इतिहास

कोलंबसच्या १००० वर्षापूर्वीच बौद्ध भिक्खु अमेरिकेत पोहचले?

इसवी सनाच्या पाचव्या शताब्दीमध्ये पाच बौद्ध भिक्खू रशियाच्या उत्तर सीमेकडून कालक्रमणा करीत कामश्चटिका व्दीपसमूहाकडून जात, पॅसिफिक महासागरातून प्रवास करीत अलास्कामागे अमेरिकेस पोहोचले आणि दक्षिणेस मेक्सिकोपर्यंत गेले.

मेक्सिकोमधील मूळ रहिवाशांचे आचार-विचार बौद्धांशी मिळतेजुळते आहेत. मेक्सिकोमधील ‘आगवे नावाच्या वृक्षापासून तयार केलेले कापड, तेथील राहण्याच्या चालीरीती, वस्त्र विणण्याच्या पद्धती, कागद तयार करावयाच्या पद्धति, इत्यादीचे वर्णन चिनी प्रवासी ह्यू एन कडून चीनमधील पाचव्या शताब्दीमधील याना युआनच्या कारकिर्दीतील वर्णनावरून माहिती मिळते.

मेक्सिकोमध्ये अजूनही एक दंतकथा प्रचलित आहे की, एक श्वेतकाय परदेशी पुरुष तेथे आला होता व त्याने तेथील लोकांना न्याय आणि सदाचाराची शिकवण दिली होती आणि मैगज लिना गावी त्याच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली होती.

ग्वाटेमाला देशात बुद्धधम्माच्या अस्तित्वाची अनेक चिन्हे दिसून येतात. येथे गौतम आणि शाक्य ही दोन्ही नावे अनेक नावांशी मिळतीजुळती आहेत. ग्वातिमाला हा “गौतमालय” शब्दाचा अपभ्रंश आहे. त्यांच्या पुरोहितास “ग्वाटेमोट-विज” म्हणतात. तो शब्द गौतम शब्दाशी संलग्न आहे.

यास्काका, शाकाटापेक, जाकाटलाम, शाकापुलास हे शब्द ‘ ‘शाल्क’ शब्दाशी संबंधित आहेत. पालेस्के मध्ये बुद्धमूर्ती आहे जिला ‘शाकमोल’ म्हणजे शाक्य मुनी म्हणतात. कोलोराडो नदीच्या पात्रात एक द्वीप आहे ज्याच्या एका पुरोहिताचे नाव गौतुशाका ( गौतम शाक्य ) असे आहे. येथे पुष्कळ बुद्धमूर्ती, भिक्खूमूर्ती, हत्तींचे पुतळे चीनच्या पॅगोडा सारखी मंदिरे, स्तूप, विहार इत्यादी पाहावयास मिळतात खरे म्हणजे तेथे हत्ती कधीच नव्हते, तरीपण हत्तीचे पुतळे बघावयास मिळतात.

(बघावे Buddhist Discovery of Armerica, Harpers Magazine for July 1901) या सर्व गोष्टीमुळे हे सिद्ध होते की १४०० वर्षांपूर्वी बौद्धभिक्खू अमेरिकेस गेले होते आणि त्यांनी तेथे धम्माचा प्रसार केला म्हणजे कोलंबसापूर्वी १००० वर्षापूर्वीच बौद्ध भिक्खु तेथे पोहचले होते.

संदर्भ – बौद्धधम्म जिज्ञासा

5 Replies to “कोलंबसच्या १००० वर्षापूर्वीच बौद्ध भिक्खु अमेरिकेत पोहचले?

  1. Very precious information about Buddhism,d whole Earth is Buddha’s land, it’s a holy, sacred land. I’m proud of being buddhist.

  2. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *