ब्लॉग

लोरिया नंदनगढ येथील अशोकस्तंभ आणि स्तूप

‘लोरिया नंदनगढ’ हे छोटे शहर बिहार राज्यात चंपारण जिल्ह्यामध्ये असून ते नरकटीगंज पासून १४ कि.मी. अंतरावर व बेटिया पासून २८ कि.मी. अंतरावर आहे. हे शहर बु-हीगंडक नदीजवळ वसले असून तेथे पुरातन सुस्थितील वालुकामय दगडातील अशोकस्तंभ आहे. हा अशोकस्तंभ दहा मीटर उंचीचा असून अद्याप चमकदार आहे. तसेच यावरती ब्राम्हीलिपीमधील लेख आहेत. स्तंभापासून दोन कि.मी.वर वायव्य दिशेस स्तूपाच्या १५ टेकड्या आहेत.या सर्व टेकड्यांमध्ये पक्क्या विटांचा वापर केला असून १८६२ मध्ये इंग्रजांच्या काळात तेथे खोदकाम करण्यात आले होते आणि तिथे रक्षा प्राप्त झाल्या अशी नोंद आहे.

लोरिया नंदनगढ येथील ही बौद्ध पुरातन स्थळे पुरातत्व विभागाच्या ताब्यात आहेत परंतु गेल्या साठ वर्षात येथे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे. बिहार राज्य सरकारने मनावर घेऊन येथे पर्यटन स्थळ म्हणून विकास केल्यास असंख्य पर्यटक अशोकस्तंभ आणि स्तुप बघण्यास येतील असे स्थानिकांना वाटते. युट्युबवर याची व्हिडिओ क्लिप बघितल्यावर हा मौल्यवान ठेवा अद्याप दुर्लक्षित असल्याचे जाणवते.

-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – बौद्ध इतिहास अभ्यासक)