बुद्ध तत्वज्ञान

देवाचे अस्तित्वच पूर्णता अमान्य करणारा बौध्द धम्म हा एकमेव धम्म

जगात सर्वात जास्त विवादास्पद संकल्पना जर कोणती असेल तर देवाची संकल्पना होय. बौध्द धम्म सोडल्यास सर्वच धर्मात देवाची संकल्पना या-ना त्या स्वरूपात अस्तित्वात आहे.

बुध्द धम्मात देव नावाची प्रचलीत संकल्पनाच अस्तिवात नाही. हा इतर धर्मात व बौध्द धर्मात महत्वाचा फरक होय, देव ही संकल्पना जीवनाच्या नेमक्या कोणत्या अवस्थेत विकसित झाली हे सांगणे कठ तरी, निसर्गाविस्थेत असलेल्या मानवाला पृथ्वीवरील निसर्गाचे स्वरूप, घटना व . देव ही संकल्पना मानवी सत झाली हे सांगणे कठीण असले.

पृथ्वीवरील निसर्गाचे स्वरूप , घटना व त्याचे प्रचंड बरे वाईट परिणाम याला घाबरून जीवनाच्या भितीनेच देव, पूजा, अर्चा बळी देणे, शांती आदी प्रकार अस्तित्वात आले व मानवी विकासाबरोबरच त्या संकल्पनाचे स्वरूप बदलत गेले. पण देब या कल्पनेने मानवी मनात भितीपोटी घर केले. आपल्यापेक्षा कुणीतरी श्रेष्ठ आहे . तोच या पृथ्वीचा गाडा चालवत असला पाहिजे हा विचार रूढ होऊ लागला व त्याच शक्तीला लोकांनी देव नावाची सज्ञा दिली, व यातुनच देव ही संकल्पना पुढे आली.

परंतु बौध्द धम्म हा एकमेव धम्म आहे ज्याने देवाचे अस्तित्वच पूर्णता अमान्य केले आहे. बुद्धाला प्राप्त झालेल्या ज्ञानातून प्रज्ञेतून बुद्धाने समस्त परिस्थितीचे सखोल दर्शन केले, अनुभवले. त्याच आधारावर, दिव्य ज्ञानाच्या कसोटीवर बुध्दाने देव ही कल्पना तपासून पाहिली, त्यात देव नावाची कोणतीच वस्तू प्राणी जगात अस्तित्वात नाही हे सत्य बुद्धाला कळले.

देव ही संकल्पना पुर्णता मनुष्यकल्पित कल्पना आहे. देव ही मनुष्याने मितापाटी निर्माण केलेली संज्ञा आहे हे बुद्धाला कळले. या विश्वाचा निर्माता कोणीच नाही हे सत्य बुद्धाने प्रतिपादिले. म्हणूनच बुद्धाला नास्तिक मानले जाऊ लागले असावे. बुद्धाने देव या ऐवजी मानवी नितिमत्ता की संकल्पना मांडली. इतर धर्मात इश्वर या संकल्पनेला जे स्थान आहे तेच स्थान, महत्व बौद्ध धम्मात नितिमत्तेला आहे.

बुध्द नितिमत्तेला जीवनात सर्वाधिक महत्वाचे मानतात. मानवी दुःखाला नष्ट करायचे तर केवळ मानसाने नैतिक बनले पाहिजे. आपले दुःख हेच अनैतिकतेतून जन्मास येतात. त्या दुःखाला देव किंवा दैवत दूर करू शकत नाही. दुःखाची उपजच मुळात मानवी स्वभावामुळे झाली आहे. मानवी मनाच्या विकृत अवस्थेमुळे दुःख निर्माण होते. त्यामुळे ही दुःखे दूर करण्याचे काम मन निर्मळ करून करायचे आहे. दुसरा देव-दैवत ही मानवी दुःखे तिळमात्रही दूर करू शकत नाही, यावर बुध्दाचा ठाम विश्वास होता.

सर्वच दु:खाची कारणं मानवी मनात आहेत. मनाच्या जडणघडणीत आहेत. म्हणून मुक्ती हवी तर आपल्यालाच प्रयत्न करावे लागती. आपल्यालाच आपले मन शुध्द निर्मळ ठेऊन दुःख मुक्त व्हावे लागेल . दु:ख मुक्त होण्याचा प्रयास आपण स्वत:च करायचा आहे. आपले दुःख दुसरा कोणीही दूर करू शकत नाही. कारण आपल्या मनावर इतरांचे काही एक नियंत्रण असू शकत नाही. म्हणूनच दुःख निवारण हे आपल्याच हाती आहे व ते शक्य आहे, असे बुध्द सांगतो.

10 Replies to “देवाचे अस्तित्वच पूर्णता अमान्य करणारा बौध्द धम्म हा एकमेव धम्म

  1. बुद्ध धम्माच्या विचारातच जगाला तारन्याची शक्ति आहे पण बुद्धा च्या विचारला येथील मनुवादी व्यवस्तेने लोकांमधे रुजू दिले नाही.आणि आपण सुद्धा कमी पडलोय हे मान्य कराव लागेल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *