लेणी

औरंगाबादच्या या प्रसिद्ध १२ बौद्ध लेण्यांचा इतिहास जाणून घ्या!

औरंगाबाद शहराच्या उत्तरेस तीन किलोमीटर अंतरावर औरंगाबादची प्रसिद्ध १२ बौद्ध लेणी आहेत. थेरवादी बौद्धांची लेणी इ.स नंतर दुसर्‍या शतकातील आहेत. महायानी बौद्धांनी पाचव्या शतकात काही जुन्या लेण्यांत बदल करून नवीन लेणी तयार केली आणि सातव्या शतकानंतर वज्रयानी बौद्धांनी काही नवीन लेणी तयार केली. औरंगाबादला वज्रयानी बौद्धांचे वास्तव्य नवव्या-दहाव्या शतकापर्यंत होते.

औरंगाबाद येथील काही शिल्प अजिंठ्याच्या शिल्पापेक्षाही सुंदर आहेत. सात नंबरच्या लेण्यांत, बोधिसत्व अवलोकेतेश्वर अग्नी, शत्रूची तलवार, कैद होणे, पाण्यात बोट बूडणे , इत्यादी पासून तसेच सिंहासारख्या हिंस्र पशूपासून, सापादि सरपटणाऱ्या प्राण्यांपासून, पिसाळलेल्या हत्तीपासून अणि रोगापासून निर्माण होणाऱ्या संकटातून उपासकांचे कसे संरक्षण करतो हे दाखविले आहे.

अशा शिल्पाला ” वंदना शिल्प” असे म्हणतात. या वंदनेत आठ प्रकारच्या संकटातून रक्षण व्हावे म्हणून अवलोकेतेश्वराला विनंती केलेली असते. व्यापाऱ्यांना प्रवासात आणि इतरत्र उत्पन्न होणाऱ्या संकटांची सर्वसाधारणपणे ही एक यादी आहे. असे वंदन शिल्प किंवा चित्र, महायानी आणि वज्रयानी बौद्धांनी बर्‍याच ठिकाणी काढून घेतल्याचे दिसून येते.

One Reply to “औरंगाबादच्या या प्रसिद्ध १२ बौद्ध लेण्यांचा इतिहास जाणून घ्या!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *