जुन्नर ही सातवाहनांची पहिली राजधानी. सातवाहन वंशामध्ये होऊन गेलेल्या तीस राजांनी इ.स. पूर्व २०० ते इ.स. २६० असे एकूण ४६० वर्षे महाराष्ट्रावर राज्य केले. साडेचार शतकांहूनही अधिक काळ महाराष्ट्र व आंध्र प्रदेशावर राज्य करणारा सातवाहन राज्यवंश हा एकमेव राज्यवंश होता.
मौर्यांचा प्रांतपाल असलेल्या सिमुक सातवाहनाने सम्राट अशोकाच्या मृत्यूनंतर आपले स्वतंत्र राज्य महारठ्ठ देशावर स्थापन केले आणि नैसर्गिक सुरक्षेचे कवच लाभलेले जीर्णनगर म्हणजेच आताचे जुन्नर हे आपले राजधानीचे नगर केले. सिमुक सातवाहनानंतर जवळ जवळ अडीचशे वर्षे सुमारे १७ सातवाहन राजांची राजधानी ही जुन्नरच होती. तर प्रतिष्ठान, म्हणजेच आजचे पैठण येथे केवळ तीनच सातवाहन राजांनी इ.स. १३८ ते इ.स. १६९ या ३१ वर्षांच्या काळात राज्य केले.
कलिंगचा महामेघवाहन वंशीय राजा खारवेल याने सातवाहन सम्राट पुळुमावी दुसरा यांच्यावर आक्रमण केल्यामुळे पैठण हे असुरक्षित वाटल्याने विजय सातकर्णी याने पैठणहून आपली राजधानी विजयापुरी म्हणजेच आताचे आंध्रप्रदेशाचे राजधानी असलेले विजयवाडा या ठिकाणी स्थलांतरीत केली. या ठिकाणी सातवाहन वंशातील दहा राजांनी राज्य केले.जुन्नर हे अडीच शतकांहूनही अधिक प्रदीर्घ काळ सातवाहनांची राजधानी असल्यामुळे, व सातवाहन सम्राट हे बौद्धधर्मीय असल्यामुळेच त्यांनी जुन्नर परीसरात सुमारे चारशेहूनही अधिक लेण्यांची निर्मिती केली. तर आंध्रप्रदेशातील अमरावती येथे महास्तूपाची निर्मिती केली.

भारतातील एकूण दीड हजार लेण्यांपैकी महाराष्ट्रात तब्बल १२०० पेक्षा अधिक लेणी आहेत. तर या बाराशे लेण्यांपैकी चारशेहूनही अधिक लेणी एकट्या जुन्नर परीसरात असून, आजही या चारशे लेण्यांपैकी जवळ जवळ दिडशेहूनही अधिक लेणी या योग्य संशोधकाच्या प्रतिक्षेत आहेत.
लेखक -अशोक नगरे
मोडी लिपी तज्ज्ञ, धम्मलिपी ब्राह्मी, बौद्ध लेणी, बौद्ध शिल्पकला – चित्रकला, बौद्ध स्थापत्य, बौद्ध पुरातत्व व बौद्ध इतिहास अभ्यासक,
पारनेर, अहमदनगर.
new worthwhile information. king Simuk’s original name may have been Shrimukh, Jirnanagar may hv long history.
Yes
साहेब लोकांमधील अज्ञान दूर करण्यासाठी आपल्याला खूप प्रयत्न करावे लागणार आहेत.
लेण्याचे संशोधन करून जागतिक पर्यटन म्हणुन घोषित करण्यात यावे