ब्लॉग

मुलांच्या संगोपनासाठी पालकांची कर्तव्ये कोणती? भगवान बुद्धाचा हा मौलिक उपदेश वाचा!

अपत्याचा जन्म होणे ही एक सुखद घटना आहे. मूल होणे आणि त्याचे संगोपन करणे हे एक धाडस आहे, जे सुख आणि आत्मविश्वासाने पार पाडले जाते. तसेच पालकांसाठी दीर्घकाळ त्याग आणि जबाबदारी पार पाडण्याची ही सुरूवात आहे उत्क्रांतीच्या प्रक्रियेत व बराच विकसित झाला असला तरी तरी त्याच्या बाळाला सामान्यतः परिपक्व आणि स्वतंत्र होण्यासाठी दीर्घकाळ लागतो.

मुलांचं काळजी घेणे, त्यांचे पालन – पोषण करणे आणि त्यांना भविष्यातील चांगला नागरिक बनविणे ही जबाबदारी स्वीकारणे पालकांसाठी खरोखरच कष्टाचे कार्य आहे. असे असले तरी अनेक शतकांपासून विकसित झालेले, मुलांच्या संगोपनासाठी पालकांना मार्गदर्शन करणार नियम समाजात रूढ आहेत. या संदर्भात लहान मुलांना सामाजिक मूल्ये, वर्तन आणि नैतिकता शिकविण्या मध्ये धर्माचा प्रमुख वाटा असतो. तो पालकांना चाकोरी प्रदान करतो. बुद्धधम्मात सुद्धा भगवान बुद्धाने मुलांच्या संगोपनासाठी पालकांची कर्तव्ये कोणती, तसेच पालकांप्रति मुलांचे कर्तव्य कोणते, याबद्दल मोलाचा उपदेश दिला आहे. ‘सिगालोवाद सुत्त ( दीघनिकाय ) हा या संदर्भातील अति प्रसिद्ध असा मौलिक उपदेश आहे.

भगवान बुद्धांशी संबंधित ही घटना आहे. एकदा भगवान बुद्ध एका तरुणाला एक सामान्य धार्मिक संस्कार करताना पाहतात, ज्यात तो पूर्व-पश्चिम, उत्तर-दक्षिण वर आणि खाली अशा सहा दिशांना वंदन करीत असतो. असे करण्यामागील हेतू आणि भावना (अर्थ) काय आहे, असे भगवंतांनी विचारल्यावर त्या तरुणाने सांगितले की, या कृतीचे महत्त्व मला माहीत नाही, परंतु मृत वडीलाने सांगितल्यामुळे हे सर्व करीत आहे. असा संस्कार केल्यामुळे भगवान बुद्धाने त्या तरुणाला नाकारले नाही, मात्र व्यवहार्य स्पष्टीकरणाद्वारे त्याला एक उपयुक्त अर्थ प्राप्त करून दिला. भगवंताने सांगितले की, योग्य मार्गात प्रगती करण्यासाठी धर्म मुलांना मदत करेल. अशा प्रकारे आपण पाहतो की, भगवान बुद्धाने व्यक्तीच्या इतरांशी असलेल्या संबंधांना फार मोठे महत्त्व दिले असून विशेषतः पालक आणि पाल्यातील संबंधांना जास्त महत्त्व दिले आहे.

पालकांनी आपल्या मुलांचे संगोपन करताना योग्य वेळी त्यांना स्वतंत्र्य देण्याचे मान्य केले पाहिजे, तसेच वेळ येताच योग्य तो वारसाही त्यांना प्रदान केला पाहिजे. याउलट, मुलांनी सुद्धा आई वडिलांची काळजी घेण्यासाठी स्वत:मध्ये निष्ठा आणि आपुलकीची वाढ केली पाहिजे. हे सर्व कुठल्याही लाभाच्या अपेक्षेने न करता त्यांच्याप्रति असलेला आदरभाव आणि कृतज्ञेतून झाले पाहिजे. यातून असे सूचित होते की, धर्म आणि पालक पाल्य संबंध यात निकटचा दुवा साधला गेला आहे. पालकांनी मुलाच्या जन्माचे धार्मिक महत्त्व प्रतिपादन करण्यात अयशस्वी होता कामा नये. ज्या कुटुंबातील सभासदांचे नातेसंबंध समंजस प्रस्थापित धर्मानुसार विकसित होतात ते चुकू शकत नाहीत.

अशाप्रकारचे नातेसंबंध, जे त्यांच्या धार्मिक व संस्कृतिक वारशावर आधारलेले आहेत, ते विकसित करण्यासाठी पालक कर्तव्यनिष्ठ आहेत. इतर धर्मात त्यांचे औपचारिक आणि बंधनकारक असे नामकरणविधी आणि नाव ठेवण्याचे काम तेवढे पार पाडले जाते. बौद्ध असलेले पालक आपल्या मुलाला विहारात आणतात आणि त्यांची त्रिरत्नावरील श्रद्धा पुनस्र्थापित करून बुद्ध, धम्म आणि संघाला शरण जातात. त्रिरत्नाला शरण गेल्यामुळे पालकांना आत्मविश्वास प्राप्त होतो. खात्री असते की, मुलाचे संगोपन करताना त्याचे सर्व प्रकारच्या पापांपासून संरक्षण होईल आपल्या सभोवताल अस्तित्वात असलेल्या वाईट शक्तींना ( Evil Force ) आपण नाकारू शकत नाही, मनुष्यमात्रांप्रती द्वेषबुद्धी ठेवतात आणि नुकसानसुद्धा पोहचवू शकतात. मुलांना विहारात आणून त्यांच्या वतीने पवित्र असे धार्मिक संस्कार पार पाडल्यामुळे मुलांच्या भल्यासाठी निश्चितच हातभार लागतो. येथे असेही म्हणता येईल की, मुलांचा विहाराशी संबंध जोडण्यासाठी ही सुरुवातीची पायरी आहे. अगदीच लहान (वय) असल्यापासून त्याला सतत विहारात ( नेले ) गेले तर त्याच्या जीवनाचा तो एक महत्त्वाचा भाग बनू शकतो. ही सवय तरुण वयात येईपर्यंत पाळली गेली तर जीवनातील समस्यांना धैर्याने तोंड देऊन त्याला चांगल्या अवस्थेत जगता येईल.

8 Replies to “मुलांच्या संगोपनासाठी पालकांची कर्तव्ये कोणती? भगवान बुद्धाचा हा मौलिक उपदेश वाचा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *