बातम्या

14 एप्रिल 2023 रोजी डॉ आंबेडकरांचा देशातील सर्वात उंच पुतळ्याचे उद्घाटन होणार

हैदराबाद : शहरातील हुसेनसागर तलावाशेजारी असलेल्या एनटीआर गार्डनजवळील 10 एकर जागेवर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ फूट उंच पुतळ्याचे काम वेगाने सुरू आहे. पुढील वर्षी 14 एप्रिल रोजी आंबेडकरांच्या 132 व्या जयंतीदिनी मुख्यमंत्री केसीआर यांच्या हस्ते पुतळ्याचे उद्घाटन करण्याची तयारी तेलंगणा सरकार करत आहे. देशातील सर्वात उंच मानल्या जाणाऱ्या या पुतळ्याचे काम फेब्रुवारी 2023 पर्यंत […]

ब्लॉग

डॉ.आंबेडकरांचे जळगाव जिल्ह्याशी होते विशेष नाते; २९ वेळा केला होता जळगाव दौरा

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पावन पदस्पर्शाने पुनित झालेल्या जळगाव जिल्ह्याला मी नुकतीच भेट दिली. जळगावच्या बहिणाबाई चौधरी कॅम्पस् कॉलेजात मुलगी तनिष्का हिची केमिकल इंजिनीअरिंगमध्ये अॅडमिशन घेण्याकरिता गेलो होतो. बाबासाहेबांच्या पुण्याईमुळे मुलीला प्रवेश मिळाला. जळगावात फिरताना मला बाबासाहेबांच्या जामणेर, शेंदुर्णी, आसोदा, सावदा येथील सभेचे स्मरण झाले. सेनू नारायण मेढे गुरुजी, मोतीराम महिपत पाटील, धनजी बिऱ्हाडे, देविदास […]

इतिहास

पाचशे वर्षांपूर्वीची कान्हेरी लेणी कशी दिसत होती? जॉन फ्रेयरच्या प्रवास वर्णनाचा वृत्तान्त

पाचशे वर्षापूर्वी महाराष्ट्र मुघल साम्राज्या विरुद्ध लढत होता तेंव्हा सात बेटांची मुंबई आकार घेत होती. त्यावेळी पोर्तुगीज,डच, फ्रेंच, इंग्रज यांच्यामध्ये व्यापारात मक्तेदारी स्थापन करण्याची अहमिका चालली होती. त्यांच्यात लढाया होत होत्या. महत्त्वाची बंदरे बळकावणे चालले होते. सन १६७० मध्ये मुंबई किल्ल्याच्या आजूबाजूचा सखल परिसर भरतीच्या पाण्यात बुडत असे. या रोगट मुंबईवर त्यावेळी पोर्तुगीजांचे राज्य होते. […]

ब्लॉग

नवनिर्माणाचे स्वप्न पेरणारा दिवस; ७ नोव्हेंबर शाळा प्रवेश दिन

सातारच्या छत्रपती प्रतापसिंह महाराज हायस्कूलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाचा प्रज्ञासूर्य मिळाला. शाळेत त्यांचे पदकमल उमटले आणि याच मातीतून प्रज्ञेच्या, विद्वत्तेच्या अवकाशात उंच भरारी घेण्याचे बळसुद्धा त्यांना प्राप्त झाले. आज, ७ नोव्हेंबर शाळा प्रवेश दिन त्यानिमित्ताने… सातारची माती कसदार आहे. या मातीत भीमराव आंबेडकरांच्या इवल्या इवल्या पावलांचे ठसे उमटले आणि याच मातीतून त्यांनी प्रज्ञेच्या, विद्वत्तेच्या वैश्विक […]

आंबेडकर Live

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच आज आपल्याला दिवाळी ‘बोनस’ मिळतोय

ब्रिटिश काळात भारतातील कामगारांना गुरा-ढोराप्रमाणे वागणूक मिळत होती. कामगारांना 12-12 तास काम करावे लागत असे. एवढे कामे करून सुद्धा भारतीय कामगारांना योग्य ती वागणूक मिळत नव्हती. ब्रिटिश काळात भारतीय कामगारांना मालकाकडून प्रत्येक आठवड्याला पगार देण्याची पद्धत होती. इंग्रजांच्या आठवड्याच्या पगार नियमानुसार एका वर्षात 52 आठवडे होत असे आणि त्याप्रमाणे कामगारांना पगार मिळत असे. इंग्रजांच्या पगार […]

ब्लॉग

22 प्रतिज्ञा हा कट्टरवाद, जातीयवादी लोकांच्या मानसिकतेपासून दिलेले “सरंक्षण कवच”

आप पक्षाचे मंत्री राजेंद्र गौतम यांना बावीस प्रतिज्ञा साठी आपला राजीनामा देण्यास त्यांच्याच पक्षाने भाग पाडले, संविधान, बाबासाहेब आंबेडकर व बाबासाहेबांच्या विधानाचे सोयीने दाखले देणाऱ्या अरविंद केजरीवाल यांचे खरे रूप आतातरी लोकांना कळायला हवे, संविधान आणि बाबासाहेब हे फक्त आपल्या सोयीनुसार “वापरण्या करता” उपयोगात आणले जातात, पण “स्वीकारण्या करता” जी विवेकबुद्धी लागते ती ह्यांच्या जवळ […]

जगभरातील बुद्ध धम्म

स्तूप आणि लेण्यांमधील श्रावणबाळ कथा; श्रावण बाळाची गोष्ट मूळ बौद्ध संस्कृतीची

इ. स.१ल्या शतकात आसपास बुद्ध तत्वज्ञानाचा प्रसार चीनमध्ये झाला तेंव्हा चीनमध्ये लढाया, बंडाळ्या माजल्या होत्या. एकमेकांप्रति समाज मनात प्रबळ प्रेम भावना नव्हती. वयोवृद्धांना सन्मानाने वागविले जात नव्हते. मात्र धम्मातील गंभीर तत्वज्ञान, मेत्त आणि करुणा भावनेने तेथील समाजास बुध्दांचे आकर्षण वाटू लागले. सर्वाप्रति आपुलकी निर्माण होऊ लागली. घरोघरी वयोवृद्ध माता-पिता, सगेसोयरे यांना मान सन्मान दिला जाऊ […]

इतिहास

१४ ऑक्टोबर १९५६ च्या धम्मदीक्षा सोहळ्याचे सहयोगी

१४ ऑक्टोबर १९५६ भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्धधम्माची दीक्षा घेतली तो मंगलदिन. भारतीय इतिहासात नवा अध्याय सुरू करणारा तो नेत्रदीपक सोहळा. या सोहळ्याचे सहयोगी होण्याचे भाग्य ज्यांना लाभले ते धन्य होत… विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अशोका विजयादशमीला अर्थात १४ ऑक्टोबर १९५६ रोजी ब्रह्मदेशाचे पूज्य महास्थवीर चंद्रमणी यांच्या हस्ते नागपूरला सकाळी ९.३० […]

इतिहास

आजपर्यंत न पाहिलेल्या सन्नतीच्या महास्तुपावरील सम्राट अशोकाची विविध प्रसंगातील शिल्पे

सम्राट अशोक यांनी कलिंग युद्धानंतर आयुष्यभर भगवान बुद्ध यांची शिकवणूक अनुसरली आणि बौद्ध तत्वज्ञानाचा नुसत्या भारतात नाही तर जगभर प्रसार केला. परंतू त्या सम्राट अशोक यांचे समाधीस्थळ किंवा स्तूप आजपर्यंत भारतात कुठेच आढळले नाही, हे एक मोठे आश्चर्य आहे. यामुळे सद्यस्थितीत सन्नाती येथे २४ एकर जागेत होत असलेले उत्खनन आणि तेथे सापडलेला क्षतीग्रस्त महास्तूप व […]

बातम्या

मध्यप्रदेशच्या मंत्री महोदया बौद्ध स्थळांच्या प्रचारासाठी परदेशात

थायलंडमध्ये २६ ऑगस्ट पासून “बुद्ध भूमी भारत – बौद्ध पदयात्रा” हे अभियान चालविण्यात आले. यामध्ये मध्यप्रदेशचे पर्यटन, सांस्कृतिक आणि धार्मिक विश्वस्त निधी यांचे मंत्री श्रीमती उषा ठाकूर यांनी भाग घेतला. मलेशिया आणि कंबोडिया मध्ये देखील भारतातील बौद्ध स्थळांबाबतचा पर्यटन रोड शो आयोजित करण्यात आला होता. यामध्ये देखील मंत्री महोदया यांनी भाग घेतला आणि मध्य प्रदेश […]