जगभरातील बुद्ध धम्म

दक्षिण कोरियातील या बौद्ध विहाराची संकल्पना भारतातील तर पाकिस्तानाच्या विटांनी केले बांधकाम

दक्षिण कोरियामध्ये एक नवीन मॉनेस्ट्री उदयाला आली आहे. त्याचे नाव ‘जेतवन सेऊन सेंटर’ असे असून ते गॅंगवोन प्रांतातील गॅंगचोन शहराजवळील पर्वतराजीत आहे. ‘गाव’ नावाच्या बांधकाम कंपनीने हे विहार बांधले असून एकूण ३ लाख विटा बांधकामासाठी वापरल्या आहेत.

येथे ध्यानधारणा करण्यासाठी, विश्रांतीसाठी, कार्यालयासाठी व भोजनासाठी वेगवेगळे कक्ष आहेत. पुरातन काळातील स्तुप,विहार यांचे बांधकाम जसे विटांचे आहे त्याच प्रमाणे प्रस्तुत विहाराचे बांधकाम पाकिस्तानात तयार केलेल्या विटांनी केलेले आहे. या विहाराची संकल्पना भारतातील कुटी ( झोपडे )वरून उचलली असून उत्तरप्रदेशातील पुरातन बौद्ध विहाराप्रमाणे बांधकाम करण्यात आले आहे.

यामुळे मॉनेस्ट्रीचे बांधकाम व त्याचा आराखडा अतिशय सुंदर झाला असून तेथील निसर्गरम्य वातावरणात तो खुलून दिसतो.दक्षिण कोरियात ५६ % लोकांना धर्मच नाही. २९ टक्के लोक ख्रिश्चन आहेत. आणि १५ टक्के बौद्ध आहेत. तरीही या बौद्ध मॉनेस्ट्रीचे सगळीकडे स्वागत करण्यात येत आहे.

संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – बौद्ध इतिहास अभ्यासक)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *