कोणालाही क्लेश देऊ नका. कोणाचाही द्वेष करू नका. हाच बौद्ध जीवनमार्ग आहे. ज्याप्रमाने उत्तम जातीचा अश्व चाबकाच्या फटकाऱ्याला संधी देत नाही. त्याचप्रमाणे लोकांना आपली नींदा करण्याची संधी देत नाही, असा दोषरहित माणूस या इहलोकी कोणी आहे काय?
श्रध्दा, शील, विर्य, समाधी , सत्याचा शोध, विद्या आणि आचरणाची श्रेष्ठता आञि स्मृती यांच्या योगाने या महान दुःखाचा अंत करा. क्षमा परम तपश्चर्या आहे. निर्वाण परमसुख आहे. असे बुद्ध मानतो. दुसर्याला आहत करणारा प्रवृजित नाही. दुसर्याला पीडा देणारा श्रमण नाही.
मिथ्यावचन न बोलणे, कोणालाही आहत न करणे, कोणालाही कष्ट न देते , विनयपूर्वक संयत जीवन जगणे हीच बुद्धाची देशना आहे. जीव हिंसा करू नका. जीव हिंसेचे निमित्त होऊ नका. आपल्यासाठी सुखाची कामना करणारा, सुखाची कामना करणाऱ्या मनुष्यमात्रांना कष्ट देत नाही त्यांचा वध करत नाही. तोच सुख प्राप्त करतो.
जो निष्पाप, निर्दोष, निरोपद्रवी माणसांना क्लेश देतो, कष्ट देतो त्याच्या वाट्यालाही क्लेश भोगण्याची, कष्ट भोगण्याची पाळी येते. क्षमारूपी वस्त्र परिधान केल्याने तो शांत आहे, दान्त आहे. स्थिरचित्त आहे. ब्रह्मचारी आहे. संयत सदाचरणी आहे जो छिद्रान्वेषी नाही तोच खरा श्रमण तोच खरा भिक्खू होय.
श्रेष्ठ जातीचा अश्व चाबकाचा फटकारा लागू नये याची दक्षता घेतो. याचे काय करणार याचप्रमाणे त्याला कोणताही दोष लागू नये म्हणून लोक लाजेस्तव संपूर्ण संयत आचरण करणारा कोणी आहे काय?
जर कोणी निरूपद्रवी, शुद्धाचरणी, निष्पाप माणसाला क्लेश देत असेल, कष्ट देत असेल, तर अशा माणसावर दुःख ओढवतेच. ज्याप्रमाणे वाऱ्यावर धूळ फेकणार्यांच्या अंगावरच ती धूळ येऊन पडते त्याप्रमाणे या माणसाच्या वाट्याला दुःख येतात.
Wow nice information.like it
Very nice initiative
i like it 👏👏👏