आंध्रप्रदेश मध्ये १८८४ साली ब्रिटिश सर्वेअर रॉबर्ट ब्रूस फुट याने कुर्नूल जिल्ह्यामध्ये बेलम गावाजवळ डोंगराळ प्रदेशात एक गुहा शोधली. ही गुहा जवळ जवळ ३२२९ मीटर लांब आहे. त्यानंतर शंभर वर्षे या गुहेकडे कोणी लक्ष दिले नाही. मात्र १९८२ ते १९८४ मध्ये जर्मनी वरून गुहांचा शास्त्रीय अभ्यास करणाऱ्या ( Speleologist ) टीमने या गुहेचे संपुर्ण सर्वेक्षण केले. तेव्हा येथे साडे चार हजार वर्षापूर्वीचे काही अवशेष सापडले. तसेच येथे बौद्ध भिक्खू दीड-दोन हजार वर्षांपूर्वी वास्तव्यास होते याचा पुरावा मिळाला. तेथील उत्खननात सापडलेल्या अस्थी अनंतपुर येथील संग्रहालयात ठेवल्या आहेत.
हे पण वाचा : आंध्रप्रदेशात इसवी सन पूर्व पहिल्या शतकातील बौद्ध लेणी सापडली
या गुहेचे महत्त्व लक्षात घेऊन आंध्रप्रदेश सरकारने साडेसात कोटी सौंदर्यीकरण करण्याच्या कामासाठी दिले. त्या निधीतून गुहेत पूल, पायऱ्या, उपहारगृह, प्रकाशदिवे व गुहेबाहेर स्वच्छतागृह उभारण्यात आले. त्यानंतर आंध्रप्रदेश पर्यटन विभागाने ( APTDC) भारत खंडातील ही सर्वात मोठी दोन नंबरची गुहा सन २००२ मध्ये पर्यटकांना खुली केली. येथे प्रवेश फी रु.६५/- घेण्यात येते व परदेशी पर्यटकांकडून रू. ३००/- घेण्यात येतात. या गुहेजवळ मोठे विहार असून ते बौद्ध भिक्खूंचे ध्यानकक्ष म्हणून ओळखले जाते. या गुहेच्या पर्वतराजित APTDC ने ४० फूट उंचीची बुद्धमूर्ती उभारली असून त्या परिसरास मूर्तीमुळे एक वेगळीच विलोभनीय शोभा आली आहे.

आपला महाराष्ट्राचा पर्यटन विभाग यापासून काही बोध घेणार आहे का ? श्रीलंकेत प्रवास करताना अनेक ठिकाणी डोंगरातील हिरव्यागार झाडीत धीरगंभीर मुद्रेच्या पांढऱ्याशुभ्र बुद्धमूर्ती उठून दिसतात. ते पाहून नकळतपणे हात जोडले जातात. महाराष्ट्रात लेण्यांच्या डोंगरात हे चित्र केंव्हा दिसेल ? विशेष करून मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवरून पुण्यास जाताना लोणावळ्याच्यापुढे कामशेतचा मोठा बोगदा पार केल्यावर लागून जो डोंगर आहे तेथे बेडसा लेणी आहेत.(येथे जाण्यास रस्ता कामशेत फाटा येथून आहे) व उत्तरेस डोंगरापालिकडे भाजे लेणी आहेत. तरी अशा लेण्यांच्या ठिकाणी बुद्धमूर्ती उभारल्यास महामार्गावरून प्रवास करताना तिचे नयनरम्य दर्शन होऊ शकेल.
– संजय सावंत
Namo buddhay
तुम्ही चांगली माहिती दिल्याबद्दल तुमच्या शतशः आभारी आहे
शहीद भाई संगारे स्मृति प्रतिष्ठान मुंबई
Namo buddhay
Very nice
Namo Buddhay
महाराष्ट्रामध्ये अजून खूप साऱ्या लेण्या आहेत आणि त्या सर्व नाशिक जिल्ह्यात आहेत असे मला वाटते जर आपण मला संपर्क साधला तर मी आपणांस काही गोष्टी सांगू शकतो