बुद्ध तत्वज्ञान

बुद्धकथा : जे मनातून गरीब असतात तेच खरे गरीब

एका गरीब माणसानं बुद्धांना विचारलं की मी इतका गरीब का?
त्यावर बुद्ध म्हणाले तू गरीब आहेस कारण तुझ्यापाशी असलेलं तू जगाला काहीच देत नाहीस.
तो माणूस आश्चर्याने म्हणाला पण माझ्याकडे तर देण्यासारखं काहीच नाही..

बुद्धांनी मंदस्मित करून उत्तर दिलं…
काही देण्यासाठी तू श्रीमंतच असावा असं नाही.
गरीब असतानाही तू बरंच काही देऊ शकतोस..

पहिली गोष्ट तू जगाला देवू शकतोस ते म्हणजे स्मितहास्य.
ज्यांना ज्यांना भेटशील त्यांना प्रसन्न आणि मैत्रीपूर्ण हास्याने सामोरे जा..

दुसरी गोष्ट तुझी वाणी नेहमी सर्वांशी गोड बोल.
कुणालाही अपशब्द वापरू नकोस.

तिसरी गोष्ट म्हणजे दयाळू आणि सच्चे हृदय. प्रत्येकजण चांगला आहे असं मानून त्याच्यातल्या चांगुलपणाचा शोध घे..

चौथी गोष्ट जी तू देवू शकतोस ते म्हणजे तुझं शरीर.
ज्यांना मेहनत करणं शक्य नाही त्यांना तुझ्या बळाचा वापर करून मदत कर.

पाचवी गोष्ट तू सर्वांना देवू शकतोस तो म्हणजे आदर.
अगदी लहानापासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांशी आदराने वाग..

सहावी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जी जगाला दिली पाहिजे ते म्हणजे प्रेम.. गरीब असो वा श्रीमंत प्रेमाची गरज प्रत्येकालाच आहे.

बघितलंस. तू अजिबात गरीब नाहीस..
जे मनातून गरीब असतात तेच खरे गरीब..

गोष्ट छोटीशीच आहे.. पण खूप काही सांगून जाणारी. नकारात्मतेकडून सकारात्मतेकडे आपल्याकडे असलेल्या असामान्य अस्तित्वाची जाणिव करून देणारी.