बातम्या

डॉ.हर्षदीप कांबळे यांनी अपत्याबाबत घेतलेल्या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक

महाराष्ट्रातील ज्येष्ट सनदी अधिकारी डॉ हर्षदीप कांबळे यांचा नुकताच ५० वा वाढदिवस झाला आहे. त्यानिमित्त एका माध्यमाने त्यांची मुलाखत घेतली होती. त्या मुलाखतीमध्ये डॉ.कांबळे यांनी म्हटले होते की, मी आणि माझ्या पत्नीने म्हणजेच आम्ही दोघांनी निर्णय घेतला आहे की स्वतःला एकही अपत्य होऊ द्यायचे नाही. तर समाजातीलच गरजू मुलांनाच मदत करायची आणि घडवायचे असा निर्धार केला आहे.” असे सांगितल्यावर सोशल मीडियात अनेक भाविनक प्रतिक्रिया उमटल्या त्यासोबत सर्वच स्तरातून डॉ.कांबळे यांचे कौतुक करणाऱ्या पोस्ट सोशल माध्यमांवर केल्या आहेत.

राजमाता जिजाऊचे वंशज नामदेवराव जाधव, ज्यांनी शिवाजी द मॅनॅजमेन्ट गुरु हे पुस्तक लिहून जगात खळबळ उडवून दिली, त्यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून ह्या संदर्भातील दिलेला संदेश फारच बोलका आहे. ते म्हणतात “डॉ हर्षदीप कांबळे यांनी रक्ताच्या वारसा पेक्षा बाबासाहेब आणि बुद्धाच्या विचारांचा वारसा चालविला पाहिजे हा खूप मोठा निर्णय घेऊन डॉ कांबळेंनी सर्व समाजातील लोकांना हा आदर्श घालून दिला आहे.” त्याचे फेसबुकचा संदेश इथे पाहता येईल…

आपल्या समाजातील गरीब होतकरू मुले हीच आपली संतती आणि संपत्ती समजणारे सतत लोकसेवेचा वसा घेतलेले हजारो कुटुंबाचा उद्धार करणारे जेष्ठ सनदी अधिकारी डॉ हर्षदीप कांबळे साहेब यांना 50 व्या वाढदिवस निमित्ताने लाख लाख शुभेच्छा. Maggi या घातक खाद्यपदार्थ वर बंदी घालून लाखो मुलांचे नागरिकांचे प्राण वाचवणारे सिंघम अधिकारी ही त्यांची ओळख आहे.कोरोनाच्या महामारीमुळे निर्माण होणाऱ्या लाखो बेरीजगार तरुणांचा आणि डबघाईला आलेल्या हजारो उद्योगांचा तारणहार असणारे क्रांतिकारक अधिकारी म्हणजे डॉ हर्षदीप कांबळे साहेब. त्यांचे असे अनेक अज्ञात पैलू समजून घेण्यासाठी हा व्हिडीओ पुर्ण पहा शेअर करा आणि शुभेच्छा सुद्धा द्या.

Posted by Namdevrao Jadhav on Wednesday, May 20, 2020

आगरी कोळी समाजाचे नेते राजाराम पाटील यांनी डॉ कांबळे हे एक उत्कृष्ट प्रशासक असून कलेक्टर पासून तर आता उद्योग आयुक्त असताना त्यांनी महाराष्ट्रासाठी नवनवीन योजना बनवल्या आहेत. आणि मी कालच त्यांच्या व्यक्तिगत जीवनाबद्दल घेतलेला निर्णय ऐकला..अत्युच्य त्याग आणि दान पारमितेच्या डॉ कांबळे ह्यांच्या निर्णयाचे मी मनापासून कौतुक करतो. अश्या त्यागाने आपला वाढदिवस साजरा करणाऱ्या आणि सगळ्यांसाठी एक आदर्श घालून, बाबासाहेबांच्या आणि तथागतांच्या विचारताना पुढे नेणाऱ्या डॉ कांबळे यांना खूप खूप शुभेच्छा देतो. राजाराम पाटील यांचा लेख ह्या ठिकाणी पाहता येईल.

*कोरोना आणि डॉ हर्षदीप कांबळे यांचा वाढदिवस!* *जग कोरोनाच्या महामारीत स्वतःच्याच 'नजरकैदेत' असताना आम्ही,…

Posted by Rajaram Patil on Thursday, May 21, 2020

डॉ.कांबळे यांचा हा निर्णय वैयक्तिक असला तरी त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांनी अनेक भाविक प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी एकतरी अपत्य असायला हवे अश्या प्रतिक्रिया दिल्या. त्यासोबतच काहींनी डॉ.कांबळे यांनी समाजातील गरीब मुलांसाठी स्वतःचे अपत्य न होऊ द्यायचा घेतलेला निर्णय हा देशातील सर्व जाती-धर्मातील लोकांना प्रेरणा देणारा असल्याचे म्हणत कौतुकाचा वर्षाव होत आहे. विशेष म्हणजे सर्व स्तरातून १० हजार वेगवेगळ्या प्रतिक्रिया आपल्याकडे आल्या आहेत. त्यातील काही निवडक प्रतिक्रिया देत आहोत.

विनय सूर्यवंशी यांची प्रतिक्रिया :

सुप्रिया कदम यांची प्रतिक्रिया :

गोपाळ यादव यांची प्रतिक्रिया :

राजेंद्र महाले यांची प्रतिक्रिया :

खालीक शेख यांची प्रतिक्रिया :

डॉ.कांबळे यांच्या निर्णयानंतर याविषयाची बातमी राज्यभरात व्हायरल झाली आहे. असा निर्णय घेणारे बहुधा देशातील ते पहिलेच आयएएस अधिकारी असावेत अशी चर्चा सर्वत्र होताना दिसत आहे. डॉ कांबळे यांच्या ह्या त्यागातून हजारो गरजू गरीब मुलांना पुढे जाण्याची संधी मिळेल. त्यासोबतच ही गरजू मुले डॉ.कांबळे यांच्या विचाराचा वारसा पुढे घेऊन जातील आणि धम्माचे विचार आचरणात आणून स्वतःसह देशाला पुढे नेण्यात यशस्वी होतील यात शंका नाही.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *