बातम्या

देशातील सर्वात उंच बुद्धाची मूर्ती ‘या’ राज्यात होणार; काम सुरु

बिहार राज्यात नवादा- हिसुआ रस्त्यावर देशातील सर्वात उंच बुद्धमूर्तीचे काम सुरु आहे. हे काम २०१७ पासून सुरु असून वट थाई नालंदा फाउंडेशनतर्फे ही बुद्ध मूर्ती तयार केली जात आहे. बोधगयाचे दीपक कुमार गौर हिसुआमध्ये भगवान बुद्धांची १०८ फूट उंच मूर्ती तयार करण्याचे काम करत आहेत.

बुद्धमूर्ती गया-नवादा रोडवरील हिसुआ रेल्वे क्रॉसिंगजवळ तयार करण्यात येत आहे. तसेच या बुद्धमूर्तीचे वैशिष्ट्ये म्हणजे भगवान बुद्ध भूमीच्या स्पर्शात ध्यान स्वरूपात बसलेली मूर्ती असेल.

आपल्या ज्ञानाचा साक्षीदार पृथ्वीला मानून या भूमीला स्पर्श करताना भगवान बुद्धांची मूर्ती असणार आहे. मूर्तीमध्ये भगवान बुद्धांचे डोळे बंद असतील आणि वज्रसानावर बसलेले दर्शविले जाईल. ही भगवान बुद्धांची मूर्ती भारतातील सर्वात उंच मूर्ती असल्याचे मानले जाते.