ब्लॉग

जाती आधारीत भेदभाव ऍपल कंपनी मध्ये सहन केल्या जाणार नाही; ऍपल कंपनीची भूमिका

ऍपल जगातली सर्वात मोठी कंपनी. 3 ट्रिलियन, म्हणजे भारताच्या संपूर्ण GDP पेक्षा अवघ्या 0.7 ने कमी मार्केट कॅपिटल ऍपल च आहे. या ऍपल ने आपल्या एम्प्लॉय कंडक्ट पॉलिसी मधे जातीय भेदभावाच्या विरोधात भूमिका घेतली आहे. इतर प्रकारच्या भेदभावासह जाती आधारीत भेदभाव सुद्धा आता ऍपल मध्ये सहन केल्या जाणार नाही. हा अंतरराष्ट्रीय पातळीवर जतिअंताच्या चळवळीचं मोठं यश आहे.

अमेरिके सारख्या परक्या देशात भारताच्या समस्ये विरोधात भूमिका घेतली जात आहे. या आधी अमेरिकेतील अनेक विद्यापीठांनी सुद्धा अश्या प्रकारची जातीभेद विरोधी भूमिका घेतली आहे. भारतातील जातीवादी उच्चवर्णीय जगात जिथे जातात तिथे आपली ही जातीची घाण पसरवतात. त्यामूळे जगातील विकसित देश अश्या प्रकारे स्पष्टपणे जातीव्यवस्थेच्या विरोधात भूमिका घेत आहेत. परंतु भारतात अजूनही सर्रास, सार्वजनिक रित्या आणि सरकारी यंत्रणेचा वापर करून जातीचा माज कुरवाळल्या जातो.

भारतातील सर्वच मल्टीनॅशनल किंवा इतर कंपन्या, कॉर्पोरेट हाऊसेस, इत्यादी मधे मोठ्या पदांवर जाऊन बसलेले जातीवादी सवर्ण जात बघून नोकरी द्यायची की नाही, काम, वेंडरशिप द्यायची की नाही हे ठरवतात. उद्या ऍपल च युनिट भारतात सुरू झालं तर त्यात सुद्धा तेच होईल, अशी एम्प्लॉयी कंडक्ट पॉलिसी असली तरी ती केवळ कागदोपत्री असेल. अजूनही भारतातल्या सो कॉल्ड लेफ्ट, लिबरल, पुरोगामीयांना सुद्धा जातीची समस्या मुख्य समस्याच वाटत नाही.

या बाबतीत अनुल्लेखाने मारून या मुख्य समस्येला अघोषितरित्या बळ दिल्या जाते. त्यामुळे प्रस्थापित सर्वच ठिकाणी सर्रास जातीचा अहंकार जोपासल्या जातो आणि जातीव्यवस्थेच्या शोषित लोकांनाच जातीवादी ठरवण्याचा प्रयत्न सर्रासपने केला जातो. आणि या एका समस्ये मुळेच भारत मागास असून मोठी क्षमता असतानाही या विकसित देशांच्या तुलनेत कुठेच नाही हे आपले वास्तव आहे. वापरता येत नसतानाही अनेकजण स्टेटस आणि बडेजाव दाखवण्यासाठी ऍपलचा आयफोन वापरतात आणि जातीय माज बाळगतात. अश्यांनी जरा आपल्या मनातील घाण आपल्या आयफोनच्या सेल्फित बघावी.

– मुकुल निकाळजे