तथागत बुद्ध व आनंद एका जंगलातून चालले होते. ग्रीष्म ॠतु होता. झाडांच्या पानांनी जमीन गच्च भरली होती. पानझडी होती. आनंद म्हणाला, ‘तथागत तुम्ही जे जे जाणता ते सर्व काही आम्हांस सांगितले आहे ना? संपूर्ण उपदेश, संपूर्ण धम्म आम्हास सांगितला आहे ना? काही राखून तर ठेवले नाही ना?
बुद्धांनी मुठभर पाचोळा हातात घेतला व म्हणाले, ‘आनंद, तुम्हांला मी इतकेच सांगितले आहे, जितकी माझ्या हातात सुकी पाने आहेत. जितकी पाने जमिनीवर पडलेली आहेत, तेवढे मी तुम्हांला अद्याप सांगितले नाही. जेवढे तुम्ही समजू शकाल, तेवढच मी तुम्हाला सांगितले आहे. जसजशी तुमची ग्रहण शक्ती, धारण शक्ती वाढेल तस तसे मी सांगत जाईल.’
‘दान हे सुपात्री असावे, कुपात्री असू नये.’
Ok
Mast questions aahe aani mast uatar aahe