बातम्या

विशाखापट्टणमच्या स्तुपाचे झाले नूतनीकरण; महाराष्ट्रात सरकारचे बौद्ध स्थळांकडे दुर्लक्ष

सन २०१९ मध्ये झालेल्या तुफानी वादळामुळे विशाखापट्टणमजवळील थोतलाकोंडा येथे दोन हजार वर्षापूर्वीचा बौद्ध महास्तूप ढासळला होता. गेल्या दोन वर्षापासून त्याच्या दुरुस्तीचे काम चालू होते. या कामासाठी ४२ लाखांचा निधी विशाखापटनम महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (VMRDA) यांनी दिला होता. पर्यटन मंत्री एम श्रीनिवास राव यांनी नुकतेच या नूतनीकरण केलेल्या स्तूपाचे उदघाटन १५ सप्टेंबर २०२१ रोजी केले. […]