बातम्या

बुद्धपौर्णिमा निमित्त जागतिक स्तरावर होणार ऑनलाईन बुद्धवंदना

सध्या भारतासह जगभरात कोरोना व्हायरसचे संकट आले आहे. या काळात घरात राहून फिजिकल डिस्टन्स पाळणे गरजेचे आहे. गेल्या महिन्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती सर्वांनी आपापल्या घरात बसून आपण साजरी केली आहे. आता बुद्ध पौर्णिमा अवघ्या काही दिवसांवर आली असून सर्व बौद्ध बांधवानी घरी बसून तथागत बुद्धांना अभिवादन करावयाचे आहे. तसेच यावर्षी बुद्ध पौर्णिमा निमित्त ऑनलाईन जागतिक बुध्दवंदना आणि विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

औरंगाबाद येथे नोव्हेंबर २०१९ मध्ये आयएएस अधिकारी डॉ.हर्षदीप कांबळे आणि रोजना व्हॅनिच कांबळे यांनी अभूतपूर्व जागतिक बौद्ध धम्म परिषदचे (global buddhist congregation 2019) आयोजन केल्यानंतर आता (७ मे गुरुवारी २०२०) बुद्धपौर्णिमा निमित्त जागतिक स्तरावर ऑनलाईन बुद्धवंदना, प्रार्थना आणि आदरणीय वरिष्ट बौद्ध भिक्खूंचे मार्गदर्शन, चर्चासत्रांचे आयोजन करत आहेत.

बुद्ध पौर्णिमेचे सर्व कार्यक्रम फेसबुक लाईव्ह, टीव्ही आणि यु ट्यूब चॅनेलच्या माध्यमातून सर्वत्र प्रसारित करण्यात येणार आहेत. या ऑनलाईन बुद्ध पौर्णिमेच्या कार्यक्रमात थायलंड, श्रीलंका, म्यानमार, साऊथ कोरिया, नेपाळ आणि भारत देशातील आदरणीय वरिष्ठ बौद्ध भिक्खु ऑनलाईन आपले विचार मांडतील.

ज्येष्ट सनदी अधिकारी डॉ.हर्षदीप कांबळे (IAS) सर आणि रोजाना व्हॅनिच कांबळे मॅडम यांनी धम्मचक्र वेबसाईटला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे की, सध्या कोरोना व्हायरसचे मोठे संकट आपल्या समोर आहे. या संकट काळात आम्ही महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये २०००० हजार गरीब कामगारांच्या कुटुंबाना दहा दिवस पुरेल इतके फूड किट्सचे वाटप करण्याचे ठरवले आहे. सर्वांना विनंती आहे की आपणही या उपक्रमात सहभागी होऊन कुशल कर्माचा भाग व्हावे.

अधिक माहितीसाठी www.gbcindia2020.in/ या वेबसाईटला भेट द्यावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *