बातम्या

आदर्श शिंदे यांच्या बुलंद आवाजातून अंगावर काटा आणणारे “बाबासाहेब जिंदाबाद” गाणं प्रदर्शित

आदर्श शिंदे -उत्कर्ष शिंदे त्यांच्या दमदार संगीतातून व आदर्श शिंदे यांच्या बुलंद आवाजातून अंगावर काटा आणणारे “बाबासाहेब जिंदाबाद ” हे गाणं आज प्रदर्शित झाले आहे. याबाबत प्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांनी फेसबुक पोस्ट करून “बाबासाहेब जिंदाबाद” हे गाणं शेअर केलं आहे.

आदर्श शिंदे यांनी फेसबुकवर केलेल्या पोस्टमध्ये असंघटितांच्या प्रश्‍नांवर लढे उभारण्याचा संकल्प करून झोपलेल्यांना जागं करण्यासाठी व जागे झालेल्यांना सोबत घेऊन समाज परिवर्तनासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ज्वलंत विचार व त्यांनी केलेल्या अमूल्य कार्याचं दर्शन घडवून समाजमनात नव क्रांतीचा लढा पुन्हा पेटवण्याठी शिंदेशाही च्या पिढ्यांतून, आमच्या रक्तातून येत असलेली साद- “बाबासाहेब जिंदाबाद” असे म्हटले आहे.

 

2 Replies to “आदर्श शिंदे यांच्या बुलंद आवाजातून अंगावर काटा आणणारे “बाबासाहेब जिंदाबाद” गाणं प्रदर्शित

Comments are closed.