बुद्ध तत्वज्ञान

आपल्या विरोधकाप्रती सुध्दा मैत्रीभाव बाळगा – भगवान बुद्ध

बुध्दाच्या सामाजिक तत्वज्ञानात मैत्री या संकल्पनेला मोठेच महत्व आहे. मानवी समाजात जीवंतपणा व संवेदनशीलता येण्यासाठी समस्त समाजाचे महत्तम कल्याण होण्यासाठी, व्यक्तीव्यक्तीमध्ये मैत्रीभाव नसेल तर समाजात कृत्रिमता येते. यांत्रिकपणा येतो. समाज आहे तिथे मैत्री आवश्यक आहे. सारा समाज परस्पर मैत्रीने बांधला गेला पाहिजे. मैत्रीभाव असेल तरच आपण परस्परांच्या सुख-दुख:त समरस होऊ शकु.

परस्पररांप्रती मैत्रीभाव, स्नेहभाव असणे अगत्याचे आहे. राग व्देष, मत्सर, घृणा वैर, वैमनस्य या सर्व मनोविकारावर मैत्री हे मोठेच गुणकारी औषध होय. दयायुक्त प्रेम, म्हणजे मैत्री होय. मैत्री म्हणजे समस्त प्राणीमात्राप्रती स्नेहभाव, दयाभाव, असणे होय, सर्वाप्रती स्नेहभाव , मैत्रीभाव माणसाला शुध्द बनवतो. मनातील विकृती घालवतो. मानसिकदृष्ट्या बलशाली बनवतो. वैयालाही जिंकण्याची शक्ती मैत्रीत असते. मैत्री के वळ मणुष्यप्राण्यासाठीच असणे पुरेशे नाही तर सर्वच सजीव प्राणीमात्रांप्रती मैत्रीभाव आवश्यक आहे. मैत्रीभावाने चित्त स्थिर व अविचल राहते. मैत्री ही करूणेच्या पुढची पायरी होय.

आपल्या विरोधकाप्रती सुध्दा मैत्रीभाव बाळगला पाहिजे, असे बुध्द सांगतात. मनाच्या संतुलनासाठी, शुध्दमनासाठी निरोगी, विकाररहित मनासाठी इतरांप्रती मैत्रीभाव ठेवणे व तो जोपासणे, वृध्दिंगत करणे आवश्यक आहे. जिथे मैत्रीभावाचा अभाव आहे तिथे क्रोध, आसक्ती, लोभ, व्देष, घृणा, तिरस्कार, जन्मास येतात.

मैत्रिभाव नसल्यामुळेच आपण तुझे माझे करत असतो. माझे व परके असा भेद करत असतो. मैत्रीभावामुळे माणुस समतेत राहातो. माझे व परकै असा भेद करत नसतो. इतरांप्रती शुभ चिंतीतो. सर्वांचेच मंगल व्हावे, अशी कामना करतो. यालाच खरा मैत्रीभाव म्हणतात.

समाजात शोषन थांबवायचे असेल तर परस्परांप्रती मैत्रीभाव वृध्दिगंत केला पाहिजे. समाजातून क्रोध, वैमनस्य, घृणा घालवायची तर मैत्रीभावना वाढीस लावली पाहीजे, अर्थात यासाठी सर्वांप्रती समताभाव विकसित करायला हवा. आसक्ती नष्ट केल्याशिवाय मैत्रीभावना वाढणार नाही. आज सर्वत्र असूया, कटूता, स्वार्थ, अशांती, वैर, वैमनस्य सतत वाढते आहे. याला उपाय फक्त मैत्रीभाव हाच आहे.

मानवी समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी, मैत्रीभाव अत्यंत आवश्यक आहे. मैत्रीभावनेतून सेवाभाव विकसित होतो, मैत्रीभाव नसेल तर दु:खितांप्रती असहाय लोकांप्रती मनात प्रेम, दया व करूणा जागृत होणार नाही.

2 Replies to “आपल्या विरोधकाप्रती सुध्दा मैत्रीभाव बाळगा – भगवान बुद्ध

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *