बातम्या

पालि रिसर्च इन्स्टिट्यूट मुंबई तर्फे अखिल भारतीय पालि व्याख्यानमालाचे आयोजन

पालि रिसर्च इन्स्टिट्यूट मुंबई आयोजित अखिल भारतीय पालि व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. सदर व्याख्यानमालेत पालि भाषा व वाङ्मयासंबंधीच्या समस्या व संभावना विषयी भारतातील नामवंत पालि विद्वान / धम्म अभ्यासक आपले विचार मांडणार आहेत.

पालि रिसर्च इन्स्टिट्यूट मुंबईच्या वतीने सर्व पालि भाषा प्रेमींनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्याकरिता आपण या http://www.paliresearchinstitute.com/registration.html लिंक वर click करून आपले Registration करू शकता.

अखिल भारतीय पालि व्याख्यानमाला ३ नोव्हेंबर रोजी (रविवारी) शारदा मंगल कार्यालय, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय मार्ग, दादर (पूर्व) मुंबई -२८ येथे होणार आहे.

कालेन धम्मसाकच्छा, एतं मङ्गलमुत्तमं
वेळोवेळी धम्मचर्चा करणे उत्तम मंगल असते.

One Reply to “पालि रिसर्च इन्स्टिट्यूट मुंबई तर्फे अखिल भारतीय पालि व्याख्यानमालाचे आयोजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *