बातम्या

डॉ.हर्षदीप कांबळे यांच्याकडून युवकांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याची मोठी घोषणा

सोशल मीडियाच्या माध्यमातून लहानापासून ते मोठ्यांपर्यंत अनेक क्रिएटिव्हिटी समोर येत आहेत. नुकतेच ऑनलाईन जागतिक धम्म परिषदेच्या निमित्ताने ऑनलाईन बुद्ध वंदना आणि व्हिडिओ कॉम्पिटेशन आयोजित करण्यात आले होते. शनिवारी (ता. १६) या कॉम्पिटेशनचे निकाल वरिष्ठ सनदी अधिकारी डॉ हर्षदीप कांबळे सरांनी घोषित केले. या कॉम्पिटेशन मध्ये आलेले व्हिडिओज पाहून डॉ.कांबळे सर यांनी लहान मुलांसह युवकांच्या क्रिएटिव्हिटीचे कौतुक करून तसेच ह्या युवकांसाठी एखादे प्लॅटफॉर्म असणे गरजेचे आहे. हे ओळखून युवकांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे.

शनिवारी सायंकाळी ऑनलाईन बुद्ध वंदना आणि व्हिडिओ कॉम्पिटेशनचा निकाल फेसबुक लाईव्हच्या माध्यमातू जाहीर करण्यात आले. हा निकाल ३० हजार लोकांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून पाहिला आहे. विशेष म्हणजे यावेळी डॉ.कांबळे सरांनी युवकांसाठी विविध ऑनलाईन उपक्रम सुरु करण्यासंदर्भात आपले विचार मांडले.

डॉ.कांबळे सर यावेळी बोलताना म्हणाले की, डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून युवकांना करिअर, नोकरी आणि विविध क्रिएटिव्हिटीसाठी वापर करता येईल. ज्या मुलांना अभ्यासात अडचणी येतात त्यांचे प्रश्न ऑनलाइनच्या माध्यमातून सोडवण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींना बोलावून मार्गदर्शन मिळेल.

यासह व्हिडिओ कॉम्पिटिशनच्या माध्यमातून अनेक टिक टॉक स्टार समोर आले आहेत. त्याचा सामाजिक आणि धम्म चळवळीसाठी योग्य कसा वापर करता येईल. त्यासोबतच gabcindia2020.in ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून धम्मावरील लेख,व्हिडिओ, चांगले विचार, युवकांना लिहिण्याची संधी मिळेल. जग खूप मोठे असून आता आपल्यालाही मोठे व्हावे लागेल असे म्हणत युवकांना प्रोत्साहित केले. यापुढेही लहान मुलांसाठी ऑनलाईन ऑनलाईन कार्यक्रम, स्पर्धा होणार असल्याचे डॉ.कांबळे सर यांनी सांगितले. डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध करण्याच्या घोषणेनंतर युवकांमध्ये उत्साह निर्माण झाला असून पुढे डॉ.कांबळे सर काय करणार आहेत याकडे युवकांचे लक्ष लागले आहे.

आज रात्री ७:३० वाजता डॉ.हर्षदीप कांबळे सर ”लॉकडाऊन नंतरच्या व्यावसायीक संधी” या विषयावर बोलणार आहेत. तुम्हाला त्यांच्या या चर्चेचा नक्कीच फायदा होईल. सोबतच त्यांच्याशी संवाद साधण्याची व तुमच्या शंका विचारण्याची संधीही तुम्हाला मिळणार आहे. तर, या संधीचा फायदा घेण्यासाठी तयार राहा. त्यासाठी www.gbcindia2020.in वर लॉगऑन करा.