सन २००० मध्ये तामिळनाडूमध्ये थिरुवरुर जिल्ह्यात पुथूर गावापाशी तिरूनेलिक्कवल रेल्वे स्टेशन जवळ टाकीचे बांधकाम करण्यासाठी खोदकाम चालू होते. तेव्हा ही काळ्या पाषाणातील बुद्धमूर्ती सापडली. ही बातमी पुरातत्व विभागाचे बी.जांबूलिंगम यांना काही दिवसांनी कळली तेव्हा ते २५ कि. मी. सायकल चालवत त्या गावी पोहोचले.
तेव्हा गावकऱ्यांनी बुद्धमूर्तीची स्थापना तेथील एका झाडाखाली केल्याचे दिसले. मूर्तीच्या कपाळावर व छातीवर भस्माचे पट्टे ओढले होते. पण गावातील जाणकारांनी वैशाख पौर्णिमेला बुद्धमूर्तीची पूजा केली. मंद स्मित करणारी व ध्यानस्थ असलेली ही बुद्धमूर्ती खूपच सुंदर आहे.
बी. जांबूलिंगम यांना असेही समजले की कुण्या कुमारिकेने जर त्या मूर्तीची पूजा केली तर तिचा लवकर विवाह होतो अशी वदंता तेथे पसरली होती. थोडक्यात बुद्धमूर्तीची काळजी घेण्यात येत होती. सध्यस्थीतीत ११-१२ व्या चोला राजवटीतील ही मूर्ती थिरुवरूर येथील संग्रहालयात ठेवल्याचे समजते.
संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – बौद्ध इतिहास अभ्यासक)