आंबेडकर Live

औरंगाबाद व मराठवाड्याचा विकास व्हावा म्हणून बाबासाहेबांनी ‘या’ योजना आखलेल्या होत्या

औरंगाबाद ही आंबेडकरी चळवळीची कर्मभूमी. शहराला बाबासाहेबांचा पदस्पर्श झाला आहे. महामानवाचा सहवास लाभलेला एक मोठा वर्ग आजही शहरात आहे. औरंगाबादबद्दल बाबासाहेबांना आकर्षण वाटत असे, विशेष म्हणजे बाबासाहेबांना त्याकाळी औरंगाबाद व मराठवाड्याचा विकास व्हावा म्हणून त्यांनी बऱ्याच योजना आखलेल्या होत्या. त्यासाठी ते प्रयत्नशीलही होते. या योजना वाचून तुम्हालाही बाबासाहेबांची दूरदृष्टीचा प्रत्यय आल्याशिवाय राहणार नाही

सायन्स कॉलेजजवळील वराळे यांनी घेतलेल्या प्लॉटवर बंगला बांधण्याची बाबासाहेब व माईसाहेब यांची कल्पना होती. उर्वरित आयुष्य औरंगाबादलाच व्यतीत करण्याची त्यांची मनिषा होती. आपल्या बंगल्याजवळच अनाथ आश्रम उघडण्याचा बाबासाहेबांचा विचार होता. अनाथांची सेवा करण्यात त्यांना आगळाच आनंद मिळत असे. ते नेहमी म्हणत, अनाथ, गरीब, निराधार कुमारी मातांनी टाकलेले मुले आश्रमात ठेवून त्यांची देखभाल करण्याची माझी तीव्र मनिषा आहे.

औरंगाबाद व मराठवाड्याच्या विकास योजना

मराठवाडा विभाग अत्यंत मागासलेला असल्याने त्यातील अस्पृश्यांचे हाल विचारायला नको, आणि त्या भागाचा विकास झाला तरच अस्पृश्यांचाही विकास होईल्, अशी बाबासाहेबांची धारणा होती. त्यादृष्टीने मराठवाड्याचा विकास व्हावा म्हणून त्यांनी बऱ्याच योजना आखलेल्या होत्या. त्यासाठी ते प्रयत्नशीलही होते.

मराठवाड्यातही स्वतंत्र विद्यापीठ असावे, औरंगाबाद- पुणे रहदारीने जोडण्यासाठी कायगाव टोके येथे गोदावरी नदीवर पुल बांधावा, व्यापारवृध्दी व प्रवासासाठी मनमाड-औरंगाबाद ही रेल्वे लाईन ब्रॉड गेज करावी. औरंगाबादला विमानतळ करावा, मुंबईला जाण्यासाठी मनमाड-नाशिक असा लांब वळसा घालण्यापेक्षा संगरनेरमार्गे जवळचा रस्ता (Short Cut Road) करण्यात यावा, औरंगाबाद शहराचे पुष्पनगर असे नामकरण करण्यात यावे, तसेच देशातील मजुरांच्या सहभागाने सहकारी कापड गिरणी काढावी.

औरंगाबाद नभोवाणी केन्द्र सुरु करण्यात यावे, अशा एक ना अनेक योजना त्यांच्या मनात होत्या. या सर्व योजनाचे महत्त्व आज सरकारला तसेच जनतेलाही पटलेले दिसते. यावरुन बाबासाहेबांची दूरदृष्टी दिसून येते. यापैकी बऱ्याच योजना मूर्त स्वरुपात आलेल्या आहेत. पण काही योजनांचे महत्त्व पटूनही अजून प्रत्यक्षात आलेल्या नाहीत. यासर्व विवेचनावरुन बाबासाहेबांची दूरदृष्टीचा प्रत्यय आल्याशिवाय राहणार नाही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *