भगवान बुद्ध नेहमी एका कुशीवर पडून निद्रा घेत असत. संपूर्ण रात्र ते एका अंगावर व डोक्याला हाताचा उशीसारखा आधार देत काढीत असत. तसेच संपूर्ण रात्र ते आपली शरीराची स्थिती बदलीत नसत. त्यांची निद्रा घेण्याची ही पध्दत शिष्य आनंद याला ठाऊक होती.

एकदा त्याने बुद्धांना विचारले ‘भन्ते, आपण संपूर्ण रात्र एका कुशीवर पहुडता. डोक्याला हाताचा आधार देता. आपण बिलकुल हालचाल करीत नाही. असे वाटते आपण निद्रिस्त नसून जागेच आहात’. बुद्ध म्हणाले ‘जेव्हा कायेबाबत श्रमण सातत्याने समता भावनेत राहतो, तेव्हा तो स्वाभाविकच जागृत राहतो’

महापरिनिर्वाण झाले त्या वैशाख पौर्णिमेच्या रात्री बुद्ध उजव्या कुशीवर व उजव्या हाताचा आधार मस्तकास देऊन पहुडले होते. एखाद्याने त्यांच्याकडे बघितले तर ते जागृत आहेत असे वाटत असे. या स्थितीतच त्यांचे महापरिनिर्वाण झाले असे आनंदने सांगितले आहे. त्यामुळे त्यांच्या शेवटच्या क्षणाची पहुडलेल्या स्थितीची अनेक शिल्पे त्याकाळी तयार झाली. व अजूनही श्रीलंका, चीन, थायलंड, कंबोडिया, म्यानमार येथे तयार केली जातात.

अजिंठा लेण्यांमध्ये सुद्धा एका कुशीवर पहुडलेल्या अवस्थेत महापरिनिर्वाण झाल्याचे बुद्धांचे शिल्प आहे. श्रीलंका येथे गलविहारात सुद्धा पहुडलेल्या बुद्धांचे मोठे शिल्प आहे. नुसत्या आशिया खंडातील सर्व देशांत नव्हे तर अमेरिकेत सुद्धा फ्लोरिडा येथे महापरिनिर्वाण अवस्थेतील शिल्प उभारण्यात आले आहे.
संजय सावंत, नवी मुंबई
Namo Buddhay
Very nice
काये बाबत समता भावनेने राहणे म्हणजे काय हे समजावल्यास अजून द्न्यानात भर पडेल
जरूर सर …! या बद्दल थोडा विपस्सना साधनेचा अभ्यास असेल तर या गोष्टी समजतील.
Nice information
namo budhhay
.
Thanks for this to know us buddha easily at any time anywere
Awesome????