मित्रांनो या फोटोतील व्यक्तीला खूप लोक विसरले असतील. यांचं नाव विलास ढाणे (पाटील), साताऱ्यातील जळगाव हे मूळ गाव होते. समाजवादी युवकदलाचा तो कार्यकर्ता. मराठवाडा विद्यापीठाचं नामांतराचं आंदोलन पेटलं होतं. सर्वत्र पुरोगामी चळवळीतील तरुण तरुणी, मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्यावे म्हणून जोरदार आंदोलनात उतरले होते. विलासही त्यातलाच एक होता. मात्र सरकार ढिम्म हलत नव्हतं. […]
Day: January 14, 2021
एका नामांतर शहिदाची अस्वस्थ कहाणी..!
चाळीस वर्षांपूर्वी घडलेली घटना नांदेड शहरातल्या गोविंद नगरात राहणाऱ्या धोंड्याबाईला आजही ठळक आठवते… नजर पैलतीरी लागलेल्या 80 वर्षाच्या धोंड्याबाई पोचिराम कांबळे सगळं काही अगदी काल घडलंय इतक्या सहज सांगू लागतात… “त्यावेळी नामांतराचं आंदोलन सुरू झालं होतं साहेब, 4 ऑगस्ट 1978 चा दिवस होता, अजून नीट उजडलं सुद्धा नव्हतं, गावातल्या लोकांच्या आरोळ्या ऐकू येऊ लागल्या, रात्रभर […]