बुद्ध तत्वज्ञान

अनेक बौद्ध देशात चिवराचा रंग थोडा वेगळा का दिसतो? भगव्या रंगाचे चिवर आणि त्याचे महत्व

मी नेपाळमध्ये गेलो तेव्हा तेथील भिक्खुंच्या चिवराचा रंग केशरी-भगवा होता. मी सिरीलंकेत गेलो तेव्हा तेथील भिक्खुंच्या चिवराचा रंग पिवळसर, भगवा दिसला. म्यानमारमध्ये गेलो तेव्हा तेथील भिक्खुंचे चिवर भगव्या रंगाचे होते. मात्र भिक्खुंणींच्या चिवराचा रंग गुलाबी होता. जपानी भन्तेजी बरोबर फिरलो तेव्हा त्यांचे चिवर थोडे पिवळसर होते व ते जाडेभरडे नव्हते. तसेच जपान मधील काही भिक्खुं […]

जगभरातील बुद्ध धम्म

स्वातखोऱ्यात आढळले २००० हजार वर्षांपूर्वीचे भव्य बौद्ध विहाराचे अवशेष

पाकिस्तानामध्ये स्वातखोऱ्याच्या उत्तर भागात मोठे बौद्ध विहार तसेच शैक्षणिक केंद्र उत्खननात नुकतेच उघडकीस आले. हे विहार दोन हजार वर्षांपूर्वी कुशाण राजवटीत बांधले गेले असावे असा कयास आहे. त्याकाळी कुशाण राजवटीचा अंमल आताच्या अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि उत्तर भारताच्या मोठ्या भागात होता. स्वात खोऱ्यातील हे विहार पूर्वी १९३० मध्ये इटालियन पुरातत्त्ववेत्ता यांनी शोधले होते. परंतु त्यावेळी पूर्ण […]