे अवशेष

पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा येथील पुरातत्व विभाग आणि संग्रहालयाचे संचालक यांनी स्वात खोऱ्यातील “आबा सैब चेना” या बौद्ध स्थळी नुकतेच उत्खनन चालू केले आहे. या स्थळी बौद्ध संस्कृतीचे असंख्य अवशेष सापडले आहेत. तसेच तेथील टेकडीखाली मोठा स्तूप आणि संघारामचे अवशेष दिसून आले. पुरातत्व विभागाचे संचालक डॉ. अब्दुल समद खान यांनी याबाबत सांगितले कि या स्थळी पहिल्यांदाच […]

बातम्या

देशातील सर्वात उंच (65 फूट) अशोकस्तंभाचे नांदेडमध्ये काम सुरु..!

नांदेड जिल्ह्यातील बावरीनगर दाभड येथे भारतातील सर्वात उंच अशोक स्तंभ निर्मिती कार्य सुरु आहे. ज्याची उंची जमिनी पासून 65 फूट आहे. ह्या स्तंभाचे निर्मिती कार्यास 2012 पासून सुरवात झाली आहे. या अशोक स्तंभासाठी लागणारा दगड मध्यप्रदेशातून आणला असून व अशोक स्तंभ तयार करण्यासाठी राजस्थान येथील कारागीर स्वतःचे कला कौशल्य वापरत भारतात सर्वोत्तम अशोकस्तंभ निर्मिती करण्यासाठी […]

बातम्या

मराठवाड्यातील ”ही” महानगरपालिका राज्यातील सर्वात उंच बुद्धमूर्ती उभारणार

नांदेड महानगरपालिकेने नुकतेच १०० फूट उंच बुद्धमूर्ती उभारण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. बुद्धमूर्ती बसविण्याचा ठराव महानगरपालिकेने पारित केल्यानंतर विविध विभागांचे आवश्यक असलेल्या 8 पैकी चार विभागांचे नाहरकत प्रमाणपत्र प्राप्त झाले. उर्वरित चार विभागांचे नाहरकत प्रमाणपत्र प्राप्त प्राप्त करण्यासाठी मनपा पाठपुरावा करत आहे. ही बुद्धमूर्ती महापालिकेच्या 2 एकर जागेत उभारण्यात येणार आहे. नांदेड शहर हे देश […]

ब्लॉग

चिनी प्रवासी ‘हुएनत्संग’ यांचे अलौकिक योगदान

चिनी भिक्खू हुएनत्संग यांनी भारतामधील १४०० वर्षांपूर्वी केलेल्या प्रवासाचे मला नेहमीच अप्रूप वाटत आलेले आहे. ते भारतात आल्यामुळे त्यावेळची भारतातील बौद्ध धम्माची स्थिती आणि स्थळें यांची अचूक माहिती त्यांच्या प्रवासवर्णनातून मिळते. ते ज्या मार्गाने आले तो मार्ग पुढे सिल्क रोड म्हणून नावाजला गेला. त्यांना मायदेश सोडून जाण्यासाठी चीनच्या सम्राटाने परवानगी दिली नव्हती, म्हणून भारतात काही […]