आंबेडकर Live

लांडोर बंगला आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर; या ऐतिहासिक प्रसंगाला यंदा ८५ वर्षे पूर्ण

धुळे येथील लळिंगच्या निसर्गरम्य कुराणात वसलेला लांडोर बंगला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची अखंड स्मृती तेवत उभा आहे. या ठिकाणी बाबासाहेब तीन दिवस मुक्कामी होते. या ऐतिहासिक प्रसंगाला यंदा ८५ वर्षे पूर्ण होत आहेत. दरवर्षी ३१ जुलैला या ठिकाणी ‘भीमस्मृती यात्रा’ भरविली जाते…. ‘बाबा’ आले कळले जनाला धावली दुनिया बघाया भिमाला। हर्ष झाला दलित दीनाला रंजल्या-गांजल्या पीडित […]

आंबेडकर Live

१९४८ सालीच डॉ.आंबेडकरांनी ठणकावून सांगितले ‘मुंबई महाराष्ट्राची’

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काल (29 जुलै) मुंबईतील अंधेरी पश्चिमेकडील दाऊद बाग जंक्शन चौकाच्या नामकरण सोहळ्याच्या कार्यक्रमात बोलताना “मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोक बाहेर गेले, तर मुंबई ठाण्यात आणि आजूबाजूच्या भागात काहीच पैसा उरणार नाही,” असं वक्तव्य करून मराठी माणसांसह महाराष्ट्राचा अपमान केला आहे. मुंबईच्या उभारणीत मराठी लोकांच्या कर्तृत्व, कष्ट आणि कर्तबगारीवर झाली असल्याचे […]

बातम्या

सोळाव्या शतकातील बुद्ध प्रतिमा दाखविणारा रहस्यमय आरसा सापडला

सिनसिनाती आर्ट म्युझियम (सनसनाटी म्हणा हवेतर) अमेरिकेत असून ते १८८१ साली स्थापन झाले. नुकताच तिथल्या आशिया खंडातील पुरातन सामानामध्ये अडगळीत पडलेला सोळाव्या शतकातील ब्राँझ फ्रेम असलेला एक आरसा मिळाला. संग्रहालयाचे प्रमुख डॉ. सुंग मॅडम यांनी जेव्हा हा आरसा साफ केला आणि त्याची तपासणी करताना त्यावर मोबाईलच्या टॉर्चचा फोकस मारला तेव्हा त्यांना अदभुत दृश्य दिसले. प्रकाश […]

आंबेडकर Live

डॉ. आंबेडकर यांचा रहिवास लाभलेला ‘गोविंद निवास वाडा’ कोसळला; महाडमध्ये व्यक्त होतेय हळहळ..

महाडचे थोर समाजभूषण सुरबानाना टिपणीस यांच्या ‘गोविंद निवास’ या घरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीर्घकाळ वास्तव्य केले. त्यांच्या जीवनातील अनेक संस्मरणीय प्रसंग आजही रोमांच उभे करतात. ही पवित्र वास्तू नुकतीच जोरदार अतिवृष्टीमुळे कोसळली…. आंबेडकरी चळवळीत महाड शहराला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली २० मार्च १९२७ रोजी झालेला महाड चवदार तळे सत्याग्रह […]

बातम्या

सन्नती स्थळाची होणार आता उन्नती; लवकरच ‘हा’महाकाय स्तूप उभा राहील

गेल्या वीस वर्षापासून दुर्लक्षित असलेले कर्नाटक राज्यातील जिल्हा कलबुर्गी मधील कनगनहल्ली येथील भीमा नदीच्या तीरी असलेले प्राचीन बौद्धस्थळ सन्नती आता नवीन कात टाकीत आहे. या स्थळाचा जिर्णोद्धार करण्यासाठी ३.५ कोटीचा निधी मंजूर झाला असून स्तूप पुन्हा उभा करण्याचे काम नुकतेच सुरू झाले आहे. ASI चे विभागीय संचालक जी माहेश्वरी आणि मंडळ अधीक्षक निखिल दास यांच्या […]

इतिहास

अशोक स्तंभ हे राष्ट्रीय चिन्ह कसे बनले, हे चार सिंह त्यावर काय चित्रित करतात ते जाणून घ्या

भारताच्या नवीन संसदेच्या इमारतीवर काल आपल्या राष्ट्राची (राष्ट्रीय चिन्ह) राजमुद्रा म्हणून मान्यता असेलेल्या अशोक स्तंभाच्या चार सिंहांचे भव्य आकाराचे स्तंभशिर्ष शिल्पाच्या प्रतिकृतीचे अनावरण झाले. त्यानंतर मूळ चार सिंहाचे स्तंभशिर्ष आणि नवीन उभारण्यात आलेल्या सिहांची तुलना सोशल मीडियावर सुरु झाली आहे. नवीन अशोक स्तंभशिर्ष शिल्पावरील चार सिंह हे आक्रमक दिसतात. तर मूळ स्तंभशिर्ष शिल्पावरील चार सिंह […]

ब्लॉग

बाबासाहेब तुमच्या आयुष्याचा, हिशोब मला लागत नाही….!

उणेपूरे मिळालेले ६५ वर्षांचे आयुष्य त्यात ३० वर्षे शिक्षणात आणि १९४६ नंतरचा काळ दिल्लीत व्यस्त राहीलेला अवघी २५ वर्षे मिळाली बाबासाहेबाना चळवळ आणि लेखनाला… त्यात तब्येतीची अजिबात साथ नाही. इतक्या थोड्या काळात हा माणूस नियतकालिके चालवतो, २३ ग्रंथ लिहितो, शेकडो लेख लिहून भाषणे करत राहतो मनुस्मृती दहन, चवदार तळे,काळाराम मंदिर आंदोलन, शिक्षणसंस्था स्थापना, राजकीय पक्ष […]

बातम्या

ओरिसात सापडले तपुस्स आणि भल्लिक यांचे स्तूप

ज्ञानप्राप्ती पूर्वी बुद्धांनी सुजाताने दिलेल्या खीरचे सेवन केले होते याचे बौद्ध साहित्यात मोठे वर्णन आढळून येते. त्याचप्रमाणे ज्ञानप्राप्तीनंतर भगवान बुद्धांनी चार आठवड्याच्या ध्याना नंतर राजायतन वृक्षाखाली बसून तपुस्स आणि भल्लिक यांनी दिलेल्या मधुमिश्रित सत्तू पदार्थाचे सेवन केले होते हे ही तितकेच महत्वाचे आहे. खीर सेवनाने एकाग्रता साधून ज्ञानप्राप्तीचे लक्ष्य साधता आले तर मधुमिश्रीत सत्तू खाऊन […]

इतिहास

यशोधरेची यशोगाथा अशी आहे की तिचे वर्णन वाचल्यावर मन गलबलून जाते

बौद्ध धम्माच्या साहित्यामुळे बुद्धसमकालीन श्रावकसंघातील अनेक व्यक्तींचा परिचय होतो. असंख्य महाश्रावक, भिक्षुंणी, उपासक आणि उपासिका यांची माहिती मिळते. त्यातील एका भिक्षूणीची व्यक्तिरेखा अशी आहे की तिचे वर्णन वाचल्यावर मन गलबलून जाते. ही भिक्षूणी दुसरी तिसरी कोणी नसून सिद्धार्थ गौतम यांची पत्नी यशोधरा होय. बौद्ध साहित्यात त्यांच्याबद्दल जास्त कुठे लिहिलेले आढळत नाही. पुत्र राहुल याचे संगोपन […]

इतिहास

तथागतांच्या महापरिनिर्वानानंतर ते आजतागायतपर्यंत रक्षा-अस्थींचा अत्यंत रोचक प्रवास

भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वानानंतर ते आजतागायतपर्यंत त्यांच्या रक्षा-अस्थी पूजनीय राहिल्या असल्या तरी जवळपास २६०० वर्ष या रक्षा-अस्थींचा प्रवास अत्यंत रोचक व अनेकदा गहन असा राहिलेला आहे. तथागतांच्या रक्षा, अस्थी ते त्यांच्या नित्य वापरातील वस्तुंनी जवळपास अर्धे जग पादाक्रांत केलेले आहे. तथागतांच्या रक्षा-अस्थींचे चौर्य ते त्यातील काही अवशेषांचा विनाश करण्याचे प्रयत्नही अनेकदा झालेले आहेत. कंबोडियातही अलीकडेच बुद्ध […]