बुद्ध तत्वज्ञान

बुध्द धम्म हा याच जन्मात सुख देणारा धम्म!

बौध्द धम्मात व्यक्तीच्या पुनर्जन्माची कल्पना नसल्यामुळे आपला हा जन्म मागच्या जन्मातील कर्मानुसार झाला आहे हे म्हणणे पूर्णत: खरे नाही. रामा किंवा गोविंदा मेला की पुन्हा रामा किंवा गोविंदा जन्म घेत नाही. बौध्द तत्वज्ञानात हा फसवा कर्म सिध्दांत अस्तित्वात नाही. आपलाच पूनर्जन्म होतो हे म्हणणे पूर्णता चुकीचे आहे. हे साध्या भोळ्या अज्ञानी लोकांना फसवणारे तत्वज्ञान आहे. याला कुठलाच शास्त्रीय आधार नाही. कर्म या जन्मात करा व फळे मात्र पुढच्या जन्मी घ्या हे निव्वळ फसवे तंत्र आहे. बुध्दाच्या मते या जन्मातील कर्माची फळे याच जन्मात मिळतात. वाईट कर्माची फळे चांगली असू शकत नाहीत. ती वाईटच राहणार, चांगल्या कर्माची फळे ही कधीही चांगलीच राहणार.

बुध्दाच्या मते जे आहे ते याच जन्मात आहे. हाच जन्म सुधारायचा आहे. या जन्मात सुखी व्हायचे. दुःख मुक्त व्हायचे आहे. काही कृतींचे परिनाम नगन्य असतात ते जानवतही नाहीत. परंतू ज्याकृती, कारणं प्रभावी असतात त्याचे परिणाम होतातच, हिंसा, चोरी, मद्यपान, व्याभीचार, छळ, शोषण वा इतर प्रकारे इतरांच्या मनांना दु:खवणे याची फळे मिळतातच! देश, क्रोध, गर्व, आसक्ती, इर्षा याने प्रेरीत होऊन केलेली कामे वाईट फळेच देणार, अशुध्द मनाने केलेल्या कार्याची फळे कटूच असणार. शुध्द मनाने केलेल्या कार्याची फळे गोडच असणार, आपल्याला याच जन्माचा विचार करायचा आहे. या जन्मातील कर्माची फळे याच जन्मात मिळतात. फळ यायला काहिसा विलंब लागेल पण कारण आले की परिणाम सोबतच येणार ! कारण व परिणाम एकाच नाण्याच्या दोन बाजू होत. कारणापासून त्याचा परिणाम वेगळा करता येत नाही.

या जन्मात ज्या अवस्थेत जन्म झाला त्याच अवस्थेत समाधान माणून जगा जे मिळाले त्यात सुख माना, अधिक सुखाची आस धरु नका. त्यातच समाधानी रहा, हे ब्राहणी धर्माचे, लोकांना मूर्ख बनवणारे पडयंत्र आहे. बौध्दांनी यावर विश्वास ठेऊ नये, या म्हणण्याला कोणताच आधार नाही याउलट बुध्दाचा कर्म सिध्दांत (कर्म म्हणजे कृती) पूर्णतः वैज्ञानिक आहे तर्कसंगत आहे. या जन्मात चांगले कर्म करा. त्याची फळे या जन्मातच चांगली मिळतील. अंगुलीमाल खुनी दरोडेखोर होता. तो बुध्दाच्या संपर्कात आला आणि बौध्द भिक्खू झाला. दुःख मुक्त झाला. फळाची अपेक्षा न करता कर्म करत रहा हे ब्राम्हणी ढोंगी तत्वज्ञान आहे. बुध्दाच्या मते कर्म करतांना अधिक चांगल्या बाबीची अपेक्षा, उत्तम लाभाची अपेक्षा करणे यात वाईट असे काहीच नाही, गरिबीतून, विवंचनेतून वर येण्याची अपेक्षा माणसाने अवश्य केली पाहिजे.

प्रगतीची, विकासाची, उच्च ध्येयाची अपेक्षा केली पाहिजे. आपण ज्या स्थितीत आहोत त्यापेक्षा उत्तम स्थितीची अपेक्षा अवश्य केली पाहिजे. व त्यासाठी सम्यक प्रयत्न सुध्दा केले पाहिजे. जे आहे त्यातच समाधान मानणे व दर्जा उंचवण्याचे प्रयत्न न करणे म्हणजे मूर्खपणा होय. जैसे थे हा ढोंगी सिध्दांत बुध्द नाकारतात. या जन्मातील चुका याच जन्मात दुरुस्त करायच्या आहेत. या जन्माच्या ब-या वाईट कर्माची फळे याच जन्मात प्राप्त व्हायची आहेत. म्हणून याच जन्मात उत्तम कर्मे करा, वाईट कर्मे करु नका. हाच जन्म सुखी करायचा आहे. याच जन्मात दु:ख मुक्त व्हायचे आहे. हा भक्कम आशावाद बुध्दाने दिला आहे. म्हणूनच बुध्द धम्म हा याच जन्मात सुख देणारा धम्म आहे.

पुढच्या जन्माची संकल्पना बुध्द अमान्य करतात. आत्मा नावाची वस्तू नाही. त्यामुळे ती निरंतर असते, अमर असते हे ब्राम्हणी धर्माचे तत्वज्ञान बुध्दाला अमान्य आहे. आत्मा नाही. चित्त, मन हेच चेतना बनून अस्तित्वात असते. विशिष्ट चेतनेचाच उदय व्यय होत असतो. बुध्दाने आत्मा ही कल्पना नाकारली. बुध्दाच्या मते याच जन्मात दु:ख मुक्त होण्याचा प्रयत्न करा, सुखी व्हायचा प्रयत्न करा. हे करताना अर्थातच आसक्त बनू नका. सारेकाही मध्यम मार्गानुसारच झाले पाहिज एवढेच!

संदर्भ: बुद्धाचा दुःख मुक्तीचा मार्ग
प्रा.पी.आर.वेल्हे

3 Replies to “बुध्द धम्म हा याच जन्मात सुख देणारा धम्म!

  1. buddhachi ajun mahiti bhetel ka ani tyani chetna jagrut karun nyan kase milvle he hi janun ghaych ahe

  2. मला वैशाली , राजगीर and shravasthi ची पूर्ण माहिती हवी आहे

Comments are closed.