जगभरातील बुद्ध धम्म

युरोपातील ‘या’ देशात डॉ.आंबेडकरांच्या नावाने ३ शाळा; लाखो लोक बौद्ध धम्माच्या मार्गावर…

युरोपमधील हंगेरीतील जिप्सी समूहाय हा दलितांप्रमाणे कनिष्ठ मानला गेलेला असून त्यांना शिक्षणापासून व इतर सुविधांपासून वंचित ठेवण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या दलित-अस्पृश्य समूदायाच्या उत्थानासाठी केलेला संघर्ष हा जिप्सी लोकांना प्रेरक ठरला व त्यांनी जिप्सी लोकांत बाबासाहेबांचे संघर्ष सांगण्याचे व विचार रूजविण्याचे काम केले तसेच बाबासाहेबांचा नवयान बौद्ध धम्माचाही स्वीकार केला. बाबासाहेबांसारखेच जिप्सी लोकांना गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी येथे प्रयत्न केले जात आहेत. यातूनच जिप्सी मुलांसाठी येथे ‘डॉ. आंबेडकर हायस्कूल’ हे उत्कृष्ठ विद्यालय सुरू करण्यात आले.

हंगेरी देशातील जिप्सी लोकांचे नेते जानोस ओरसोस यांच्यावर आंबेडकरांच्या विचारांचा प्रभाव पडला. त्यांनी आंबेडकरांचे विचार जिप्सो लोकांमध्ये पेरून त्यांच्यात परिवर्तन घडवून आणले. रोमा जिप्सी ही मुख्यत्वे युरोपमध्ये राहणारी भटकी जमात आहे. यांना रोमानी किंवा जिप्सी या नावानेही ओळखतात.1990 च्या दशकाच्या उत्तरार्धात, काही हंगेरियन रोमानी लोकांना स्वतःच्या परिस्थितीत आणि भारतातील दलित लोकांच्या परिस्थितीत साम्यता आढळून आली; त्यांनी आंबेडकरांच्या धर्मांतरापासून प्रेरित होऊन बौद्ध धर्मांत रूपांतरित होण्यास सुरुवात केली.

जय भीम नेटवर्क
जय भीम नेटवर्क हे हंगेरी देशातील जिप्सी लोकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून प्रेरित होऊन बनवलेले एक सामाजिक व शैक्षणिक संघटन आहे. हंगेरीयन लोकांनी 2007 मध्ये सांजाकोजा शहरात डॉ. आंबेडकर हायस्कूल नावाची शाळा सुरू केली. हंगेरीत आंबेडकरांच्या नावाने तीन विद्यालये सुरु करण्यात आली आहेत. येथे विद्यार्थ्यांना आंबेडकरांचे धडे शिकवले जातात. त्यामध्ये आंबेडकरांचा शिक्षणासाठीचा संघर्ष, जातिविरोधी चळवळी व भारतीय संविधान निर्मितीतील योगदान या बाबी शिकवल्या जातात. या शाळेत 14 एप्रिल 2016 रोजी आंबेडकरांचा अर्धपुतळा स्थापन करण्यात आला आहे, जो हंगेरीतील जयभीम नेटवर्कने शाळेस भेट दिला होता.

डॉ.आंबेडकर हायस्कूल (हंगेरी)
डॉ. आंबेडकर हायस्कूल ही हंगेरी देशातील साजोकाझा शहरातील एक शाळा आहे. जिप्सी समाजाच्या नेत्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून प्रभावित होऊन या शाळेची स्थापना इ.स. २००७ मध्ये केली.विद्यालयात बाबासाहेबांची पुस्तके असून त्यांचे विविध चित्रे व विचारही लावण्यात आलेले आहेत. येथे विद्यार्थ्यांना बाबासाहेबांचे पाठही शिकवले जातात. त्यामध्ये बाबासाहेबांचा शिक्षणासाठीचा संघर्ष, जातिविरोधी चळवळी व भारतीय संविधान निर्मिती अमूल्य योगदान या बाबी शिकवल्या जातात. हंगेरी देशाचे शिक्षणमंत्री पालकोवीक्स यांनीही या शाळेला भेट दिलेली आहे. हंगेरीतील जय भीम नेटवर्कने या शाळेला आंबेडकर जयंती १४ एप्रिल २०१६ रोजी डॉ. आंबेडकरांचा अर्धपुतळा दिलेला आहे.