स्वतः कापड विणून, रंगरंगोटी करून एकाच दिवशी चीवर दान केले जाते त्याला बौद्ध धम्मात ‘कठीण चीवरदान’ म्हटले जाते. दोन वर्षाच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर बोधगयेत महाबोधी वृक्षाखाली आज ३१ ऑक्टोबरला कठीण चीवरदान आणि विश्वशांतीकरिता विशेष प्रार्थनासभेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. इमानि मयं भन्ते कठीण चिवरानी सह परिवारानि भिक्खु संघस्स ओनोझयाम साधुनो भन्ते भिक्खुसंघो इमानि कठीण चिवरानी […]
Author: धम्मचक्र टीम
प्राचीन जातक कथेतून दिसणारे बिझनेस मॅनेजमेंट
अडीच हजार वर्षापूर्वी बुद्धांच्या तत्त्वज्ञानाची ओळख जगाला झाली. या तत्वज्ञानामुळे अध्यात्मिक उन्नती मानवाने कशी करावी याची जाणीव झाली. तसेच नैतिकता आणि सदाचरण यांचा प्रभाव चांगल्या जीवनासाठी कसा आवश्यक आहे याचे मार्गदर्शन मानवजातीला जातक कथेतून झाले. तसेच त्यातून विकास साधून सर्व गोष्टींचे व्यवस्थापन कसे करावे याचे धडे मिळाले. व्यवस्थापन म्हणजे नियोजन, एकत्रीकरण, निरीक्षण, सर्व घटकांचे मार्गदर्शन […]
१२२ वर्षानंतर पिप्राहवा स्तुपातील बुद्धअस्थी श्रीलंकेतून परत भारतात आणले
पिप्राहवा हे गाव उत्तर प्रदेश मध्ये सिद्धार्थ नगर जिल्ह्यात आहे. लुंबिनी पासून हे ठिकाण बारा मैल अंतरावर आहे. या गावांमध्ये एक टेकडी होती. सन १८९८ मध्ये ब्रिटिश अभियंता विल्यम पेपे यांनी येथे उत्खनन केले. वरचा मातीचा ढिगारा काढल्यावर त्यांना तेथे पक्क्या विटांचे बांधकाम केलेला स्तुप आढळला. त्या स्तूपात काही मिळेल या अनुषंगाने त्यांनी तो खोदला […]
शूटिंगच्यावेळी मामुट्टीला बाबासाहेबांच्या वेशात पाहून लोकं चरणाला स्पर्श करून वंदन करायचे
दक्षिणेचा लोकप्रिय अभिनेता मामुट्टी यांनी २१ वर्षांपूर्वी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची सशक्तपणे भूमिका उभी केली होती. शूटिंगदरम्यान ते जेव्हा बाबासाहेबांसारखा पोशाख परिधान करायचे तेव्हा शेकडो लोक त्यांच्या चरणरजाला स्पर्श करून मनोभावे वंदन करायचे. पडद्यावर ज्ञानसूर्याचे मूर्तिमंत दर्शन घडवून त्यांनी व्यक्तिरेखेचे सोने केले. मामुट्टी वयाच्या ७३ व्या वर्षात पदार्पण केले आहेत त्यानिमित्ताने… सुपरस्टार दाक्षिणात्य अभिनेता मामुट्टी यांचा […]
भारतीय लेखकांची ‘ही’ तीन हिंदी पुस्तके इतिहासाचे सत्य स्वरूप आपल्यापुढे मांडतात
भारतीय इतिहासाचे प्रामाणिकपणे आणि डोळसपणे अवलोकन केल्यास एका ठराविक संस्कृतीचा उदोउदो केल्याचे दिसून येते. काही लोकांनी स्वतःचे वर्चस्व अबाधित राहण्यासाठी इथल्या श्रमण संस्कृतीला नष्ट करण्याचा प्रयत्न केला. प्राचीन साहित्यात, महाकाव्यात आणि इतिहासात काल्पनिक गोष्टींचा अंतर्भाव केला. दैदिप्यमान असलेल्या भारतीय इतिहासाच्या पानात घुसखोरी करून खोटी प्रकरणे घुसडली. वर्षानुवर्षे ती वाचून भारतीय जनमनावर त्याचेच संस्कार झाले. त्यातील […]
श्रीलंकेतून बुद्धअस्थीचे भारतात आगमन; पण हा अस्थिकलश श्रीलंकेत कसा पोहचला?
श्रीलंकेहून तथागतांच्या अस्थीकलशाचे नुकतेच भारतात आगमन झाले. पवित्र बौद्धस्थळांवर जनतेच्या दर्शनार्थ ठेवण्यात आला. यावेळी लाखो लोकांनी त्याचे दर्शन घेत भावपूर्ण सुमनांजली वाहिली. बुद्धांच्या पवित्र अस्थिकलशाने भारताची भूमी कृतार्थ झाली, धन्य झाली. अभिमानाची गोष्ट म्हणजे बुद्धाचा अस्थिकलश भारतातूनच श्रीलंकेला गेला होता… महाकारुणिक बुद्धांच्या पवित्र अस्थींचे भारतात श्रीलंका एअरलाइन्सच्या खास विमानाने 20 ऑक्टोबरला आगमन झाले. लखनऊ विमानतळावर […]
युरोपातील ‘या’ देशात डॉ.आंबेडकरांच्या नावाने ३ शाळा; लाखो लोक बौद्ध धम्माच्या मार्गावर…
युरोपमधील हंगेरीतील जिप्सी समूहाय हा दलितांप्रमाणे कनिष्ठ मानला गेलेला असून त्यांना शिक्षणापासून व इतर सुविधांपासून वंचित ठेवण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या दलित-अस्पृश्य समूदायाच्या उत्थानासाठी केलेला संघर्ष हा जिप्सी लोकांना प्रेरक ठरला व त्यांनी जिप्सी लोकांत बाबासाहेबांचे संघर्ष सांगण्याचे व विचार रूजविण्याचे काम केले तसेच बाबासाहेबांचा नवयान बौद्ध धम्माचाही स्वीकार केला. बाबासाहेबांसारखेच जिप्सी लोकांना […]
युआंग श्वांगची जगप्रसिद्ध स्मारके; बौद्ध संस्कृती आणि भारत-चीनच्या मैत्रीचे प्रतीक
बुद्ध तत्त्वज्ञानाने प्रभावित झालेल्या युआंग श्वांग भिक्खूने बुद्धाच्या जगभर जीवनप्रवासाचा मागोवा घेत ‘भारत यात्रा’ या अनमोल ग्रंथाची रचना केली अन् बुद्धाच्या पवित्र पावन स्थळांची सखोल संस्मरणीय माहिती बुद्धधर्मीयांसाठी संकलित केली. त्याची स्मारके नुसती पर्यटन स्थळे नसून भारत-चीन यांच्या प्रगाढ मैत्रीचे प्रतीक आहेत. भारतीय बौद्ध संस्कृती आणि सभ्यतेचा जणू तो आरसा आहे. तांग वंशाच्या उदयासोबतच चीनी […]
…म्हणून बाबासाहेबांनी निजामाच्या प्रलोभनांना नकार देत इस्लामचा मार्ग नाकारला
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १३ ऑक्टोबर १९३५ रोजी नाशिकजवळील येवला येथे धर्मातराची घोषणा केली. त्या वेळेस आपण कोणत्या धर्माचा स्वीकार करणार हे त्यांनी घोषित केले नव्हते. ३० व ३१ मे १९३६ रोजी मुंबई इलाखा महार परिषद मुंबई येथे घेण्यात आली. या परिषदेत धर्मातराच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. धर्मांतराच्या या घोषणेनंतर ख्रिश्चन, मुस्लिम, शिख, जैन, बौद्ध, यहूदी […]
संसद भवनाच्या आवारात उभारलेल्या डॉ.बाबासाहेबांच्या पुतळ्याचा इतिहास
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा नवी दिल्लीच्या संसद भवन परिसरात इ.स. १९६७ मध्ये उभारलेला पंचधातूचा पुतळा आहे. बी.व्ही. वाघ यांनी हा पुतळा बनवलेला असून आंबेडकरी समाजाने लोकवर्गणीतून हा पुतळा उभारला. आंबेडकरांचे हे स्मारकशिल्प चौथऱ्याशिवाय एकूण १२.५ फूट उंचीचे आहे. बाबासाहेबांच्या पुतळ्याची रचना हा पुतळा पायथ्यापासून/चौथऱ्यापासून एकूण १२.५ फूट उंचीचा असून त्यात आंबेडकरांचा उजवा पाय तितक्याच उंचीच्या […]