बातम्या

महाड येथे डॉ.आंबेडकर विचार महोत्सव समितीचे ५० व्हॉलेंटीअर्सचे मदतकार्य सुरु; चवदार तळे परिसरही केला स्वच्छ

महाड येथे ढगफूटी सदृश्य अतीमुसळधार पाऊस झाल्याने सावित्री नदीला आलेल्या महापूरामुळे निर्माण झालेल्या पुराची भीषणता आणि दाहकता पूर ओसरल्यानंतर समोर आली आहे. नुकतेच राष्ट्रनिर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समितीचे ५० व्हॉलेंटीअर्स महाड येथे मदत कार्य करण्यासाठी पोहचले आहेत. पूरग्रस्त महाड व आजूबाजूच्या गावांनाही मदत: राष्ट्रनिर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समितीच्या स्वयंसेवकांनी, उद्योग विकास आयुक्त डॉ. […]

बातम्या

राष्ट्रानिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समितीचे 50 कार्यकर्ते महाड मदतकार्यात अग्रेसर

महाड इथे पुरामुळे अतिशय हानी झाली आहे. तिथल्या लोकांचे अश्रू पुसण्यासाठी, त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्यासाठी, तसेच वेगवेगळ्या जीवन उपयोगी वस्तूंचे वाटप व मदत करण्यासाठी राष्ट्रानिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समिती, मुंबईचे ५० स्वयंसेवक, डॉ हर्षदीप कांबळे, उद्योग आयुक्त ह्यांच्या मार्गदर्शनाखाली महाड इथे दाखल झाले आहेत. महाडच्या ऐतिहासिक क्रांतिसंगराची पार्श्वभूमि असलेल्या बाबासाहेबांच्या स्पर्शाने […]

बातम्या

दलाई लामांचा महाराष्ट्राला दिलासा; पूर सहाय्यता निधीसाठी तात्काळ दान देण्याचे ट्रस्टला आदेश

-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक) महाराष्ट्रामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे रायगड, रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यात दरड कोसळून अनेक दुर्घटना झाल्या. महाड तालुक्यात तर तळीये गावातील दरडीखाली अनेक लोक बेपत्ता झाले. सातारा, सांगली, कोल्हापूर येथे महापुराचा तडाखा बसला. अजूनही तेथील पूरस्थिती ओसरली नाही. चिपळूण, महाड आणि पुराचा तडाखा बसलेल्या भागांमध्ये आता स्वच्छतेचे […]

ब्लॉग

गजराज आणि बुद्धिझम; लेण्यांमध्ये, स्तूपाच्या ठिकाणी आणि विहारात गजराजाचे शिल्प

या पृथ्वीतलावावर गजराज प्राण्याचा निर्देश इतर कोणत्याही धर्मापेक्षा बुद्धांच्या धम्मात प्रखरतेने झालेला दिसतो. गजराजांचा उल्लेख हा प्रामुख्याने बुद्धांशी निगडित असल्याने गजराज आणि बुद्ध यांचा संबंध बौद्ध साहित्यात मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. सिद्धार्थ यांच्या जन्मा अगोदरपासून शुभ्रधवल गजराज याची बुद्ध व्यक्तिरेखेशी नाळ जोडली गेलेली आहे. सुळे असलेला शुभ्रधवल गजराज सोंडेत कमलपुष्प धरून तीन वेळा प्रदक्षिणा घालून […]

जगभरातील बुद्ध धम्म

झांजीबारचा बुध्दिझम ; आफ्रिकेत बुद्धांबद्दल कुतूहल वाढीला लागले

‘पेडगावचे शहाणे’ हा राजा परांजपे यांचा एक जुना मराठी चित्रपट आहे.( १९५२ ) त्यामध्ये “झांजीबार.. झांजीबार..”असे एक गाणे होते. शाळेत असताना १९७५ मध्ये तो दूरदर्शनवर पाहिला. हिंदी महासागरात बेट असलेल्या या आफ्रिकेतील देशाची गाण्यातून ओळख झाली. दीडशे वर्षांपूर्वी अनेक भारतीय विशेष करून गुजराथी व्यापारानिमित्त तेथे स्थायिक झाले. श्रीलंकन नागरिक सुद्धा तेथे नोकरी-धंद्यासाठी गेले आणि स्थायिक […]

इतिहास

वंगीस – प्राचीन भारताचा बौद्ध कवी

आयुष्यात सत्यधर्म सांगणारा गुरु जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत आयुष्य असेच भरकटत चाललेले असते. वंगीस ब्राम्हणाच्या बाबतीत असेच झाले होते. मृत पावलेल्या माणसाच्या कपाळावर टिचकी मारून त्याचा पुर्नजन्म कोठे झाला असेल हे तो सांगत फिरत असे. त्यामुळे राजगृहाच्या पंचक्रोशीत त्याचे नाव झाले होते. त्यावेळच्या ब्राम्हणांनी त्याचा उदोउदो केल्यामुळे वंगीस यांचे महत्व वाढले होते. एके दिवशी बुद्धांची […]

बातम्या

लंडनमध्ये भारताचा बहुमान; ग्रेज इन कोर्टात बाबासाहेबांचे तैलचित्र!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लंडनमधील ज्या ‘ग्रेज इन’ कोर्टातून बॅरिस्टर पदवी मिळवली तिथेच आता डॉ. आंबेडकर यांचा एक खास फोटो लावून सन्मान करण्यात आला आहे. जिथून त्यांनी बॅरिस्टर पदवी मिळवली तिथेच त्यांचं तैलचित्र लावणं जाणं हा एक प्रकारे अवघ्या भारताचा बहुमान आहे. ब्रिटिश राजकीय तज्ज्ञ, मानवाधिकार कार्यकर्ते आणि ब्रिटनच्या हाऊस ऑफ लॉर्डचे (राज्यसभा खासदार) सदस्य […]