बातम्या

बौद्ध शिल्प गहाळ झाल्यास येथे नोंद करा

बिहारमध्ये ठिकठिकाणी गावोगावी बुद्धांची अगणित शिल्पे सापडत आहेत. मागे म्हटल्याप्रमाणे अनेक शिल्पांची नोंद नसल्यामुळे त्यांच्या चोऱ्या होत आहेत. अशा बुद्धमूर्तींना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी असल्यामुळे या टोळ्या स्थानिक चोरांना हाताशी धरून मूर्त्यांची चोरी करतात. आणि यामध्ये काही देशद्रोही गावकरी सुद्धा सामील असतात. बिहारमध्ये डिसेंबर २०१४ मध्ये नालंदाजवळ दिपनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रणबिघा गावांमध्ये एकेदिवशी सकाळी […]

इतिहास

नालंदा विद्यापीठाचा अध्यापक आर्यभट

‘नालंदा’ या जगप्रसिद्ध विद्यालयाची स्थापना आणि भरभराट गुप्तकाळात झाली. गुप्त सम्राटांनी त्याकाळी ‘नालंदा’ विद्यापीठाला भरभरून अर्थसहाय्य केले. ‘नालंदा’ हे प्रामुख्याने बौद्ध धम्माच्या शिक्षणाचे केंद्र होते. त्याचबरोबर तेथे इतरही विषयांचे शिक्षण दिले जात होते. प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ आर्यभट याचा जन्म इसवी सन ४७६ मध्ये इथेच झाला. त्याचे सर्व शिक्षण हे पाटलीपुत्रा पासून जवळ असलेल्या नालंदा विद्यापीठात झाले. […]

बातम्या

भीमांजली : डॉ.बाबासाहेब आंबेडकर परिनिर्वाण दिनानिमित्त जगप्रसिद्ध कलावंत ‘महामानवाला’ शास्त्रीय संगीतातून आदरांजली वाहणार…

मुंबई : औरंगाबाद येथील जागतिक बौद्ध धम्म परिषदेच्या यशस्वीतेनंतर अजून एका उपक्रमाचा लाभ बौद्ध बांधवाना घेता येणार आहे. राष्ट्रनिर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समितीचे मुख्य समन्वयक डॉ हर्षदीप कांबळे (आयएएस) यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.बाबासाहेब आंबेडकर परिनिर्वाण दिनानिमित्त ‘भीमांजली’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ६ डिसेंबर रोजी सकाळी ६ वाजता मुंबई (प्रभादेवी) येथील रवींद्र नाट्यमंदिरात हा होणार […]

इतिहास

सांचीचा स्तुप आणि परिसर सुंदर करणारा जॉन मार्शल

ब्रिटीश अधिकारी जनरल टेलरने १८१८ मध्ये सांची स्तूप शोधल्यावर अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांनी तेथे काही मिळेल या अनुषंगाने उत्खनन केले. सर अलेक्झांडर कनिंगहॅम यांनी सुद्धा तेथे उत्खनन १८५१ मध्ये सुरू केले. मुख्य भव्य स्तूप क्र १ मध्ये काय सापडले हे अज्ञात आहे. जो स्तूप टेकडी पासून खाली आहे तो स्तुप क्र. २ असून तेथे मात्र सारीपुत्त […]

ब्लॉग

मध्यप्रदेशातील सांचीतील महाबोधी महोत्सव

मध्यप्रदेश राज्यात सांची येथील महाबोधी महोत्सवानिमित्त पालि रिसर्च इन्स्टिट्यूट मुंबई यांनी तेथे धम्मयात्रा आयोजित केली होती. १९८७ साली प्रथम सांची पाहिल्यानंतर आता इतक्या वर्षांनी परत एकदा सांचीला भेट देण्याचा योग वरील संस्थेतर्फे जुळून आला. तेथील महोत्सव पाहिल्यावर अशोक राजाच्या राणीची नगरी विदिशा गाव, सतधारा येथील स्तुप, सोनारी स्तुप आणि विहार तसेच उदयगिरी लेण्या येथे सुद्धा […]

ब्लॉग

‘थ्री इडियट’ चित्रपट आणि लडाखमधील बौद्ध शाळा

‘थ्री इडियट’ चित्रपटास या वर्षी २५ डिसेंबर रोजी दहा वर्षे होतील. चीन-जपान मध्ये सुद्धा लोकप्रिय झालेला व पुरस्कार पटकवणारा तसेच तामिळमध्ये आणि मेक्सिकन देशात रिमेक झालेल्या या चित्रपटात लडाखचे सुंदर चित्रण आहे. अमिर खानची भूमिका असलेल्या या चित्रपटामध्ये दाखविलेली रॅचोंची शाळा ही प्रत्यक्षात लडाख मधील आहे. या शाळेचा परिसर हा बौद्ध संघाराम विहारासारखा असून मुख्य […]

इतिहास

बिहारमधील पार्वती टेकडीवरील गुहा

बिहारमध्ये नावाडा जिल्ह्यात इंद्रशैल नावाची गुहा असलेली टेकडी पार्वती गावाजवळ आहे. बौद्ध साहित्यात लिहिले आहे की या टेकडीवरील गुहेत भगवान बुद्धांनी एकदा वर्षावास केला होता. तेव्हा तेथे इंद्रशैल हा आकाशदेव आला. व त्याने धम्मासंबंधी ४२ शंका बुद्धांना विचारल्या. तेव्हा बुद्धांनी त्याच्या सर्व शंकांचे निरसन केले. ही टेकडी जवळजवळ दीडशे फूट उंच असून अडीच हजार वर्षांपूर्वी […]

जगभरातील बुद्ध धम्म

थाई देशातील वर्षावास

यावर्षी वर्षावास दिनांक १६ जुलै (आषाढ पौर्णिमा ) रोजी चालू होईल व १३ ऑक्टोबर (आश्विन पौर्णिमा)ला समाप्त होईल. थायलंड येथेही याच कालावधीत वर्षावासाचा कार्यक्रम असून त्याला ‘खाओ फांसा’ म्हणतात. व तो तेथील अनेक विहारात संपन्न होणार आहे. याकाळात भिक्खू पावसाळा सुरू झाल्यामुळे विहारात राहून धम्माचा व साधनेचा अभ्यास करतात. हा वर्षावास सुरू होताना पाहिले तीन […]