बुद्ध तत्वज्ञान

अशांत आहात? सुखाचा मार्ग पाहिजे? तर बुद्धाचा हा संदेश वाचलाच पाहिजे!

अत्त दिप भव! हे वाक्य किती लहान आहे. पण जेवढे ते लहान आहे तेवढाच त्यातील अर्थ संदर्भ महान आहे. बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचे तो सार आहे. बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचा आधारभूत मुख्य विचार आहे. कारण सुख दुःख यश अपयशाचे मुळ मन आहे व ते चुकीच्या संस्कारामुळे, सवयीमुळे मलीन बनले आहे. ते मन प्रत्येकाचे त्याचे स्वतःचे आहे. त्या मनावर इतरांचे नियंत्रण नसते. यामुळे ते मन शुध्द करायचे व सुखी व्हायचे तर ज्याचे त्यालाच प्रयत्न करावे लागतील.

एकाचे मन दुसरा शुद्ध करू शकत नाही. प्रत्येकाने स्वतःच विपस्सनेद्वारा (समाधी) मन शुद्ध केले पाहीजे. स्वतःच सत्य जाणून अज्ञानाचा अंधकार दूर केला पाहीजे. स्वतःचा दिप होऊन जीवनाचा मार्ग प्रकाशित केला पाहीजे. या विधानाचे महत्त्व फार श्रेष्ठ आहे. हे विधानच बुद्ध धम्माला इतर सर्व धर्म, संप्रदायापासून वेगळे करते.

बहुतेक धर्म व्यक्तीला हे सांगतात की विश्वाचा निर्माता कुणीतरी देव आहे. देवाच्या पुजारींना दलाली द्यावी (दक्षिणा) म्हणजेच देव पावतो व तुम्हाला सुखी करतो.

याउलट बुद्ध म्हणतात “अत्त दिप भव” स्वतःच स्वतःचा दिप हो! स्वतःच स्वतःचा प्रकाश हो! जीवनात सुख शांती, समाधान यश प्रतिष्ठा, मान, सन्मान, धन संप्पत्ती, आरोग्य जे काही हवे आहे. ते स्वतःच तुम्हाला स्वकष्टाने, स्वप्रयत्नाने मिळवायचे आहे.

दुःखी आहेस, संकटात आहेस, अपयशाने खचला आहेस, चिंताग्रस्त आहेस, भयभीत आहेस, व्यथित आहेस, विवंचनेत आहेस, संभ्रमात आहेस, व्याकूळ आहेस, तर तुला दुसरे बाहेर काढतील व सुखी करतील हे शक्य नाही. जे काही करायचे आहे ते तुला स्वतःलाच करायचे आहे. ज्याचे दुःख त्यालाच दूर करायचे आहे. ज्याचे अपयश त्यालाच यशात रूपांतरित करायचे आहे. जो अशांत आहे. त्यालाच स्वतः प्रयत्न करून शांती मिळवायची आहे. जो निर्धन आहे. त्यालाच योग्य प्रामाणिक प्रयत्न करून सधन व्हायचे आहे.

यावरून आपला उद्धार आपल्यालाच केला पाहीजे. आपल्या जीवनात असलेल्या अज्ञानाचा अंधार आपणच दूर सारला पाहीजे. ते देव- दैवत येऊन दूर करू शकणार नाहीत. आपल्याला विशिष्ट ठिकाणी जायचे आहे, तर चालावे तुम्हालाच लागणार.

बुद्धाला बुद्धत्व प्राप्त झाले. सुखाचा मार्ग कळला. तो त्या महाकारूणिकाने जगाला सांगितला, वाट दाखवली. वाट चालायचे हे आपले काम आहे. दुःख मुक्तीसाठी प्रयत्न करायचे ते आपल्यालाच.

बुद्ध म्हणतात…
१. आर्य अष्टांगिक मार्गाने जीवन जगा (यात पंचशीलाचा समावेश आहे)
२. दहा पारमितांचे, गुणांचे संवर्धन करा, याकडे दुर्लक्ष करू नका या मार्गानुसार आपण जीवन जगतात, मार्ग चालू लागलात, आचरण करू लागतात तर दुःख मुक्त व्हाल, सुखी व्हाल.

5 Replies to “अशांत आहात? सुखाचा मार्ग पाहिजे? तर बुद्धाचा हा संदेश वाचलाच पाहिजे!

  1. तथागतांनी सांगितलेला मार्ग खूप सुंदर आहे. या मार्गावर आपल्याला स्वतःलाच चलायच की नाही ठरवायचं आहे.

  2. सर्व सामान्य माणूस बुद्ध याच्या विचारामुळे जीवनात प्रगती केली जाऊ शकते .जर आपले विचार खरच चांगले असतील तर हमखास यशस्वी होणार

  3. मुळात तृष्णा करू नये जे आहे त्यात समाधानी राहावं सर्व काही सुळीत राहील तूर्षणे ने आणि चितेन होणार दूष परिणाम स्वतः ला होणार आहे आहे नशिबाला दोक्ष न देता स्वतःच्या कातुत्वणे करा आणि जगा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *