बातम्या

विशाखापट्टणमच्या स्तुपाचे झाले नूतनीकरण; महाराष्ट्रात सरकारचे बौद्ध स्थळांकडे दुर्लक्ष

सन २०१९ मध्ये झालेल्या तुफानी वादळामुळे विशाखापट्टणमजवळील थोतलाकोंडा येथे दोन हजार वर्षापूर्वीचा बौद्ध महास्तूप ढासळला होता. गेल्या दोन वर्षापासून त्याच्या दुरुस्तीचे काम चालू होते. या कामासाठी ४२ लाखांचा निधी विशाखापटनम महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (VMRDA) यांनी दिला होता. पर्यटन मंत्री एम श्रीनिवास राव यांनी नुकतेच या नूतनीकरण केलेल्या स्तूपाचे उदघाटन १५ सप्टेंबर २०२१ रोजी केले. […]

इतिहास

अग्रश्रावक सारिपुत्त यांचा लहान बंधू रेवत

भगवान बुद्धांचे अग्रश्रावक सारिपुत्त यांच्या कुटुंबाची माहिती ‘खदिरवनिय रेवत’ या सुत्तात मिळते. सारिपुत्त हे सर्व भावंडात वडील बंधू होते. त्यांच्या बहिणींची नांवे चाला, उपचाला आणि सिसुपचाला अशी होती आणि भावांची नांवे चुंद,उपासेन व रेवत अशी होती. ही सर्व नांवे थेरीगाथेच्या अठ्ठकथेत सापडतात. रेवत हा सर्वात लहान होता. वडील बंधू सारखा तो भिक्खू होऊ नये म्हणून […]

जगभरातील बुद्ध धम्म

आशिया खंडातील बौद्ध देशांत ‘पूर्वजांचा स्मृतीदिन’ असा साजरा करतात

बौद्ध जगतामध्ये सप्टेंबर महिन्यातील पंधरवडा पूर्वजांबद्दल श्रद्धा व्यक्त करण्याचा एक सण म्हणून Pchum Ben/ Vu-Lan/ Obon/ Ulambana/ Ancestor Day अशा विविध नावांनी साजरा करतात. आपल्या घरातील पूर्वजांना वंदन करण्याची प्रथा अडीज हजार वर्षांपासून चालत आलेली होती. अनेक बौद्ध देशांत या पंधरवड्यात पूर्वजांची आठवण म्हणून घरगुती पदार्थ तयार करतात. ते तयार केलेले पदार्थ आणि फुले-फळे विहारात, […]

बुद्ध तत्वज्ञान

बुद्धकथा : जे मनातून गरीब असतात तेच खरे गरीब

एका गरीब माणसानं बुद्धांना विचारलं की मी इतका गरीब का? त्यावर बुद्ध म्हणाले तू गरीब आहेस कारण तुझ्यापाशी असलेलं तू जगाला काहीच देत नाहीस. तो माणूस आश्चर्याने म्हणाला पण माझ्याकडे तर देण्यासारखं काहीच नाही.. बुद्धांनी मंदस्मित करून उत्तर दिलं… काही देण्यासाठी तू श्रीमंतच असावा असं नाही. गरीब असतानाही तू बरंच काही देऊ शकतोस.. पहिली गोष्ट […]

ब्लॉग

महार – एक शूर जात असल्याचे ऐतिहासिक संदर्भ

“स्वराज्याचा आधारस्तंभ असलेला छ. शिवाजी महाराजांचा हेरखात्याचा प्रमुख बहिर्जी नाईक याला सर्व गुप्त माहिती व बातम्या त्याचे विश्वासू ‘महार’ साथीदार पुरवत असत….” (जेम्स ग्राण्ड डफ – ‘हिस्ट्री ऑफ दि मराठा’ . ‘महार रेजिमेंटचा इतिहास ,पृष्ठ-७) “शत्रूस हुलकावणी देऊन भ्रमित करुन त्यास भलतीकडेच नेऊन अगदी शत्रू सैन्याची दमछाक करण्याची महत्त्वाची जबाबदारी असलेल्या ‘ हूळ (हूल)पथका’त असलेले […]

ब्लॉग

प्रथम स्मृती दिन – आंबेडकरवादी मुलुखमैदानी तोफ : डॉ.भाऊ लोखंडे.

ज्येष्ठ पत्रकार सुनील खोब्रागडे यांच्या फेसबुक वॉलवरून… महाराष्ट्रातील प्रख्यात विचारवंत, व्यासंगी लेखक,चतुरस्त्र वक्ते,आंबेडकरवादी विचारविश्वातील दैदिप्यमान तारा डॉ.भाऊ लोखंडे यांची आज पुण्यतिथी आहे. बरोबर एक वर्षापूर्वी कोरोना महामारीने भाऊसाहेबांना आपल्या विकराल बाहुत ओढुन एका महाविद्वान व्यक्तिमत्त्वाला आपल्यापासुन दूर नेले. डॉ. भाऊसाहेब लोखंडे हे आंबेडकरवादी विचार विश्वातील एक असे व्यासंगी व्यक्तिमत्व होते की, ज्यांच्याकडे इतिहास,साहित्य,प्राचीन वांग्मय इत्यादी […]

बुद्ध तत्वज्ञान

बौद्ध संस्कृतीतील व्यक्तीचे आचरण कसे असावे?

मुलांचे कर्तव्य – बौद्ध संस्कृतीत मुलाने आई वडिलांशी कसे वागावे याबद्दल सिगालोवाद सुत्तात भगवान बुद्धांनी सांगितले आहे की, (मुलाने असे समजणे की,) मला त्यांनी पोसले आहे तर मी त्यांचे पोषण करीन. त्यांचे काम करीन, कुळाचार चालू ठेवीन, त्यांच्या संपत्तीचा वाटेकरी होईन व ते मरण पावल्यावर जलदान विधी करेन’. आई वडीलांचे मुलांवरील प्रेम – सिगालोवाद सुत्तात […]

आंबेडकर Live

निजामाने पीपल्स एज्युकेशन सोसायटीला खरंच मदत केली होती का?

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची निजामाच्या बाबतीत भूमिका अगदी स्वच्छ होती. त्यांनी म्हटले होते, पाकिस्तान अथवा हैदराबादेतील अनुसूचित जातींनी मुसलमान वा मुस्लिम लीगवर विश्वास ठेवणे आत्मघातकीपणाचे ठरेल. निजाम हा भारताचा एक नंबरचा शत्रू असल्याने अनुसूचित जातीच्या एकाही व्यक्तीने निजामाशी सहकार्य करून आपल्या जातीला कलंकित करू नये. निजामाविषयी डॉ.आंबेडकरांची स्पष्ट भूमिका असतानाही काही आंबेडकर द्वेषी लोकांकडून अर्धवट अभ्यासातून त्यांच्यावर […]

बातम्या

नोव्हेंबरमध्ये भारतात जागतिक बौद्ध परिषद; पंतप्रधानांच्या हस्ते पुरस्कार दिले जाणार

-संजय सावंत, नवी मुंबई भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेने ( Indian Council for Cultural Relation — ICCR ) मंगळवारी जाहीर केले की जागतिक बौद्ध परिषद १९-२० नोव्हेंबरच्या दरम्यान बिहारमध्ये नवं नालंदा महाविहारच्या प्रांगणात भरविली जाणार असून त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देखील सहभाग असणार आहे. या परिषदेत बौद्ध तत्त्वज्ञानाबद्दल चर्चा तसेच प्रचार-प्रसार करण्याबाबत ऊहापोह होईल. तसेच […]

इतिहास

सिद्धार्थ गौतम यांनी ज्या शिळेवर बसून सुजाताने दिलेली खीर प्राशन केली ती ‘रत्नागिरी शिळा’ सापडली

-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक) २०१८ च्या सप्टेंबरमध्ये हिंदुस्थान टाइम्सच्या पाटणा आवृत्तीत एक बातमी आली की बोधगया क्षेत्रात धर्मारण्य आणि मातंगवापी जवळ एक मोठी शिळा सापडली आहे. या शिळेवर बसून सुजाताने दिलेली खीर सिद्धार्थ गौतम यांनी ग्रहण केली होती. तसेच बुद्धांनी ज्ञानप्राप्ती पुर्वी जेथे वैराग्य मार्गाचा अभ्यास केला ते मोहना […]