जगभरातील बुद्ध धम्म

मी जन्माने कॅथॉलिक असूनही आज बुद्धाने दाखविलेल्या मार्गावरून चाललो -भन्ते बुद्धरक्षिता

‘जमैका’ हे एक कॅरिबियन समुद्रातील मोठे बेट असून तो एक स्वतंत्र देश आहे. लोकसंख्या २.९० मिलियन असून स्पॅनिश आणि ब्रिटिश राजवटी येथे नांदल्या आहेत. आफ्रिकन, चायनीज, भारतीय वंशाची येथे सरमिसळ आहे. येथे गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड असून सन २०१७ मध्ये येथे १६००हुन अधिक खून झाल्याची नोंद आहे.

यास्तव जमैका बर्मिज कम्युनिटीने युगांडा देशातील बुद्धिस्ट सेंटरचे भन्ते बुद्धरक्षिता यांना ‘ध्यानसाधनेत एकाग्रतेचेे महत्त्व’ या विषयाच्या प्रवचनासाठी आमंत्रित केले. आश्चर्य म्हणजे भन्ते बुद्धरक्षिता हे जन्माने आफ्रिकन आणि यांचे आईवडील रोमन कॅथॉलिक आहेत. तरीही ध्यानसाधनेची आवड असल्याने ते विपश्यना शिकले. १९९३ पासून त्यांनी साधनेचा सखोल अभ्यास चालू ठेवला आणि त्यानंतर सॅनजोस, कॅलिफोर्निया येथे त्यांनी थेरवादी भिक्खू म्हणून उपसंपदा घेतली. ‘Planting Dhamma Seed: The emergence of Buddhism in Africa’ हे त्यांचे पुस्तक नुकतेच प्रसिद्ध झाले आहे.

‘जमैका ऑब्झरवर’ या वृत्तपत्रात, रेडिओवर आणि टीव्हीवर त्यांची मुलाखत माहे डिसेंबर २०१८ मध्ये प्रसिद्ध झाली आहे. त्यांनी सांगितले की ” मी जन्माने कॅथॉलिक असूनही आज बुद्धाने दाखविलेल्या मार्गावरून चाललो आहे. तोच एक सत्यमार्ग या जगात आहे. ध्यानसाधनेचा सातत्याने अभ्यास केल्यास मन शुद्ध आणि शांत होत जाते. स्वतःबरोबर आजूबाजूचे वातावरण ही शुद्ध आणि निर्मळ होते. त्यामुळे विकार कमी होऊन गुन्हेगारी प्रवृत्ती नष्ट होते. तसेच शारीरिक व्याधी आणि अनामिक भीती नष्ट होते.तरी बुद्धाने दाखविलेल्या अष्टांगिक मार्गावरून मनुष्याने चालावे. यातच त्याचे हित आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *