आंबेडकर Live

महामानवाची पुण्यातून सुरु झालेली जयंती आता ग्लोबल

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आता राष्ट्रीय उत्सव झाला आहे. फक्त भारतात भीमजयंती साजरी न होता जगातील ६५ देशात बाबासाहेबांची जयंती साजरी मोठ्या उत्साहात साजरी होतेय. विदेशात जयंती साजरी होण्याचे मुख्य कारण म्हणजे दलित आणि बौद्ध समाजातील लोक मोठ्या प्रमाणात उच्चशिक्षण घेऊन विदेशात स्थायिक झाले. ज्या महामानवामुळे आपण हे दिवस पाहतोय म्हणून कृतज्ञ व्यक्त करण्यासाठी ज्या देशात राहतात, त्या देशात १४ एप्रिलला एकत्र येऊन उत्साहात विविध कार्यक्रम आणि उपक्रम आयोजन करून जयंती साजरी करताना दिसत आहेत.

मोठ्या उत्साहात देशभरात प्रत्येक राज्यात, जिल्ह्यात आणि गावात एखाद्या महापुरुषाची जयंती साजरी होणारे बाबासाहेब एकमेव आहेत. बाबासाहेबांची जयंती कधी सुरु झाली? असा आपल्याला प्रश्न पडला असेल तर पहिली जयंती नाही तर डॉ बाबासाहेब यांचा पहिला वाढदिवस पुण्यात प्रथम 14 एप्रिल 1928 रोजी सामाजिक कार्यकर्ते जनार्दन सदाशिव रणपिसे यांनी साजरा केला. इतकेच नव्हे तर या जन्मदिवस समारंभाचे ते जणू शिल्पकारच ठरले.

बाबासाहेबांच्या जयंतीची प्रथा त्यांनीच सुरू केली. खडकी पत्र विभाग दलित मंडळाचे अध्यक्ष असताना जयंतीचे औचित्य साधत त्यांनी बाबासाहेबांची प्रतिमा हत्तीच्या अंबारीत ठेवून प्रभात फिल्म कंपनीच्या रथातून, उंटावरून प्रचंड मिरवणुका काढल्या होत्या.यानंतर खडकी भागात प्रत्येक वस्तीत आंबेडकरांची जयंती साजरी व्हायला लागली.

या सर्व वस्त्यांचे भाऊसाहेबांनी एकीकरण घडवून दलित मंडळाची स्थापना केली, या मंडळातर्फे आंबेडकरांची जयंती भव्य प्रमाणात साजरी केली. २४ ऑगस्ट १९५८ रोजी रणपिसे यांच्या 60 व्या वाढदिवसानिमित्त मित्रमंडळीने पुणे शहरात त्यांचा सत्कार समारंभ घडवून आणला होता. बाबासाहेबांची पहिली जयंती साजरी करत या उपक्रमाची सुरुवात करणाऱ्या भाऊसाहेबांनी विद्यार्थ्यांसोबतच अस्पृश्यवर्गाची जी बहुमोल सेवा केली त्याबद्दल संपूर्ण आंबेडकरी समाज त्यांचा सदैव ऋणी राहील यात शंका नाही.

यांनतर महाराष्ट्रसह देशातील प्रत्येक राज्यात दलित समाजाने डॉ बाबासाहेबांची जयंती साजरी होऊ लागली. अनेक ठिकाणी विरोध झाला तरीही आंबेडकरी जनतेने मोठ्या उत्साहाने जयंती साजरी करीत आपल्या बाबासाहेबांना ग्लोबल केले.

6 Replies to “महामानवाची पुण्यातून सुरु झालेली जयंती आता ग्लोबल

Comments are closed.